Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘DRDO’मध्ये शास्त्रज्ञांच्या ५०० जागा भरणार

$
0
0
‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’मध्ये (डीआरडीओ) शास्त्रज्ञांच्या अतिरिक्त ५०० जागा भरण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे ‘डीआरडीओ’च्या मनुष्यबळ विभागाचे मुख्य नियंत्रक डॉ. मलाकोणदाय यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतुकीसाठी हवा विकास आराखडा

$
0
0
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी ‘पीएमपी’चा दहा वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचा उपाय स्वयंसेवी संस्थांनी सुचवला आहे. ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट’ आणि ‘परिसर’ या संस्थांनी केलेल्या पुण्याच्या वाहतूक सर्वेक्षणात शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा हिस्सा खालावला असल्याचे नमूद केले आहे.

‘पीएमपी’ गॅसवर

$
0
0
‘पीएमपी’ बसमध्ये भरण्यात येणाऱ्या सीएनजी गॅसची अकरा कोटी रुपयांची रक्कम थकित असल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासूनची ही थकबाकी आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ समोरील अडचणींचा पाढा वाढत आहे.

१५ लाखांच्या घरफोडीतील आरोपी अटकेत

$
0
0
धार्मिक कार्यक्रमासाठी परगावी गेलेल्या व्यक्तीच्या सदनिकेत प्रवेश करून बनावट चावीद्वारे कपाट उघडून तब्बल साडे पंधरा लाखाचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. आरोपीला आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

कोंढव्यात दरोडा : ७ जणांना अटक

$
0
0
टिळेकरनगर येथील बांधकाम साइटवरून पायी चाललेल्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करत त्याच्याडील मोबाइल फोन आणि रोख रक्कम काढून घेणाऱ्या सात आरोपींना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

धानोरी, विद्यानगरचे नागरिक पाण्याविना

$
0
0
धानोरी, विद्यानगर येथील अनेक घरांचा पाणीपुरवठा महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे बंद झाल्याने या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पाण्यासाठी महिलांचा बारामतीत हंडा मोर्चा

$
0
0
जिरायती पट्ट्यातील नागरिकांनी व महिलांनी सोमवारी तहसील कचेरीवर पाण्यासाठी ‘हंडा मोर्चा’ काढला. बारामतीचा विकास झाल्याचे चित्र भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात महिलांवर पाण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ येत आहे, अशा शब्दांत या वेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

वाहतूक कोंडीविरोधात मनसेचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
मगरपट्टा -मुंढवा रोडवरील वाहतूक कोंडीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नुकतेच आंदोलन करण्यात आले. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मनसेतर्फे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांना निवेदन देण्यात आले. मगरपट्टा- मुंढवा रोडवर वाहतुकीचे कोंडी सोडवण्यासाठी हडपसर वाहतूक शाखेने रस्ता दुभाजक बंद केले.

धायरी फाटा उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार

$
0
0
सिंहगड रोडवरील धायरी फाटा उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. त्यामुळे, सुमारे तीन वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांची दैनंदिन त्रासातून लवकरच सुटका होण्याची चिन्हे आहेत.

मुलीच्या प्रेमामुळे पुन्हा जुळला संसार

$
0
0
घटस्फोटाच्या केससाठी गेली तीन वर्षे ते दोघे कोर्टाच्या चकरा मारत होते... त्यांची चिमुरडी कोर्टातील प्रत्येक तारखांना, ‘ बाबा, तुम्ही आई आणि मला कधी घरी नेणार?’, असे प्रश्न विचारू लागली.. एकत्र संसार करण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती.

६ कोटींच्या वस्तू चोरणारी टोळी गजाआड

$
0
0
पुणे शहर आणि जिल्ह्यात सात गोडाऊन फोडून सहा कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, चारचाकी वाहनांचे टायर तसेच कपडे चोरणाऱ्या उणेचा टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून चाळीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सामान्यांची लूट, अस्वच्छता अन् अंधार...

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे ठिकठिकाणी उभारण्यात आलेली पार्किंग मात्र पार्किंगचालकांच्या मनमानीमुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहेत.

व्याघ्रप्रकल्पांत वन्यजीवांची गणना

$
0
0
देशभरातील व्याघ्र प्रकल्पांसह लहानमोठ्या अभयारण्यांतील वन्यजीवांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी येत्या १६ ते २३ जानेवारी दरम्यान एकाच वेळी ट्रान्झिट लाइन (अधिवासाच्या विभागवार नोंदी) आणि कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीने गणना होणार आहे.

वृक्षसंवर्धन समितीसाठी फेरयाचिका दाखल करणार

$
0
0
‘वृक्षसंवर्धन समितीबाबत हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करा,’ असे आदेश उपमुख्यमं‌त्री अजित पवार यांनी दिलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या मदतीने पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या सभासदांनी घेतला आहे.

पिंपरीमध्ये दारूभट्ट्या उद्‍‍ध्वस्त

$
0
0
पिंपरीतील भाटनगरमध्ये रेल्वेमार्गाशेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये सुरू असलेला अवैध दारूचा धंदा उत्पादन शुल्क अधिकारी (एक्साइज) पथकाने मंगळवारी (७ जानेवारी) छापा टाकून उद्‍‍ध्वस्त केला. या वेळी लागलेल्या आगीमुळे झालेल्या स्फोटात उत्पादन शुल्क विभागाचे चार कर्मचारी आणि दोन स्थानिक रहिवासी भाजले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

‘डिफर्ड पेमेंट’वर शिक्कामोर्तब

$
0
0
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण ‘डिफर्ड पेमेंट’ (विलंबाने पैसे) पद्धतीने करण्यास पक्षनेत्यांनी अखेर मंगळवारी मंजुरी दिली.

‘इमर्जन्सी उपचारा’ला फेब्रुवारीचा मुहूर्त

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वर अपघातांची संख्या वाढत असताना त्यातील तातडीच्या वैद्यकीय सेवा (इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस) देणाऱ्या अद्ययावत शंभर अॅम्ब्युलन्स जानेवारी अखेरीस उपलब्ध होणार आहेत.

अॅसिड हल्ल्याची धमकी देणारे तिघे अटक

$
0
0
महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या छोट्या बहिणीची छेड काढणाऱ्या तिघा तरुणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. महाविद्यालयीन तरुणीची छेड काढल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकीही या आरोपींनी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

परीक्षा विभागाविरुद्ध अधिष्ठाते

$
0
0
विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांनी परीक्षा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात कुलगुरूंकडे दाद मागितली असून, या विषयी तातडीने पावले न उचलल्यास यापुढे आक्रमक धोरण अवलंबिण्याचा इशारा दिला.

१४ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

$
0
0
राज्यात सर्वत्र गुटखाविक्रीस बंदी असतानाही हवेली तालुक्यातील मांगडेवाडी येथे एका विक्रेत्याने साठा केलेल्या सुमारे चौदा लाखांचा गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनासह (एफडीए) पोलिसांच्या पथकाने कारवाई करून जप्त केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images