Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बेपत्ता अभिनेत्रीची गाडी दरीत

$
0
0
पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्री अलका पुणेवार यांची मारुती-८०० कार ही मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील बोरघाटातील एका दरीत चुराडा झालेल्या अवस्थेत आढळली. बोरघाटात मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेला जोडलेल्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावरील एचव्हीसी पुलालगतच्या कठड्यावरून नऊशे फूट खोल दरीत कोसळली.

वाळू लिलाव देणार १०० कोटी रुपये

$
0
0
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून वाळू लिलावांद्वारे शंभर कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा करण्याचा महसूल खात्याचा प्रयत्न आहे. १२२ वाळू ठेक्यांच्या लिलावांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २१ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे.

‘तिढा’ सुटणार २० जानेवारीपर्यंत

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात येत्या २० जानेवारीपर्यंत ठोस निर्णय होईल. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (तीन जानेवारी) सांगितले.

‘मार्ड’च्या संपामुळे वैद्यकीय सेवा विस्कळित

$
0
0
सोलापूर येथे एका निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) पुकारलेल्या बंदमुळे ससून हॉस्पिटलमधील रुग्णसेवा शुक्रवारी काही प्रमाणात कोलमडली.

‘ATM’ची सुरक्षा रामभरोसेच

$
0
0
बेंगळुरूमध्ये एका ‘एटीएम’मध्ये महिला बँक अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर, संपूर्ण देशात ‘एटीएम’ केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या हल्ल्याची दखल घेत राज्य सरकारने मुंबईत ‘एटीएम’ला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.

पुणे विद्यापीठाशी संलग्न १५० कॉलेजे मूल्यांकनाविना

$
0
0
पुणे विद्यापीठाशी संलग्न १५० हून अधिक कॉलेजांनी अद्याप मूल्यांकनाची प्रक्रिया केलेली नाही. जून २०१४ पूर्वी त्यांनी मूल्यांकनासाठी अर्जप्रक्रिया केली नाही, तर त्यांना २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठीच्या विकास निधीपासून वंचित राहावे लागेल.

२० मिनिटांत पुन्हा २ सोनसाखळ्या लंपास

$
0
0
गेल्या दोन दिवसांत कोथरूड आणि ​सिंहगड परिसरात दुचाकीवरील चोरट्यांनी सोनसाखळ्या हिसकावत साडे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावले. या प्रकरणी कोथरूड आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

फर्ग्युसन कॉलेजरोडवर मद्यपींकडून मारहाण

$
0
0
फर्ग्युसन कॉलेज रोडवर ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पीत बसलेल्या चौघांनी एका व्यक्तीला मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा परमीट नूतनीकरणास मुदतवाढ देण्याची मागणी

$
0
0
आरटीओमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन कम्प्युटर सिस्टीममध्ये रिक्षा परमीट नूतनीकरणाचा तपशील पूर्ण स्वरूपात येत नसल्याने रिक्षा परमीटचे नूतनीकरण करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीने जिल्हा परिवहन प्राधिकरणाकडे केली आहे.

लोकसभेला ‘आप’ निवडणार तुल्यबळ उमेदवार

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दिग्गजांशी टक्कर देण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’ सज्ज होत असून, सर्व प्रस्थापितांना घरी पाठविण्याचा निर्धार राज्याच्या संयोजक अंजली दमानिया यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

ग्रामीण भागातही प्रॉपर्टी कार्ड देणार

$
0
0
सातबारा उताऱ्यासह कोणत्याही प्रकारचे महसूल रेकॉर्ड नसलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड देण्याची भूमी अभिलेख विभागाची योजना असून हवेली तालुक्यातील डोंगरगाव व तुळापूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जात आहे.

महापौरांच्या स्नेहभोजनाला पालिकेची ‘दक्षिणा’

$
0
0
महापौर बंगल्यावर निमंत्रितांसह अधिकाऱ्यांसाठी बोलाविण्यात आलेल्या स्नेहभोजनाचा ‘बेत’ पालिकेसाठी मात्र ‘खर्चिक’ ठरण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांसह महापालिका अधिकाऱ्यांच्या भोजनाचा खर्च भागविण्याचा प्रस्ताव महापौर कार्यालयाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.

‘नियोजन’ करूनही वेतनवाढ गेली

$
0
0
एक अपत्यावर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांना दोनवेळा वेतनवाढ देण्याची घोषणा करत महापालिकेने त्याची अंमलबजावणीही सुरू केली.

तहसीलदारांना ‘एनए’चे अधिकार

$
0
0
राज्यातील वर्ग १ चा दर्जा असलेल्या गावांतील बिगरशेती (एनए) परवानगी देण्याचे अधिकार प्रांत अधिकाऱ्यांना तर वर्ग २ च्या गावांचे एनएचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. हे अधिकार स्थानिक स्तरावर दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे.

शाळांतील मराठी सक्तीसाठी हाक

$
0
0
‘ज्ञानभाषा इंग्रजी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या रेट्यामध्ये मराठी टिकेल की नाही, याची चिंता आहे. मला व्यक्तिशः ती नाही. मराठी टिकणारच. मात्र, बालवाडीपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत प्रत्येकाला मराठी भाषा सक्तीची करा.

‘तू-तू-मैं-मैं’चा खेळ

$
0
0
विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना करण्याच्या घोषणा करणाऱ्या आणि उदंड आश्वासने देणाऱ्या बाबा-दादांना नवीन वर्षात त्यासाठी मुहूर्त सापडण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.

निव्वळ हशा आणि टाळ्या

$
0
0
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी संमेलनाच्या उद्घाटन भाषणात अशी टाळीबाज आणि कोटीबाज वाक्यांची पेरणी करीत मंडपात जमलेल्या प्रेक्षकांकडून-साहित्यप्रेमींकडून भरपूर टाळ्या आणि हशा वसूल केल्या. स्वतःला ‘माणसांतला माणूस’ म्हणविणाऱ्या फ.मुं.च्या भाषणात ना माणसाबद्दलचे खोल चिंतन होते, ना भाषेबद्दलचे.

पिंपरीत लाचखोर अधिका-याला अटक

$
0
0
वडिलोपार्जित जागेत आजोबांचे चुकलेले नाव दुरुस्त करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी भूमापक अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शनिवारी दुपारी कारवाई करण्यात आली.

गोळी लागल्याने भोसरीत तरुणाचा मृत्यू

$
0
0
कामावरून घरी परतणाऱ्या तरुणावर अज्ञात मारेकऱ्याने केलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास भोसरी येथे नाशिक फाट्याजवळ ही घटना घडली. हल्लेखोरांनी मोबाइल आणि बॅग चोरून नेली आहे.

सरकारी ऑफिसमध्ये चोरी

$
0
0
गोळीबार मैदान येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ टेमघर प्रकल्प पुनर्वसन उपविभाग कार्यालयाचे कुलुप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीराम पद्माकर सराफ (वय ४८, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी लष्कर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images