Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘शहर रेबीज मुक्तीचा’ पालिकेचा संकल्प

$
0
0
भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. पुढ‌ील तीन वर्षांत पुणे शहर रेबीज मुक्त करण्याचा संकल्प पालिका प्रशासनाने सोडला आहे.

जिभेचे चोचले, मुशाफिरीवर नियंत्रण

$
0
0
वाढती अस्थिरता, मासिक खर्चात झालेली वाढ यांच्यामुळे पुणेकरांनी फिरण्याच्या आवडीला काहीशी मुरड घातली आहे. त्यामुळेच पेट्रोलच्या खपात ५ ते १० टक्के घट झाली आहे, अशी माहिती ‘पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन’चे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिली.

डांगे चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

$
0
0
वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव डांगे चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नामकरण आणि उद्‍घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (तीन जानेवारी) होणार आहे.

वाहनाच्या काचा फोडल्याप्रकरणी दोघे ताब्यात

$
0
0
थर्टीफस्टच्या मध्यरात्री पिंपरीतील इंदिरानगरमध्ये वाहनांच्या काचा फोडल्याच्या आरोपावरून दोघांना पोलिसांनी बुधवारी (एक जानेवारी) रात्री अटक केली.

रेल्वे स्टेशनवर करडी नजर

$
0
0
पुण्यातील रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर १८ आणि पुणे स्टेशनवर ४६ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पुणे-लोणावळा लोकलसाठी नव्या रेकची मागणी

$
0
0
पुणे-लोणावळा दरम्यान चालवण्यात येणाऱ्या लोकलसेवेसाठी दोन नवीन रेक देण्याची मागणी मध्य रेल्वेने मुख्यालयाकडे केली आहे. लोकलच्या सेवेमध्ये नवीन रेक दाखल झाल्यानंतर पुणे-लोणावळा लोकलसेवेचा विस्तार करणे शक्य होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या व​रिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘आरटीओ’चे कामकाज ठप्प

$
0
0
परमिटचे नूतनीकरण न केलेल्या रिक्षाचालकांना नोटिस पाठवण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून हाती घेण्यात आल्यामुळे गुरुवारी दिवसभर आरटीओचे कामकाज ठप्प झाले होते, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

पालिका सभेत आता गोंधळाचा ‘बंदोबस्त’

$
0
0
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मानदंड पळविणे, महापौरांच्या आसनासमोरील जागेत जमून गोंधळ घालणे आणि अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्याची संधी माननीयांना मिळणार नाही. महापालिका भवनातील श्री शिवछत्रपती सभागृहाच्या नव्या रचनेतच त्यासाठी कडेकोट ‘बंदोबस्त’ करण्यात आला आहे.

संमेलनातही ‘माय स्टॅम्प’

$
0
0
टपाल खात्याने ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये खास व्यवस्था केली असल्याने साहित्य रसिकांना संमेलनात स्वतःचे किंवा आवडीच्या विषयांवर टपाल तिकीट बनवून घेता येणार आहे.

आचार्य अत्रे यांच्या कार्याचे यथार्थ दर्शन

$
0
0
‘आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्रे यांच्या जीवनकार्याचे यथार्थ दर्शन घडविणारे दालन सर्व अत्रेप्रेमींना अभिमानास्पद आहे,’ अशा भावना अत्रे यांच्या कुटुंबीयांकडून गुरुवारी व्यक्त करण्यात आल्या.

आम्हालाही साहित्यविश्वात रस...

$
0
0
कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि अवांतर वाचनाचा काहीही संबंध नाही, अशी ओरड होताना दिसते. परंतु, प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांनाही साहित्याची आवड आहे. हे विद्यार्थी विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन करतात, आणि त्यावर चर्चाही करतात.

संमेलननगरीस संत सोपानदेवांचे नाव

$
0
0
सासवड येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या नगरीस संत सोपानदेव नगरी असे नाव देण्यात आल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य व स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी जाहीर केले असून, संमेलनातील विविध मंडप व अन्य ठिकाणांना मान्यवरांची नावे देण्यात आली आहेत.

‘आविष्कारा’चे समाजोपयोगी संशोधन

$
0
0
आधार कार्डसाठी वापरण्यात आलेल्या माहितीच्या आधारे प्रभावी मतदान प्रक्रिया राबवू शकणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन... सुपरकपॅसिटर वापरून तयार केलेले एनर्जी स्टोरेज डिव्हाइस... सेल्युलोजच्या टाकाऊ भागापासून ग्लुकोज तयार करण्याचे तंत्र... किंवा मग अगदी इकोफ्रेंडली ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम...

शाळाबाह्य मुलींसाठी ‘लेक शिकवा’

$
0
0
मुलींच्या शिक्षणाविषयी समाजामध्ये सकारात्मक विचारांना चालना देण्याबरोबरच शाळाबाह्य मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाकडे वळविण्यासाठी राज्यात आजपासून (३ जानेवारी) ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान’ राबविण्यात येणार आहे.

पाचगाव पर्वतीवर सायंकाळी फिरणे शक्य?

$
0
0
पाचगाव पर्वतीवर दररोज फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे, त्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठीच आम्ही टेकडीवर संध्याकाळी फिरण्यास मनाई केली होती. पण लोकांनी मागणी केली तर संध्याकाळी दोन तास टेकडीवर फिरायला परवानगी देण्यात येईल, अशी माहिती उपनवसंरक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

‘सहकार चळवळ स्वायत्त करा’

$
0
0
‘सहकार चळवळ लोकशाही आणि समाजवादाच्या मदतीने सुरू झाली आहे. ही चळवळ स्वायत्त आणि समृद्ध होण्याची गरज आहे,’ असे मत शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सा. रे. पाटील यांनी व्यक्त केले.

ऐतिहासिक भिडे वाड्याला खासगी बँकेचे ‘सील’

$
0
0
पुणे महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या तात्यासाहेब भिडे वाड्याला एका खासगी बँकेने सील ठोकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.

‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये रुजतोय ‘जीडी’चा फंडा

$
0
0
‘दिल्ली विधानसभा निवडणुकांतील आम आदमी पार्टीची कामगिरी किंवा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांची धोरणे यापैकी एका विषयावर चर्चा करा...’ हा एमए राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमधील प्रश्न आहे, असा समज करून घेत असाल, तर थांबा! हा प्रश्न आहे, इंजिनीअरिंग कॉलेजच्या ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या वेळी विचारलेला...

कऱ्हेकाठी अक्षरदाटी…

$
0
0
मराठी संस्कृतीचे एक वैशिष्ट्य असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज, (शुक्रवारी) सासवड येथे प्रारंभ होत असून, सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कुठलाही मोठा वाद निर्माण न झालेल्या ८७व्या साहित्य संमेलनाच्या उद‍्घाटनाचा सोहळा संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत रंगेल.

जमला चाळीस लाखांचा कर

$
0
0
न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमधून सुमारे ४० लाख रुपयांचा करमणूक कर जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. शहर व जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये यंदा सव्वाशे पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images