Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कसबा पेठेतील ‘ATM’ फोडणारे गजाआड

0
0
कसबा पेठेतील दोन ‘एटीएम’ फोडून पैसे काढण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना फरासखाना पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. अकाउंटवर पैसे शिल्लक नसल्याने ‘एटीएम’मधून पैसे न निघाल्याने, या आरोपींनी ‘एटीएम’ फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गोड चर्चाच की, अभिव्यक्तीवर भाष्य?

0
0
उत्सवी मिरवणुका-भोजनावळी आणि गोडगोड चर्चा यांच्या ‘आनंद’मेळ्याच्या पलीकडे जात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीसारख्या मूलभूत प्रश्नावर साहित्य संमेलन ठोस भूमिका घेणार का, असा सवाल अस्वस्थ मराठीजनांकडून केला जात आहे.

अभिव्यक्तीवर संमेलन होणार का व्यक्त?

0
0
उत्सवी मिरवणुका-भोजनावळी आणि गुडीगुडी चर्चा यांच्या ‘आनंद’मेळ्याच्या पलीकडे जात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीसारख्या मूलभूत प्रश्नावर साहित्य संमेलन ठोस भूमिका घेणार का, असा सवाल अस्वस्थ मराठीजनांकडून केला जात आहे.

सोनोग्राफी मशीनला आता युआयडी क्रमांक

0
0
राज्यातील नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरमध्ये नेमक्या किती मशिन उपलब्ध आहेत याची माहिती संकलित करताना प्रत्येक मशिनला स्वतंत्र युनिक आयडेंटिफिकेशनचा क्रमांक (युआयडी) देण्यात येत आहे. या क्रमाकांमुळे प्रत्येक केंद्रातील मशिनची नोंदणी आरोग्य खात्याकडे केली जाणार आहे.

दरीत कोसळून युवकाचा मृत्यू

0
0
खंडाळ्यातील शुटिंग पॉइंट येथे फोटो काढताना तोल जाऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (१ जानेवारी) दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. धुलन बेरनाथ (वय २१, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. आसाम) असे दरीत पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

‘राज्यसेवे’च्या संधीत वाढ

0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार पदांसाठीच्या ७५ वाढीव जागांना राज्य सरकारने मान्यता दिली.

कोरेगाव पार्कच महागडे

0
0
शहरातील कोरेगाव पार्क हा भागच फ्लॅटसाठी सर्वाधिक महागडा ठरला असून, प्रभात रस्ता, शिवाजीनगर, कोथरूडपाठोपाठ आता कल्याणीनगरने मोठा भाव खाल्ला आहे. कोरेगाव पार्कमधील फ्लॅटचा रेडी रेकनरचा दर पाच आकडी म्हणजे १० हजार ८१३ रुपये प्रती चौरस फूट झाला आहे.

पुणेकरांना मोफत पाणी अशक्य

0
0
शहराची भौगोलिक स्थिती वेगळी असल्याने शहराचा सर्वच बाजुने मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. शहरासाठी धरणातून उपलब्ध होणारे पाणी आणि पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात मीटर यंत्रणा उपलब्ध नसल्याने, दिल्ली शहरासारखे पुणेकरांना मोफत पाणी देणे शक्य नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

‘ATM’च्या सुरक्षेवर आता ‘कटर’

0
0
ग्राहकांच्या दृष्टीने ‘एटीएम’ सुरक्षित करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश बँकांना बजाविण्यात आले असताना आता ‘एटीएम’ केंद्रांवरच गॅस कटर चालवून दरोडा टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. सुरक्षारक्षकच नसल्याने शहर व परिसरातील ‘एटीएम’ दरोडेखोरांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.

नव्या वर्षात ८.५ लाख जॉब

0
0
नव्या वर्षात देशात तब्बल साडेआठ लाख जॉब निर्माण होणार असल्याचे जाहीर करून जॉब मार्केटमधील तज्ज्ञांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’ दिली आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि सेवा उद्योगात जॉब तयार होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

PCMCचे ६ कर्मचारी निलंबित

0
0
अनधिकृत बांधकाम न हटविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्याना निलंबित करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी (२ जानेवारी) घेतला. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या २० कर्मचार्‍यांना प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत बांधकामे हटविण्यासाठी मुदत दिली होती.

छंदानं मिळवून दिली पदकं

0
0
मला पोस्टाची तिकिटं जमा करण्याचा छंद आहे. वयाच्या १३-१४व्या वर्षापासून मी हा छंद जोपासला आहे. अजूनही या छंदामध्ये माझं मन रमतं, प्रफुल्लित होतं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते २००३ सालापर्यंतची भारताची सर्व तिकिटं माझ्या संग्रहात आहेत. इतर देशांचीही विविध तिकिटं माझ्याकडे आहेत.

अन् माझा प्राण वाचला

0
0
त्या गाडीचा कुठला तरी भाग तुटून माझ्या पायात शिरला होता. मी जोरात ओरडले आणि क्षणार्धात बेशुद्ध पडले. एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. त्या दोघांनी मोठ्या प्रयत्नांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. माझे पैसै आणि दागिनेही जपून ठेवले.

अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप

0
0
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे प्रमुख प्रलंबित मागण्यासाठी येत्या सोमवारपासून (६ जानेवारी) अंगणवाडी सेविका व मदतनीस राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहीती राज्य अंगणवाडी संघाचे विभागीय सचिव विठ्ठल करंजे यांनी दिली आहे.

खाद्यपदार्थातील केसामुळे दहा हजारांचा दंड

0
0
एका नामांकित कंपनीच्या सीलबंद खाद्यपदार्थाच्या डब्यात केस आढळल्याप्रकरणी संबंधित कंपनीला तक्रारदाराला दहा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश ग्राहक न्याय मंचाने दिला आहे. ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य गीता घाडगे यांनी हा निकाल दिला आहे.

राष्ट्रवादीचा बारामतीत आजपासून लोकसंवाद

0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसंवाद अभियान सुरू करण्यात येणार आहेत. आज, शुक्रवारपासून (३ जानेवारी) सुरू होणाऱ्या या अभियानात गेल्या पाच वर्षांत बारामती मतदारसंघात झालेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.

‘सायकलकन्यां’नी गाठला ९०० किमीचा टप्पा

0
0
पुणे ते कन्याकुमारी हे १६०० किमी अंतर सायकलवरून पार करण्याचे स्वप्न घेऊन निघालेल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनींनी आपल्या मोहिमेतले ९०० किलोमीटरहून अधिक अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. बेंगळुरूनंतर होसूरचा टप्पा पार करून गुरुवारी या विद्यार्थिनी धरमपुरी येथे पोहोचल्या.

नववर्षदिनीच साखळी चोरीचे चार गुन्हे

0
0
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनसाखळी हिसकावण्याचे चार गुन्हे घडले असून त्यात अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. गेल्या काही दिवसांत सोनसाखळी हिसकावण्याचे वाढलेले गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. हे चोरटे पकडले जात नसल्याने शहरात त्यांनी उच्छाद मांडला आहे.

उलगडणार बौद्ध काळातील समर्थ स्त्रियांचा इतिहास

0
0
निसर्गाने वाट्याला दिलेल्या विविध भूमिकांचे पालन करीत असतानाही कोणत्याही भूमिकात त्या कधीच गुंतून पडल्या नाहीत, तरी देखील माणूसपणाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. अशा या बुद्धांच्या काळातील ‘थेरी’चे जीवन पुणेकरांना ऐकायला मिळणार आहे.

त्रुटींमुळे ‘बस बे’ पुन्हा अडचणीत

0
0
वाहतूक सल्लागार समितीच्या निर्णयानुसार शहरातील प्रमुख थांब्यांवर ‘बस बे’ आखण्यात येत असले, तरी त्यातील त्रुटी दूर केल्या जाव्या, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे. खासगी वाहनांसाठी जागा सोडून ‘बस बे’ आखण्यात येत असल्याचा आरोपही मंचातर्फे केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images