Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फलकबाजीच्या नियमांना पालिकेकडूनच हरताळ

$
0
0
नियमांची चौकट आणि कायद्याचा बडगा उगारून जाहिरात फलकांना ‘शिस्त’ लावणाऱ्या महापालिकेने स्वतःच्या कार्यक्रमासाठी मात्र, नियम डावलून ‘बेशिस्त’ कारभार सुरू केल्याचे उघड झाले आहे. महापौर चषक कुस्ती स्पर्धेसाठी शहरात ठिकठिकाणी पालिकेने जाहिरातबाजी सुरू केली आहे.

ऑटोमॅटिक दरवाजा : ३ कोटींचा प्रस्ताव मंजूर

$
0
0
नगररोड; तसेच आळंदीरोडवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या बीआरटी मार्गावरील २२ बसस्टॉपवर आधुनिक पद्धतीचे शंभर ऑटोमॅटिक दरवाजे बसविण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली.

चुकीची सवलत देणाऱ्या दस्त तपासणीचे आदेश

$
0
0
मुद्रांक कागदावर (स्टँप पेपर) जुन्या तारखांच्या नोंदी करून कमी मुल्यांकनावर मुद्रांक शुल्क भरण्याबरोबरच मुद्रांक शुल्कात चुकीची सवलत देण्याच्या दस्तांची तपासणी करण्याचे आदेश मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत.

बाउन्सरची मागणी 'बाउन्स'

$
0
0
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हॉटेल्स-मॉल्समधील सुरक्षा व्यवस्था कडक होणार असल्याने बाउन्सर म्हणून काम करणाऱ्या तरुणांना आणि सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

ड्रंक अँड ड्राइव्ह विरुद्ध जेलभरो

$
0
0
मद्यप्राशन करून वाहन चालवताना सापडलात, तर तुम्हाला नवीन वर्ष कदाचित गजाआड साजरा करण्याची वेळ येऊ शकते. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मद्यप्राशन करून वाहने दामटणाऱ्या तळीरामांना पकडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरपर्यंत मोहीम हाती घेतली आहे.

ऑनलाइन वीजबिल महागले

$
0
0
डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल भरल्यास येत्या एक जानेवारीपासून ग्राहकांना किमान २४ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. या व्यवहारांवरील सरचार्जमधून सूट देण्याची मर्यादा महावितरणकडून दहा हजारांवरून दोन हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

शिक्षण मंडळ बजेटचा आज फैसला

$
0
0
आर्थिक अनियमिततेमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षाच्या बजेटवर गुरुवारी (२६ डिसेंबर) सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. वास्तववादी बजेट मांडण्याच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केल्याने शिक्षण मंडळाच्या बजेटचा फुगवटाही कमी होण्याची शक्यता आहे.

डोंगरउतारावर बांधकामास परवानगी

$
0
0
महापालिका हद्दीलगतच्या डोंगरमाथा व डोंगरउताराच्या जमिनीवर व्यापारी वापरासाठी बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेत फेरबदल करण्याचा प्रस्ताव आहे.

पिंपरीत विद्यार्थ्यावर ब्लेडने वार

$
0
0
किरकोळ कारणावरून एका विद्यार्थ्यावर ब्लेडने वार करण्याचा प्रकार पिंपरीतील महेशनगरमध्ये गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

धरणांच्या दरवाजांचे काम करणारा विभाग आता नाशिकला

$
0
0
धरणांच्या दरवाजांचे काम करणारे दापोडीमधील यांत्रिकी मंडळाचे कार्यालय (द्वारे) नाशिक येथे हलविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. प्रशासकीय सोय, अंतर्गत समन्वय तसेच सर्वप्रकारची यांत्रिकी कामे एकाच मंडळातून करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘टीईटी’ पुन्हा घेण्याची उमेदवारांची मागणी

$
0
0
राज्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेली महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. अभ्यासक्रमाबाहेरचे आणि उत्तरांसाठी योग्य पर्याय नसलेले प्रश्न विचारल्याची तक्रार करून ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी परीक्षाच पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

उद्या ‘जगण्याच्या हक्काचं आंदोलन’

$
0
0
सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जगण्याचे हक्क मिळावेत, यासाठी डावे-पुरोगामी पक्ष, कामगार, महिला संघटना यांनी एकत्र येऊन जगण्याच्या हक्काचं आंदोलन हे व्यासपीठ स्थापन केले आहे. सर्वसामान्यांच्या गरजांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २८ डिसेंबर रोजी महात्मा फुले मंडई ते पुणे महापालिका दरम्यान सायंकाळी चार ते पाच या वेळेत मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुणे-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्याची मागणी

$
0
0
पुणे ते सावंतवाडी दरम्यान रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी कोकणवासीय महासंघातर्फे करण्यात आली आहे. या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी येत्या चार महिन्यामध्ये रेल्वे मंत्रालयाकडे निवेदन पाठवण्यात येणार असल्याचे कोकणवासीय महासंघाचे अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी सांगितले.

पत्रकारितेमुळेच निवेदन क्षेत्रात यशस्वी

$
0
0
मुलाखतकार, निवेदक अशी माझी सर्वदूर ओळख असली तरी मी मूळचा पत्रकार आहे. त्यामुळेच मी निवेदनाच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो. परिणामी पत्रकारिता हे क्षेत्रच मला अधिक भावते, अशा शब्दांत मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी भावना व्यक्त केल्या.

अंनिस घेणार जिल्हावार प्रशिक्षण

$
0
0
राज्य सरकारने लागू केलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उप​स्थितीत मुंबईत राज्यस्तरीय परिषद घेण्यात येणार असून, जिल्हानिहाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांना औद्योगिक भूखंडाचे वाटप करणार

$
0
0
औद्योगिक वसाहतींसाठी जमीन संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना वीस टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या पंधरा टक्के क्षेत्र औद्योगिक व पाच टक्के क्षेत्र व्यापारी कारणासाठी दिले जाणार आहे. या विकसित भूखंडाचे वाटप सवलतीच्या दराने केले जाणार आहे.

कँटोन्मेंटमध्ये बसविणार ५६ सीसीटीव्ही

$
0
0
पुणे कँटोन्मेंटच्या परिसरात पोलिस खात्यातर्फे ५६ ठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे बसविण्यासाठी बोर्डाने पोलिस खात्याला रस्ते खोदाई शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधुनिक सावित्रींनी दिले एकमेकींच्या पतींना जीवनदान

$
0
0
आपल्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी दोन आधुनिक सावित्रींनी आपल्या किडनीचे दान करण्याची इच्छा व्यक्त केली खरी..पण रक्तगट न जुळल्याने दानाची इच्छा अर्धवटच राहिली. दानाची अर्धवट राहिलेली ही इच्छा अन्य पेशंटच्या बाबतीत मात्र, पूर्ण झाली.

चष्मेबहाद्दूरांचा चष्मा होणार दूर

$
0
0
लग्न असो अथवा सरकारी नोकरी, खेळ असो की अॅक्टिंग यामध्ये पुढे जाण्याची, स्वप्ने साकार करण्याची आहे; पण जाड भिंगांचा चष्मा असेल तर तो त्यामधील अडथळा ठरतो; पण चिंता नको! कारण महागड्या पण प्रभावी ठरणाऱ्या ‘स्माइल लेसर’च्या अवघ्या काही मिनिटांच्या उपचाराने तुमच्या चष्म्यांचा नंबर कमी करणे शक्य आहे.

‘आरटीओ’च्या गोंधळावर विद्यार्थ्यांनी ठेवले बोट

$
0
0
पुण्यातील ट्रॅफिक बेशिस्त होण्याला तरुणाईच कारणीभूत आहे, अशी सातत्याने ओरड होताना दिसते. त्यांना ट्रॅफिकचे भान नाही, बेफाम गाडी चालवतात, अशी तक्रारही अनेकदा केली जाते. या पार्श्वभूमीवर पुण्यात नुकतीच विद्यार्थ्यांसाठी अभिरूप ट्रॅफिक संसदेचे आयोजन करण्यात आले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images