Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महिनाभर BRTचा प्रवास चकटफू?

$
0
0
जलद बस वाहतूक (बीआरटी) प्रकल्पाकडे प्रवाशांचा ओघ वाढविण्यासह त्याची विश्वासार्हता वाढविण्यासाठी आळंदी आणि नगररोड ‘बीआरटी’वर प्रवाशांना सुरुवातीचा एक महिना ‘मोफत’ प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

१२.५ हजार पुणेकरांना श्वानदंश

$
0
0
भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने शहरातील नागरिक हैराण झाले असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.

लोकल तिकीट आता 'इझी'

$
0
0
लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा तिकीट काढण्याचा वेळ कमी करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर ऑटोमेटेड तिकीट व्हेंडिग मशीन बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

व्हॉट्स 'अप'...SMS 'डाउन'!

$
0
0
‘एसएमएस’द्वारे ग्रुपमध्ये शेवटचा संवाद कधी साधला, हे आपणास चटकन आठवणार नाही; कारण व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर ही युवापिढीची संपर्क करण्याची नवी माध्यमे होऊ लागली आहेत. काही महिन्यांनी संपर्कात येणाऱ्या वा ओळखीच्यांपर्यंतच ‘एसएमएस’ पाठविण्याचा वापर मर्यादित राहिला आहे.

पुण्यात १६ फ्लॅटमध्ये घरफोडी

$
0
0
पुण्यातील वाकड भागामध्ये मॅगझिमा सोसायटीमधील एकाच वेळी १६ फ्लॅटमध्ये घरफोडी करुन तब्बल ८४ तोळं सोनं आणि ५० हजाराची रोकड लंपास करण्यात आली आहे.

fbवर अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

$
0
0
एका तरुणीच्या फेसबुकवरील प्रोफाइलवर आक्षेपार्ह मेसेज आणि अश्लील फोटो पाठविल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी योगेश मधुकर काशिद (वय ३१, रा. भोसरी, मूळ) याला अटक करण्यात आली आहे.

नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0
अनामत रक्कम घेऊन नोकरी लावल्यानंतर पगार आणि अनामत रक्कम दोन्हीही देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टाने २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

‘अल्पसंख्याक विनाअनुदानित’ला ‘२५ टक्के’ प्रवेशात सवलत

$
0
0
अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांना माफक दरामध्ये मिळालेली जमीन वा आमदार- खासदार निधीतून मिळालेले कम्प्युटर हे अनुदानाच्या व्याख्येत बसत नाहीत.

मोबाइलधारक चालकांमुळे ‘शिवनेरी’ धोकादायक

$
0
0
‘एसटीचा प्रवास; सुरक्षित प्रवास’ असे चित्र निर्माण करण्यात येत असले, तरी प्रवासादरम्यान मोबाइलवर बोलण्याच्या ड्रायव्हर्समुळे ‘शिवनेरी’चा प्रवास धोकादायक बनला आहे.

दुचाकीच्या धडकेने युवक मृत्युमुखी

$
0
0
विमाननगर येथे पायी जात असलेल्या एका १६ वर्षांच्या युवकाला दुचाकीने जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. विमाननगर येथील आनंद विद्यानिकेतन शाळेसमोर सोमवारी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

शाहू महाराजांच्या पुतळ्याचे शनिवारी अनावरण

$
0
0
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीतर्फे राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. संस्थेच्या शिवाजीनगर येथील आवारामध्ये उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येत्या शनिवारी अनावरण करण्यात येणार आहे.

रखडलेल्या योजनांमुळे वाहतुकीचा बोजवारा

$
0
0
केंद्र सरकारने गौरवलेली ‘ट्रॅफी-आयकॉप’सारखी अभिनव योजना, ‘ट्रान्स्पोर्ट हब’चा प्रस्ताव, औंध येथील वाहतूक मुख्यालय, रखडलेल्या विकास आराखड्यामुळे (डीपी) रिंग रोडचा अभाव; तसेच पोलिसांसाठी असलेल्या आरक्षित जागा ताब्यात न मिळाल्याने शहरातील वाहतूक सुधारणेला मर्यादा येत आहेत.

फिल्डवर्कर भरतीत गैरव्यवहार

$
0
0
महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांची साखळी सुरूच असून, फिल्डवर्कर पदासाठीही पात्र उमेदवाराऐवजी नियमबाह्य पद्धतीने भरती करण्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली गेली आहे.

पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

$
0
0
पंचायत समितीच्या शिक्षण विभागांत सेवा पुस्तकातील नोंदीसंबधी माहिती घेण्यास आलेल्या शिक्षक व संबंधित कर्मचारी यांच्यात झालेली शाब्द‌िक चकमक आणि धक्काबुक्की प्रकरणातून ७१ कर्मचाऱ्यांनी पाच तास लेखणीबंद आंदोलन करून शिक्षकाच्या कृत्याचा निषेध केला.

आई समजली त्याला जग समजले

$
0
0
‘महिलांनी कोणतेही काम करताना आपली लक्ष्मण रेषा ओलांडू नये. ज्याला आई समजली त्याला जग समजले,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी नुकतेच केले. भोर नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने येथील श्री. सौ. गं. प. वाचनालयाच्या प्रांगणात अयोजित आनंद मेळाव्यात ‘आई’ या विषयावर त्या बोलत होत्या.

नगरपरिषदेच्या धोरणांना हजारो हरकती

$
0
0
नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील रहिवाशांना घरपट्टीच्या नोटिसा देऊन नगरपालिकेने नागरिकांची झोप उडवून टाकली, मात्र विरोधी नेता सुनिल सत्ते यांनी घरपट्टीविरोधात आवाज उठवून नगरपालिकेकडे हरकती दाखल करण्यासाठी आवाहन केले होते. या अवाहनास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत हजारो हरकती दाखल झाल्या आहेत.

पोलिस प्रशिक्षणासाठी खास सभागृह

$
0
0
वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देता यावे, म्हणून पोलिस आयुक्त कार्यालयात बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद् घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज (गुरुवारी) होणार आहे.

आधुनिक सावित्रींनी दिले एकमेकींच्या पतींना जीवनदान

$
0
0
आपल्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी दोन आधुनिक सावित्रींनी आपल्या किडनीचे दान करण्याची इच्छा व्यक्त केली खरी; पण रक्तगट न जुळल्याने दानाची इच्छा अर्धवटच राहिली. दानाची अर्धवट राहिलेली ही इच्छा अन्य पेशंटच्या बाबतीत मात्र, पूर्ण झाली. मात्र, काळाची गरज लक्षात घेता या दोन सावित्रींनी एकमेकांच्या पतींना किडनीचे दान करीत परोपकाराचे पुण्य पदरी पाडून घेतले.

चष्मेधारकांचा नंबर होणार कमी

$
0
0
लग्न असो अथवा सरकारी नोकरी, खेळ असो की अॅक्टिंग यामध्ये पुढे जाण्याची, स्वप्ने साकार करण्याची आहे; पण जाड भिंगांचा चष्मा असेल तर तो त्यामधील अडथळा ठरतो; पण चिंता नको!

'RTO' च्या गोंधळावर विद्यार्थ्यांनी ठेवले बोट

$
0
0
लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये समांतर आणि रिव्हर्स पार्किंग आणि वेगवेगळी वळणे, चढ-उतार आदी बाबींचा समावेश असलेला टेस्टिंग ट्रॅक उभारण्यात यावा... शिवाय गाडीला जीपीएस यंत्रणा बसवून मगच चाचणी घेतली जावी.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images