Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मलनिस्सारण प्रकल्पाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून बुटी स्ट्रीट येथे उभारण्यात येणाऱ्या पहिल्या मलनिस्सारण प्रकल्पाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असून, बोर्डाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

प्रवासी दिन ‘एसटी’ स्टँडवरच

$
0
0
एसटीच्या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रवासी दिनाला प्रवाशांकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे. शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथील बसस्थानकांवर मंगळवारी आयोजित करण्यात आलेला दुसऱ्या प्रवासी दिनाच्या दिवशी एकही तक्रार नोंदवण्यात आली नाही.

‘निजामुद्दीन’ची प्रतीक्षा संपणार

$
0
0
पुण्याहून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना वेटिंगलिस्ट खूप असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा धावणारी पुणे ते लखनऊ एक्स्प्रेस आणि दोन वेळा धावणारी पुणे-निजामुद्दीन दुरान्तो एक्स्प्रेस दररोज सोडण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

सर्व पालिका हॉस्पिटलमध्ये रेबीजची लस उपलब्ध

$
0
0
शहरात कुत्रा चावण्याचे वाढते प्रकार लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये रेबीजची लस देण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

‘रेबीज’च्या नियंत्रणासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त कधी?

$
0
0
विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढल्याने माणसाला कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये काही वर्षांत वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

स्पर्धेला नवी ’दृष्टी’ देण्याचे नेत्रतज्ज्ञांपुढे आव्हान

$
0
0
अनेक अंधाना ‘दृष्टी’ देण्यासाठी स्वतंत्र स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणारे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर डोळ्यांच्या उपचारांतील ‘पायोनियर’ समजले जातात. पुणे महापालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन आज गौरविण्यात येणार आहे.

बंगाली लेखकाची बहिणीविरुद्ध तक्रार

$
0
0
कोलकाता येथील मालमत्ते​वरून भावा-बहिणीचे भांडण विकोपाला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंगाली तसेच हिंदी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकाने डेक्कन पोलिस ठाण्यात ब​हीण आणि मेव्हण्याविरुद्ध मेल आयडी हॅक करून त्याद्वारे बदनामीकारक मेल पाठविल्याची तक्रार दिली आहे.

‘राष्ट्रवादी’च्या दोन्ही मंत्र्यांनी बैठका घेतल्या कशा?

$
0
0
‘आदर्श अहवालात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा सहभाग नसल्याचा दावा करण्यात येत असला, तरी दोन्ही मंत्र्यांनी कोणत्या अधिकारात बैठका घेतल्या, याचाही खुलासा उपमुख्यमंत्र्यांनी करावा’, अशी मागणी आमदार गिरीश बापट यांनी केली.

बहुचर्चित ‘माफी’ प्रकल्पाचे १५ जानेवारीला ‘टेक ऑफ’

$
0
0
पुणे विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठीच्या ‘मॉडर्नायझेशन ऑफ एअरफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ (माफी) या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचे ‘टेक ऑफ’ पंधरा जानेवारीला होणार आहे. त्यासाठी पंधरा जानेवारी ते पंधरा एप्रिल दरम्यान रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेत पुणे विमानतळाची धावपट्टी बंद राहणार आहे.

‘डेटा सिक्युरिटी’तर्फे पुणे पोलिसांचा सन्मान

$
0
0
‘डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ तर्फे देण्यात येणाऱ्या ‘एक्सलन्स इन कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ लॉ- इनफोर्समेंट एजन्सीज’ या पुरस्कारासाठी देशभरातून तीन तपास यंत्रणांमध्ये पुणे पोलिसांची निवड करण्यात आली होती.

विद्यापीठाच्या नोकरभरतीवर ‘मनविसे’चे प्रश्नचिन्ह

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये सध्या सुरू केलेल्या नोकरभरतीमध्ये विद्यापीठ प्रशासनानेच संबंधित जाहिरातीमधील बाबींचे पालन न केल्याची तक्रार ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने (मनविसे) केली आहे.

३ चाकी गाडी मिळाली; पण, पासिंगचे काय?

$
0
0
‘विद्यापीठाने आम्हाला तीनचाकी गाड्यांचे वाटप केले, त्याचा आनंदच आहे. या गाड्यांचे पासिंग करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीचा मात्र वैताग आला आहे. विद्यापीठातील ऑफिसर अशाच बिनपासिंगच्या गाड्या घरी घेऊन जातात का? अपंग आहोत म्हणून आम्हाला हा न्याय का?...’

उत्तरपत्रिकाच झाल्या ‘आउट ऑफ स्टॉक’!

$
0
0
गेल्या वर्षभरात झालेल्या गोंधळानंतरही पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कामकाज सुधारण्याची चिन्हे नाहीत. इंजिनीअरिंगच्या पेपरदरम्यान उत्तरपत्रिकांचा साठाच संपुष्टात आल्याची बाब आता प्रकाशात आली आहे.

तालुक्याची केस तालुक्यालाच चालवा

$
0
0
बारामती येथे राहत असलेल्या विवाहितेने बारामती कोर्टात केस दाखल न करता शिवाजीनगर कोर्टात दाखल केलेली केस फेटाळण्यात यावी, म्हणून पतीने दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे.

फ्रँकिंगला नकारामुळे नागरिकांची गैरसोय

$
0
0
दस्त नोंदणीसाठी फ्रँकिंग स्वीकारणे बंद या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने काढलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ घेऊन एलआयसी तसेच इतर कामांसाठी फ्रँकिंग करण्यास बँकांनी नकार दिल्याने मंगळवारी नागरिकांची गैरसोय झाली.

मेट्रो प्रकल्पाचा निधी जलशुद्धीकरणासाठी

$
0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचा निधी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी वळविण्याचे ‘नवल’ स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आले.

बिल्डरांच्या फायद्यासाठी ‘डिफर्ड पेमेंट’ने रस्ते

$
0
0
शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ‘डिफर्ड पेमेंट’द्वारे आठ महत्त्वाच्या रस्त्यांचीच निवड करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

चुकीचे नकाशे देणा-या अधिका-यावर कारवाई करा

$
0
0
सिंहगड रोडवरील गणेश मळा येथील शिवप्रसाद सोसायटीमध्ये बांधकाम परवानगी देताना सादर केलेल्या बनावट कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता; तसेच सर्वेक्षण न करता पालिका प्रशासनाने ही परवानगी दिली आहे.

तरुणांत वाढतेय इस्रोची क्रेझ

$
0
0
सोशल मीडियात सर्वाधिक चर्चेचे विषय ठरण्याचा मान भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आणि मंगळ मोहिमेने मिळविला आहे. फेसबुकवर सर्वाधिक चर्चेचे विषय ठरलेल्यांमध्ये नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, आयफोन ५ एस आणि रघुराम राजन यांच्यानंतर इस्रोने सोडलेल्या मंगळयानाचा क्रमांक असल्याचे समोर आले आहे.

सोलापूरमध्ये दहशतवादी

$
0
0
मध्य प्रदेशातील खांडवा तुरुंगातून पळून गेलेला ‘सिमी’ संघटनेच्या दहशतवाद्यांनी सोलापूर येथे आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेश येथील दहशवाद विरोधी पथक (एटीएस) मंगळवारी सोलापूरमध्ये छापे घालत संशयितांकडे विचारपूस केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images