Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोनसाखळी चोरी : तरुणाला २ वर्षे सक्तमजुरी

$
0
0
चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला दोन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

कोरेगाव पार्क परिसरात विद्यार्थ्याला लुटले

$
0
0
हडपसर येथून पुणे स्टेशनला विद्यार्थ्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाने आपल्या दोघा साथीदारांच्या मदतीने साधू वासवानी पुलाखाली लुटले. तरुणाच्या पाकिटातील दोन हजार रुपये, एटीएम कार्ड आणि मोबाईल हँडसेट असा १२ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे.

अनधिकृत बांधकामांवर वडगावशेरीत कारवाई

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागातर्फे वडगावशेरी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून १० हजार स्क्वेअर फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

PMP च्या तक्रारींसाठी ‘फेसबुक’चा आधार

$
0
0
पीएमपीच्या सेवेबद्दल तुम्हाला जर तक्रार असेल तर त्याची नोंद तुम्ही फेसबुकवर करू शकणार आहात. आतापर्यंत बंद असलेले पीएमपीचे फेसबुक पेज पुन्हा एकदा सुरू झाले असून साडेतीन हजार नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.

यंत्रणेतील दोषामुळे शिकाऊ परवाना ठप्प

$
0
0
वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना काढण्यासाठी घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा चार दिवसांपासून बंद असल्यामुळे आरटीओमध्ये शिकाऊ परवाना देण्याचे काम ठप्प झाले आहे.

अॅम्ब्युलन्स अटेंडन्स पदाच्या परीक्षेत गैरव्यवहाराची तक्रार

$
0
0
महापालिकेत गाजलेल्या ज्युनिअर इंजिनीअर परीक्षा गैरव्यवहारापाठोपाठ पालिकेने रविवारी घेतलेल्या ‘अॅम्ब्युलन्स अटेंडन्स’ या पदांच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार काही परीक्षार्थींनी केली. पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी परीक्षा हॉलमध्ये येऊन काही मोजक्या परीक्षार्थींना उत्तरे पुरविल्याचा आरोप परीक्षार्थींनी केली.

शिवनेरी गडाचे दरवाजे झाले बुलंद

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीचे दरवाजे आता अधिक बुलंद झाले आहेत. तब्बल आठ लाख रुपये खर्च करून बनविलेले तीन महाकाय दरवाजे, तीन ऐतिहासिक दगडी चौकटींत नुकतेच बसविण्यात आले आहेत.

बाणेर-बालेवाडीत उद्यानांची वानवा

$
0
0
पेरू आणि बोरांसाठी प्रसिद्ध असणा-या बाणेर-बालेवाडी परिसरात उद्याने उभारण्यात सरकारच्या नियमांचीच आडकाठी येत आहे. ‘पर्यावरण वाचवा’ असा डंका पिटणारे सरकारच उद्यानांच्या आड येत असल्याने बाणेर -बालेवाडी परिसरासाठी उद्यान कधी मिळणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

माउथ ऑर्गनची जादू लिम्का बुकात

$
0
0
सुरभी म्युझिक अकादमीतर्फे भरविण्यात आलेल्या मिलाफ या माउथ ऑर्गनच्या सामूहिक वादनाच्या उपक्रमाची लिम्का बुकने दखल घेतली आहे. या वर्षी जूनमध्ये सुनील पाटील यांनी माउथ ऑर्गन वादनाची कार्यशाळा आयोजित केली होती. त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर सामूहिक वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

विवाहितेची आत्महत्या

$
0
0
चाकण येथील दावडमळ्यात (ता. खेड) एका २३ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२२ डिसेंबर) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

स्कूलबस धोरण शाळांनी राबवावे

$
0
0
‘खासगी वाहन अथवा रिक्षांमधून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन त्याची नोंद शालेय वाहतूक कमिटीने ठेवणे गरजेचे आहे. ही समिती प्रत्येक शाळेत प्रत्यक्ष कार्यरत असावी आणि स्कूलबस धोरण प्रत्येक शाळेने राबविणे गरजेचे आहे,’ असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

स्नेहसंमेलने समताधिष्ठित हवीत...

$
0
0
तीन दशकांहून अधिक काळ मुख्याध्यापक पदावरून निरनिराळे शैक्षणिक प्रयोग राबवणाऱ्या मीना चंदावरकर यांना शाळांमधल्या स्नेहसंमेलनांबाबत काय वाटते, याविषयी त्यांच्याशी नीला शर्मा यांनी केलेली बातचीत.

मावळमधून हर्षवर्धन सुखात्मेंना लोकसभेसाठी उमेदवारी

$
0
0
नवभारत डेमोक्रेटिक पार्टीतर्फे मावळ लोकसभा मतदारसंघासाठी हर्षवर्धन सुखात्मे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) सुरेश बंगारा आणि पुणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार विनिता देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी ही घोषणा करण्यात आली.

अल्पवयीन मुलीला पळविले

$
0
0
रहाटवडे (ता. हवेली) येथे राहणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून बाहेरगावी पळवून नेल्याप्रकरणी देविदास आबाजी चौधरी, निखिल उर्फ दादा रघुनाथ चौरघे, कुमार बाजीराव कांबळे (सर्व रा. रहाटवडे) यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बारामतीतील तापलेले पाणी अखेर उकळले

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात, पश्चिम जिरायती पट्ट्यात पिण्याच्या पाण्यासाठी गेली ४५ वर्षांपासून टाहो फोडणाऱ्या जनतेच्या उद्रेकाचा प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आला. सुमारे २२ गावांचा दुष्काळी दौरा करीत असताना तेथील ग्रामथांनी सभा उधळून लावली.

अनाथांसाठी १४५ वर्षांपासून जुन्नर बॉइज होम बनलेय ‘सांता’

$
0
0
आनंद देण्याचा सण ख्रिसमस सर्वत्र साजरा होत असताना, जुन्नरमध्ये गेल्या १४५ वर्षांपासून अनाथांसाठी ‘सांता’ बनून कार्य करणाऱ्या जुन्नर बॉईज होम संस्थेचे कार्य उल्लेखनीय असेच आहे.

आळंदीतील रस्ते रुंद होणार

$
0
0
श्री क्षेत्र आळंदी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या भू-संपादनाचे काम पूर्ण झाले असून, सदर भू-संपादित क्षेत्रामध्ये असणारी बांधकामे पाडून रस्ते प्रशस्त करण्याच्या धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

विकास करण्यासाठी घेतले लोहगावला दत्तक

$
0
0
‘राज्यसभेचा खासदार असल्यापासून लोहगावच्या विकासावर मी भर दिला आहे. विकासाच्या दृष्टीने हे गाव मी दत्तकच घेतले आहे. माझ्या खासदार निधीतून येथील विविध विकासकामांसाठी आत्तपर्यंत सुमारे एक कोटी रुपये मी दिले आहेत,’ असे सांगून खासदार सुरेश कलमाडी यांनी या गावातील आखाड्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध देण्याचे आश्वासन दिले.

विश्रांतवाडीतील नागरिकांचा पुनर्वसन योजनेला विरोध

$
0
0
विश्रांतवाडीमधील पुनर्वसन योजना राबविण्यास विश्रांतवाडी रहिवासी संघाने कडाडून विरोध केला आहे. या ​रहिवासी संघातर्फे नुकतेच घेण्यात आलेल्या जनमत चाचणी सभेत या योजनेला विरोध करण्यात आला.

खरेदीच्या बहाण्याने ९५ लाखांची फसवणूक

$
0
0
शुक्रवार पेठेतील व्यावसायिकाकडून मेटल शिट, स्टेनलेस स्टीलची खरेदी करून ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>