Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१ दिवसात १ कोटीची वसुली

0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) कार्यालयाने शहरातील विविध दुकानांमध्ये तपासणीअंतर्गत केलेल्या कारवाईतून एक दिवसात एक कोटी पाच लाख रुपयांची वसुली करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५२ लाखांच्या दंडाची कारवाई एकाच दुकानावरच करण्यात आली आहे.

थंडीला ब्रेक; तापमानात वाढ

0
0
सलग दोन आठवडे कडाक्याच्या थंडीचा सामना केल्यानंतर रविवारी पुण्यातील किमान तापमानात वाढ होऊन तापमान दहा अंशांच्या जवळपास पोहोचले. शहरात रविवारी ९.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

१० वी, १२ वी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही

0
0
बारावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०१४ पासून, तर दहावीची लेखी परीक्षा ३ मार्च २०१४ पासून सुरू होत असल्याचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

आकृत्यांसंबंधीची भूमिका जाहीर करा

0
0
दहावीच्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ विषयाच्या पुस्तकामधील आकृत्यांविषयी घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बोर्ड) आपली भूमिका तातडीने जाहीर करावी, अशी मागणी आता विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे.

पदावनतीची ‘पनवती’

0
0
पुणे पोलिस दलातील नव्वद फौजदारांना पदावनतीचे आदेश देण्यात आले असून, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या पनवतीमुळे सहायक फौजदार कमालीचे नाराज झाले आहेत. या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

सासवड पालिकेवर खटल्याचे सावट

0
0
प्रक्रिया न करताच सांडपाणी कऱ्हा, चांबळी नदीपात्रात उघड्यावर सोडल्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने सासवड नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. सांडपाणी नदीत सोडण्याची कारणे देण्यासाठी १५ दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.

ऊसच ‘पितो’ ७५ टक्के पाणी

0
0
‘राज्यभरात सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी तब्बल ७५ टक्के पाणी ऊस उत्पादक शेतकरी वापरत असल्याने इतर पिकांना अत्यल्प पाणी उपलब्ध होते.

मेट्रोच्या मंजुरीसाठी महिन्याचा अवधी

0
0
मेट्रो प्रकल्पाच्या कामाची सुरुवात नियोजित आराखड्यानुसार पुढील वर्षी एप्रिलमध्ये करायची झाल्यास त्याला जानेवारीअखेरपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

सुसाट वेगाचे ४ इंजिनीअरर्स बळी

0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर वडगावजवळील ब्राह्मणवाडी येथील संघवी मुव्हर्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुसाट वेगाने येणाऱ्या कारच्या अपघातात पुण्यातील चार आयटी इंजिनीअर जागीच ठार झाले. पर्यटनासाठी लोणावळ्याला गेलेले हे सर्वजण पुणे परिसरातील आयटीपार्कमध्ये कामाला होते.

दारूबंदीसाठी सरपंचांचे उपोषण

0
0
दारूबंदीसाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सरपंचानेच देण्याचा प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे. शिर्सुफळमध्ये दारूबंदी करण्याचा ठराव ग्रामसभेने मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याच्या निषेधार्थ एक जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सरपंच जवाहर सोनवणे यांनी सांगितले.

दारूबंदीसाठी सरपंचांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

0
0
दारूबंदीसाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सरपंचानेच देण्याचा प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे. शिर्सुफळमध्ये दारूबंदी करण्याचा ठराव ग्रामसभेने मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याच्या निषेधार्थ एक जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सरपंच जवाहर सोनवणे यांनी सांगितले.

भू-विकास बँकेचे कर्मचारी वेतनाविना

0
0
थकित कर्जे व गैरव्यवस्थापनामुळे दिवाळखोरीत गेलेल्या भू-विकास बँकेच्या शंभरहून अधिक कर्मचा-यांना गेल्या वर्षभरापासून वेतनाचा एक छदामही मिळालेला नाही. वेतनाअभावी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

हृदय, फुप्फुस प्रत्यारोपणासाठी मिलिटरी हॉस्पिटल सज्ज

0
0
हृदय शस्त्रक्रिया आणि क्षयरोगावरील उपचारांमध्ये आघाडीवर असलेल्या मिलिटरी हॉस्पिटलच्या कार्डिओ थोरॅकिक (एमएच -सीटीसी) सेंटरमध्ये येत्या वर्षात हृदय आणि फुफ्फुसांचे प्रत्यारोपणही सुरू करण्यात येणार आहे.

कमांड हॉस्पिटलला ‘मॉडर्न लूक’

0
0
लष्करातर्फे वानवडी येथील कमांड हॉस्पिटलची वेबसाइट लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट ऑनलाइन घेता येणार आहे. तसेच, कमांड हॉस्पिटलमध्ये केलेल्या विविध चाचण्यांचे रिपोर्टही ऑनलाइन पाहता येणार आहेत.

साहित्य महामंडळाच्या महाकोषाला मदत करा

0
0
मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन दरवर्षी साहित्य संमेलनाला मदत करेलच पण दानशूर साहित्यप्रेमींनीही या संमेलनाच्या खर्चासाठी स्वेच्छेने मदत करावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केले आहे.

MRI, CT SCAN ची ‘PPP’तून राज्यात सुविधा

0
0
विविध रोग निदानाच्या वैद्यकीय चाचण्या करणे आता आवाक्याबाहेर झाल्याने राज्यातील ३५ जिल्हा हॉस्पिटलसह महिला हॉस्पिटलमध्ये सामान्यांना परवडतील अशा कमी दरात खासगी- सरकारी भागादारीतून (पीपीपी) सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ससूनच्या धर्तीवर बालेवाडीतही हॉस्पिटल

0
0
ससूनच्या धर्तीवरच पुण्यात बालेवाडी परिसरामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल उभारण्यास राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यासाठी प्राथमिक टप्प्यात दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.

अन्न सुरक्षेचे १२ लाख कुटुंबांना ‘कवच’

0
0
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून पुणे शहर व जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) सुमारे बारा लाख कुटुंबांना या योजनेचे सुरक्षा कवच लाभणार आहे.

पाषाणकडे पाठ… सिंहगड, उजनीला गजबजाट!

0
0
कोणत्याही नकाशाशिवाय किंवा पाट्या वाचता येत नसतानाही हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी येणारे परदेशी पाहुणे पुणे परिसरात दाखल झाले आहेत.

मॉडेल कॉलनीत दुचाकीस्वार ठार

0
0
मॉडेल कॉलनी परिसरात लकाकी रोडवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images