Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रवीण आष्टीकर यांची पीएमपीमध्ये बदली

0
0
पुणे महापालिकेतील उपायुक्त प्रवीण आष्टीकर यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) सह व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

'आयपीएल'वर बोलू काही आले तरुणांच्या अंगलट

0
0
गेले महिना-दीड महिना सुरू असलेल्या 'आयपीएल'ने सर्वांवर मोहिनी घातली होती. ज्याच्या, त्याच्या तोंडी 'आयपीएल'च्याच गप्पा रंगल्याचे चित्र गल्लोगल्ली दिसून येत होते. मात्र, या गप्पाच काही टपरीचालकांच्या अंगाशी आल्या. 'आयपीएल' विषयी बोलतात, म्हणून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तिघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.

'स्कूल चले हम'व्हाया एसटी बस

0
0
ग्रामीण भागात शिकणा-या शालेय विद्यार्थींनीना घरापासून शाळेपर्यंत जाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून मानव विकास योजनेअंतर्गत एसटीतर्फे मोफत स्कूल बसची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अकरावीच्या अभ्यासक्रमावर रविवारी मार्गदर्शन सत्र

0
0
'एडनेक्सा' या संस्थेतर्फे येत्या रविवारी (१० जून) अकरावी सायन्सच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सकाळी साडेआठ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम होईल.

फॉर्म उशीरा पाठविल्याने २० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

0
0
परीक्षेचे फॉर्म्स वेळेत भरूनही कॉलेजकडून परीक्षा फॉर्म पाठविण्यास उशीर झाल्याचे सांगत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुण्यातील सुमारे वीस विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

'जरा जरा नाचके दिखा...'

0
0
हिप-हॉप, जॅझ, झुक, फुंक, बछाता, सालसा या पाश्चात्य डान्स प्रकारांबरोबरच कथक, बॉलिवूड यांसारखे भारतीय डान्स प्रकार पाहता यावेत आणि तज्ज्ञांकडून त्याचे प्रशिक्षण घेता यावे, या हेतूने पुण्यात इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.

प्रबोधनकारांचा 'पावनखिंडीचा पोवाडा' रंगमंचावर

0
0
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी १९१८ साली लिहिलेल्या 'पावनखिंडीचा पोवाडा'चे सादरीकरण 'केशवायन' या कार्यक्रमाद्वारे होणार आहे. 'केशवायन'ची संकल्पना आणि निमिर्ती प्रबोधनकारांची नात आणि पुण्यातील ज्येष्ठ गायिका कीर्ती फाटक यांची असून त्यांच्या 'रंगोत्सव' संस्थेतर्फे पुण्यात १० जूनला हा कार्यक्रम दृश्य-नृत्य-नाट्य स्वरुपात होणार आहे.

भविष्याचा वेध घेणारे व्यापारीच टिकतील

0
0
मल्टिनॅशनल कंपन्या येताहेत, मोठेमोठे मॉल्सही वाढत आहेत. अशा परिस्थितीत व्यापा-यांसमोरची आव्हानेही वाढली आहेत. भविष्यात ही आव्हाने वाढणार असून, भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार काम सुधारणारे व्यापारीच भविष्यात टिकू शकतील, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी सोमवारी व्यक्त केले.

पोलिसांच्या छाप्यात बनावट प्रसाधने जप्त

0
0
शुक्रवार पेठेतील 'ब्युटी प्राइड' या दुकानात पोलिसांनी घातलेल्या छाप्यात ५४ हजार रुपयांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली आहेत. 'ओले' कंपनीची प्रसाधने असल्याचे भासवून बनावट मालाची विक्री होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

वाढते औद्योगिकरण गिधाडांच्या मुळावर

0
0
भीमाशंकर अभयारण्याच्या सीमेलगत आज विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाचा नाश मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे केवळ पर्यावरण दिन किंवा वनदिन साजरा करून निसर्गाचे रक्षण व संवर्धन कधीच होणार नाही.

परीक्षेच्या चुकांवर ऑनलाइन 'क्लिक'

0
0
पुणे विद्यापीठातील सर्व पदवी-पदव्युत्तर कोसेर्सचे परीक्षांचे फॉर्म हे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन स्वरूपातच भरून घेण्याचा स्वागतार्ह निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे पदवीला पहिल्या वर्षी विद्यार्थ्याने ऑनलाइन माहिती भरल्यावर हा सर्व माहितीसाठा विद्यापीठाच्या र्सव्हरवर जमा होणार आहे.

अस्थायी कर्मचा-यांचा आंदोलनाचा इशारा

0
0
सहकार खात्याच्या लेखापरीक्षण विभागातील अस्थाई कर्मचा-यांचे वेतन शासनाने गेल्या चार महिन्यांपासून थांबविले आहे. शासनाने लवकरात लवकर हे थकित वेतन द्यावे, अन्यथा राज्यभरातील लेखापरीक्षण विभागामधील अस्थाई कर्मचा-यांतर्फे शासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालिकेत रंगले 'व्हीजन'चे भजन

0
0
पुणे महापालिकेतर्फे आयोजित 'इंडिया म्युनिसिपल व्हीजन २०२०' च्या उद्घाटनास पक्षनेते आणि अनेक नगरसेवकांनी मंगळवारी दांडी मारली. त्यामुळे या विषयातील राजकारण पुन्हा समोर आले आहे. अनेक नगरसेवकांनी आपल्याला या कार्यक्रमाचे निमंत्रणच न मिळाल्याची टीका केली.

स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजच्या कामास २ महिन्यात सुरुवात

0
0
पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते दोन दरम्यान नव्याने बांधण्यात येणा-या 'फुटओव्हर ब्रिजच्या' कामाला दोन महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. ब्रिजच्या बांधकामासाठी आवश्यक असणारा निधी महिनाअखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

'राष्ट्रवादी' तालुकाध्यक्षांच्या निवडी रखडल्या; वाद कायम

0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष निवडीला वादाचे गालबोट लागले असून, जुन्नर व मुळशी तालुकाध्यक्ष निवडीवरून पक्षाला मोठी कसरत करावी लागली आहे. मुळशीचा वाद नवा कार्याध्यक्ष निवडून मिटविण्याचा प्रयत्न झाला तरी जुन्नरचा वाद मात्र कायम राहिला आहे.

दहा मिनिटांत सोन्याचे झाले लोखंड

0
0
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी स्कॅनर आणि काळ्या रंगाच्या पेट्या वापरत हातचलाखीने चौघा सराफांना गंडा घालणारे हे आरोपी अवघ्या दहा मिनिटांमध्ये गायब झाले. या टोळीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली असून पुणे-मुंबईसह नगरलाही तपास केला जाणार आहे.

शुक्राच्या अधिक्रमणावर ढगांचे अतिक्रमण?

0
0
शतकातून क्वचितच पाहण्यास मिळणा-या 'शुक्र अधिक्रमणा'ची संधी बुधवारी पुणेकरांना मिळेल की नाही, याबद्दल शंका आहे. सूर्य ढगांच्या आड गेल्यास शुक्राचा सूर्यबिंबावरील प्रवास पुणेकरांना पाहता येणार नाही. बुधवारी सकाळी आकाश ढगाळ असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

पुणेकर विद्यार्थी ठरताहेत दिशादर्शक

0
0
शेतीविषयक अज्ञानासह ग्रामीण भागाच्या विकासाकडे तरुणाई पाठ फिरवित असल्याची तक्रार चुकीची ठरवित पुण्यातील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च'च्या (आयसर) प्रणितसिंह मुलमरेड्डी या संशोधकाचे कृषिविषयक कृतिकार्यक्रमाचा आदर्श घालून दिला आहे.

तोडफोड करणारे आठ जण अटकेत

0
0
खंडणीसाठी पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनी कार्यालयात तोडफोड करुन तीन लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी आठ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कर्वेनगर घरफोडीतील आरोपींना पोलिस कोठडी

0
0
कर्वेनगर परिसरातील घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना दहा जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला. नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच तासाच्या आत या चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images