Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शाळांची ‘बेकायदा’ प्रवेश प्रक्रिया सुरूच

$
0
0
वेळापत्रक न पाळता दिलेले बालवाडी आणि पहिलीचे प्रवेश बेकायदा ठरणार असल्याचा इशारा देऊनही शहरातील काही शाळांनी प्रवेशाची प्रक्रिया सुरूच ठेवली असल्याने पालक मात्र गोंधळात आहेत.

विद्युत जाहिरात कंपनीच्या अधिका-याला सक्तमजुरी

$
0
0
बसस्टॉपवर थांबलेल्या एका इंजिनीअर तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याप्रकरणी एका विद्युत जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पप्पू पासलकरला ‘LCB’कडून अटक

$
0
0
पानशेतजवळील जांभळी गावात पप्पू उर्फ गोरक्ष गोपीनाथ तावरे (वय ३२) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खून करणारा प्रमुख संशयित आरोपी पप्पू पासलकर, रूपेश तावरे यांच्यासह सहा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले.

मांजरी येथे महिलेवर हल्ला

$
0
0
मांजरी येथे एका ५५ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून तसेच हातपाय बांधून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. महिलेने घातलेले दागिने चोरीस गेल्याने पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असला तरी हा घातपात प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

बल्क ‘एसएमएस’वर पोलिसांची नजर

$
0
0
तुम्हाला लॉटरी लागली आहे, इन्शुरन्स घ्या-लोन मिळवून देतो, अशा प्रकारचे बल्क ‘एसएमएस’ पाठवून सावज हेरण्याचा प्रकार करणाऱ्यांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पावले उचलली आहेत.

संगम पुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
संध्याकाळी पाच ही तशी संगम पूलावरची गर्दीची वेळ. तरीही नेहमीपेक्षा गर्दी जास्त वाटली. गर्दी कसली, म्हणून पाहायला गेलो, तर लक्षात आले, की एका महिलेने पुलावरून खाली उडी मारली आहे.

‘त्या’ पीडितेला मिळाले ‘मनोधैर्य’

$
0
0
बलात्कार, अत्याचार किंवा अॅसिड हल्ल्यांमधील बळींसाठी सुरू केलेल्या मनोधैर्य योजनेमध्ये एका अल्पवयीन मुलीला दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य नुकतेच मंजूर करण्यात आले. योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरुपाची मदत करण्यात आली आहे.

खासगी हॉस्पिटलला चाप

$
0
0
खासगी हॉस्पिटल, दवाखाने यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ कायद्यात अनेक त्रुटी आहेत. त्याच कायद्याची राज्यात अंमलबजावणी न करता महाराष्ट्रासाठी डॉक्टर आणि पेशंटच्याहिताच्या दृष्टीने नवा स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे.

अभिषेकी उद्यानाला ‘जैसे थे’ चे आदेश

$
0
0
मुंबई हायकोर्टाने ‘जैसे थे’ आदेश दिल्यामुळे कोथरूडमधील पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान नागरिकांसाटी खुले करता येत नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत एका तारांकित प्रश्नावर स्पष्ट केले.

कच-याचा प्रश्न सोडविणार

$
0
0
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहराच्या आसपासच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या महिन्याअखेर पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन जागेचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले.

विरोधी पक्ष आमदारांना २ कोटींचा निधी

$
0
0
सत्ताधारी आमदारांना रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा निधी देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात ओरड केल्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनाही आता या कामांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

२ लाख नागरिकांना 'DBTL' चा लाभ

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेमध्ये (डीबीटीएल) सहभागी होणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढू लागली आहे. मंगळवारअखेर शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार नागरिकांच्या खात्यात डीबीटीएलची रक्कम जमा झाली आहे.

कलमाडींच्या छायाचित्रांची काँग्रेस भवनमधून गच्छंती

$
0
0
काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या खासदार सुरेश कलमाडी यांचा फोटो यापूर्वीच काँग्रेस भवन मधून हटविण्यात आल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

‘राजीनाम्याचे नाटक’

$
0
0
वडगावशेरी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार बापू पठारे अपयशी ठरले असून आगामी निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानेच त्यांनी राजीनामा देण्याचे नाटक केले आहे, असा आरोप या भागातील नी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

भाताचा घास महागच

$
0
0
देशात यंदा तांदळाचे उत्पादन एक कोटी टनाच्या पुढे गेले असले तरी विदेशातून वाढलेल्या मागणीमुळे पुणेकरांना भाताचा घास खाणे महाग होणार आहे. यंदाच्या वर्षी देशात आतापर्यंत एक कोटी एक लाख टनापर्यंत तांदळाचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा उत्पादनामध्ये सहा लाख टनांची वाढ झाली आहे.

राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे

$
0
0
वडगाव शेरी भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई न करता ही सर्व बांधकामे नियमित करावी, या मागणीसाठी आमदार बापू पठारे यांच्या पाठोपाठ या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेरा नगरसेवकांनी राजीनाम्याचे शस्त्र उपसले आहे.

लोणावळा-दौंड लोकल पुढील वर्षीपासून

$
0
0
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी लोणावळा-दौंड लोकलसेवा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून हाती घेण्यात आलेले पुणे ते दौंड मार्गावरील विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू असून सप्टेंबर २०१४ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, त्यानंतर या मार्गावर लोणावळा- दौंड लोकलसेवा सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने सुरू केला असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विभागातील प्राध्यापक विनावेतन

$
0
0
राज्यातील इतर सर्व विभागांमधून प्राध्यापकांना आपल्या नियमित पगारांसोबतच सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळाली असताना, पुणे विभागातील प्राध्यापक या सर्व लाभांपासून वंचितच राहिले आहेत.

मागण्या अमान्य झाल्यास संप

$
0
0
औषधांच्या खरेदी विक्रीची बिले दाखविणे, सहजपणे मिळणाऱ्या औषधांसाठी ‘प्रिस्क्रिप्शन’ अशा जाचक अटी राज्य सरकारने दूर केल्या नाही, तर येत्या १८ डिसेंबरपासून राज्यातील औषध विक्रेत्यांचा बेमुदत कायम ठेवण्याचा इशारा राज्य केमिस्ट संघटनेने दिला आहे.

७ पिस्तुल आणि १४ काडतुसे जप्त

$
0
0
सुसखिंड येथे पकडलेल्या खुनातील आरोपी व त्याच्या दोघा साथीदारांकडून सात पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या आरोपीला नेवासा येथील दोघांनी पिस्तुल पुरविल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images