Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रशासनामुळे ‘सॅप’ला उशीर

0
0
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) ‘सॅप’ यंत्रणा कार्यान्वित करण्यास संस्थेमधील राष्ट्रवादी कर्मचारी संघटनेचा कधीही विरोध नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी संस्थेमध्ये घडणाऱ्या सर्व गैरप्रकारांना केवळ प्रशासनाची उदासीनताच जबाबदार असल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला.

पेशंटच्या ‘एंट्री’साठी एजंटगिरी

0
0
मानसिक रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी कोर्टाच्या परवानगीऐवजी थेट ‘ऐच्छिक’ प्रवेश देण्याचे प्रकार येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये सर्रास सुरू आहेत. कोणाच्याही परवानगीविना पेशंटना प्रवेश देण्यासाठी कर्मचारीच ‘एजंटगिरी’ करीत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे.

पेशंटचे हित की नियमांचे पालन?

0
0
‘शेड्युल एच’ अंतर्गत येणाऱ्या औषधांच्या खरेदीसाठी प्रिस्क्रिप्शन असावेच; मात्र औषधांच्या दुकानात खात्रीलायक उपलब्ध होणाऱ्या औषधांसाठी गरजेचे नसावे, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.

केंद्राचे आठ कोटी धूळ खात

0
0
पुणे विद्यापीठात विद्यार्थी सहाय्यता केंद्र उभारणीसाठी विद्यापीठाने डिपॉझिट म्हणून जमा केलेले आठ कोटी रुपये वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धूळ खात पडून आहेत.

हल्लाप्रकरणी पराग शहाला अटक

0
0
नातूबाग येथील कबड्डी मैदानावरून झालेल्या वादातून कबड्डी संस्थेचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसबा विभागाचे पदाधिकारी राजेंद्र उर्फ अण्णा देशमुख यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गॅस एजन्सीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

संमेलनात राजकीय नेत्यांची मांदियाळी

0
0
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा सहभाग असू नये, अशी मागणी दीर्घकाळापासून साहित्य वर्तुळातून केली जात असतानाही सासवड येथील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय प्रभाव कायम राहणार आहे.

वादग्रस्त ठरल्यानंतरही महिला महोत्सव

0
0
महापालिकेने गेल्या वर्षी आयोजित केलेला महिला महोत्सव वादग्रस्त ठरलेला असतानाच महिला प्रशिक्षणाच्या नावाखाली यंदा पुन्हा महिला महोत्सव आयोजित करण्याचा घाट पालिकेतील महिला सभासदांनी घातला आहे.

सिग्नल तोडणाऱ्यांचे लायसन्स निलंबित

0
0
सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांना जरब बसावी, म्हणून वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत दोन दिवसांमध्ये २७६ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस ‘आरटीओ’कडे केली आहे.

सोनसाखळीचोरांचा उच्छाद

0
0
शहरात गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी हिसकावण्याच्या तेरा घटना घडल्या असून, पन्नासहून अधिक तोळे वजनाचे दागिने हिसकावून नेण्यात आले आहेत. सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन टोळ्या जेलमधून सुटल्या असून, त्यांनीच शहरात उच्छाद मांडल्याचा पोलिसांना संशय आहे.

टेम्पोच्या धडकेत दाम्पत्य मृत्युमुखी

0
0
खेड शिवापूर येथे दर्ग्याच्या दर्शनास निघालेल्या दुचाकीवरील दाम्पत्याला पाठीमागून वेगात आलेल्या दुधाच्या टेम्पोने चिरडले. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मांगडेवाडी येथे पेट्रोलपंपानजीक गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

धडक कारवाईमुळे LBT वसुलीत वाढ

0
0
पालिकेने सुरू केलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसून तपासणी करण्याच्या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद पालिकेला मिळत आहे.

विकासासाठी नागरिकांचाही आराखडा

0
0
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत मोकळ्या जागेची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, तर प्रशस्त जंगली महाराज रोडवर रस्ता ओलांडणे हे नागरिकांसाठी एक दिव्यच बनले आहे…

फर्ग्युसन कॉलेजला स्वायत्तता

0
0
फर्ग्युसन कॉलेजला स्वायत्तता देण्याबाबतचा प्रस्ताव पुणे विद्यापीठाच्या अॅकॅडेमिक कौन्सिलने गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजूर केला. कॉलेजांचे अॅकॅडेमिक ऑडिट करण्यावरही शिक्कामोर्तब झाले असून, शैक्षणिक कामगिरीप्रमाणे कॉलेजांची वर्गवारी करण्यात येणार आहे.

सॉफ्टवेअर पकडणार ‘लेनकटिंग’

0
0
‘एक्स्प्रेस वे’वर बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या वाहनांवर आता विशेष सॉफ्टवेअरची नजर राहणार आहे. विशेष म्हणजे, ‘एक्स्प्रेस वे’वर अपघाती सख्खा भाऊ गमाविलेल्या तन्मय पेंडसे आणि त्याने स्थापलेल्या फुलोरा फाउंडेशन यांचे हे योगदान आहे.

आईकडे दुर्लक्ष; कोर्टाचा फटका

0
0
म्हातारपणाची काठी म्हणून ज्या मुलांकडे पाहिले त्यांनीच ऐन वेळी पाठ फिरविल्यामुळे उतारवयात हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असलेल्या एका ७० वर्षीय आईला कोर्टाने दिलासा दिला आहे.

स्वस्ताईचा सांगावा?

0
0
भाजीपाला आणि फळे ही बाजारसमितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पुण्यात दिली.

रोहित गोळे यांना पुरस्कार

0
0
‘सलाम पुणे’ या संस्थेच्या वतीनं दिला जाणारा उत्कृष्ट युवा पत्रकाराचा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे कॉपी एडिटर रोहित गोळे यांना जाहीर झाला आहे. साहित्य आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांना गौरवण्यात येणार आहे.

स्वस्त नाटक योजनेचं आता चौथं पर्व

0
0
अल्प शुल्कामध्ये दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘स्वस्त नाटक योजने’चं चौथं पर्व लवकरच सुरू होत आहे. मर्यादित सदस्य संख्या असणाऱ्या या योजनेची नावनोंदणी आजपासून सुरू झाली आहे.

रविवारी रंगणार ‘आज या देशामध्ये...’

0
0
शब्दवेधतर्फे गायक-अभिनेता चंद्रकांत काळे दिग्दर्शित ‘आज या देशामध्येऽऽऽ’ हा अभिवाचनाचा प्रयोग रविवारी (दि. ८) होणार आहे. अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि स्वतः काळे हे सादरीकरण करणार आहेत

अवैध वाहतूक रोखण्यासाठी फक्त एक पथक

0
0
अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढत असताना त्यांच्यावर कारवाईसाठी संपूर्ण जिल्ह्यात पाच जणांचे एकच पथक नेमण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून होणारी कारवाई कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images