Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच

$
0
0
कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात दोन दिवसांत तीन सोनसाखळी हिसकावण्यात आल्यात. या घटनांमध्ये साडे तेरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत शहरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे.

...तर इच्छेविरुद्ध काँक्रिटीकरण नको

$
0
0
शहरातील विकासकामांतर्गत गल्ली-बोळातील काँक्रिटीकरणावरच अधिक भर देणाऱ्या माननीयांच्या कारभाराला आता परिसरातील सोसायट्यांनी विरोध दर्शविला आहे. रस्त्याची पातळी पूर्वीप्रमाणे एकसमान होणार नसेल, तर आमच्या इच्छेविरुद्ध काँक्रिटीकरण लादू नये, असे पत्र हॅपी कॉलनीतील सोसायट्यांतर्फे पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

सेवाकर चुकविल्याबद्दल पुण्यात कारवाई

$
0
0
बांधकाम सेवा पुरविण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून वसुली केलेल्या ६२ लाख ४३ हजार रुपये सेवाकराचा सरकारकडे भरणा न करता फसवणूक केल्याप्रकरणी उत्पादनशुल्क आणि सेवाकर विभागाने निगडीतील ‘क्रिएटीव्ह कन्स्ट्रक्शन’वर कारवाई केली.

बाणेरहून हिंजवडीकरिता मुळा नदीवर पूल

$
0
0
बाणेरहून थेट हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळा’ने (एमआयडीसी) तयार केला आहे. या पुलामुळे हिंजवडीमध्ये जाण्यासाठी करावी लागणारी कसरत कमी होण्याची शक्यता आहे.

लगतच्या भागांचाही भाव वाढला

$
0
0
मोकळ्या जागांचा तुटवडा आणि आवाक्याबाहेर गेलेले दर यांमुळे विकासाचे केंद्र शहरालगतच्या भागात सरकताना आढळून आले आहे. शहरालगत थेऊर, हांडेवाडी, वडकी, उरूळी देवाची अशा अनेक भागांच्या रेडी रेकनरच्या दरात तब्बल दुपटीने वाढ सुचविण्यात आली आहे.

२.५ कोटी रुपयांची निबंधकांकडे तफावत?

$
0
0
फ्लॅटपासून जमीन खरेदी-विक्रीपर्यंतची दस्तनोंदणी करणारी दुय्यम निबंधक कार्यालये ही गैरमार्गाने पैसे कमविण्याची खाण झाली असून, हवेली क्रमांक ९ या दुय्यम निबंधक कार्यालयात तब्बल अडीच कोटी रुपयांची आर्थिक तफावत आढळली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

अभ्यासक्रमांचीही मोडतोड?

$
0
0
पदव्युत्तर पातळीवर ‘आधी कळस आणि मग पाया’ रचण्यासाठी संबंधित वर्गांच्या अभ्यासक्रमांमध्येच तडजोड करण्यात आली आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कला आणि वाणिज्य शाखेमधील विविध विषयांची विद्यार्थी संख्या, विषयाची काठीण्यपातळी वाढविल्यानंतर त्याचा विद्यार्थ्यांच्या संख्येवर होणारा परिणाम लक्षात घेत अभ्यासक्रम तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याचा विकास ८८ हजार कोटींचा!

$
0
0
भविष्यकाळात होणारी वाढ लक्षात घेऊन शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अंतर्भाव असलेल्या ८८ हजार कोटी रुपयांच्या शहर विकास आराखड्याला (सीडीपी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात‌ आली‌.

लाचखोर तलाठ्यावर गुन्हा दाखल

$
0
0
सातबाऱ्यावरील ‘लीज पेंडन्सी’ची नोंद कमी करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठी, मंडलाधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

मालमत्ता करातून वाढणार १०० कोटी

$
0
0
एलबीटीमुळे सुमारे तीनशे रुपयांचा तोटा सहन करावा लागणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधण्यास सुरूवात केली असून मालमत्तांच्या सर्वेक्षणातून नव्याने १०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट गाठण्याचे ठरविले आहे.

चितेमध्ये उडी घेऊन आत्महत्या

$
0
0
धनकवडी स्मशानभूमीत पेटत्या निखाऱ्यांवर झोपून एका मनोरुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर नातेवाईक नसताना प्रकार घडला. केरबा गो​​विंद चव्हाण (वय ५५, रा. धनकवडी गावठाण) असे मृत्यू पावलेल्या मनोरुग्णाचे नाव आहे.

सर्दी खोकल्यालाही प्रिस्क्रिप्शन हवे!

$
0
0
सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, जुलाब, अॅसेडिटीसारखी औषधाच्या दुकानात मागणी केल्यानंतर सहजपणे मिळणारी गोळ्या-औषधे आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येणार नाहीत. परिणामी, साधे आजारही पेशंटला महागात पडण्याची शक्यता आहे.

अपघातात दाम्पत्य ठार

$
0
0
खेड शिवापूर येथे दर्शनास निघालेल्या दुचाकीवरील दाम्पत्याला पाठीमागून वेगात आलेल्या दुधाच्या टेंपोने चिरडले. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मांगडेवाडी येथे पेट्रोलपंपानजीक गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

‘आयटी’तील तरुणांनाही ‘तरंग’चा चस्का

$
0
0
रात्री उशिरा तसेच तासनंतास काम कराव्या लागणाऱ्या ‘आयटी-बीपीओ’ कंपन्यातील इंजिनीअर, बांधकाम साइटवरील मजूर ‘तरंग’ या गांजा आणि भांग मिश्रित गोळ्यांच्या आहारी गेल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या विभागाच्या तपासात समोर आली आहे.

मावळ, शिरूरसाठी शिवसेनेची तयारी

$
0
0
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेने आत्तापासूनच जोरदार तयारी चालविली आहे. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा संच बांधण्यास प्राधान्य दिले असून, त्यांना प्रबळ इच्छुकांकडून देश-विदेशातील सहलींच्या ऑफर येऊ लागल्या आहेत.

शिक्षकांनी वाचला तक्रारींचा पाढा

$
0
0
‘आम्ही विशेष मुलांना शिकविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, याची आम्हाला पुरेशी जाणीव आहे. मात्र, चौदा महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याने ही जाणीवच आम्ही विसरत चाललो की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे...’

देखभाल, दुरुस्तीवरच निधीची उधळण

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या गेल्या तीन महिन्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला असता, ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ असे चित्र झाल्याचे समोर आले आहे. बोर्डाच्या हद्दीत तीन महिन्यांत एकही नवीन विकास काम हाती घेण्यात आले नसून, देखभाल आणि दुरुस्तीवरच निधीची उधळण झाली आहे.

मलनिस्सारण कराचा बोजा

$
0
0
ब्रिटिशांनी वसविलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या ड्रेनेज यंत्रणेत बोर्डाने फारसा बदल केला नाही. त्यामुळे १९६ वर्षांमध्ये बोर्डाच्या परिसरात एकही मलनिस्सारण प्रकल्प उभा राहू शकलेला नाही.

घर खरेदीचा वेग मंदावला

$
0
0
चढे व्याजदर, महागातील वाढ यांच्यामुळे संभाव्य ग्राहक घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. त्यामुळे विक्री मंदावली असल्याची कबुली बांधकाम क्षेत्राने दिली आहे. महापालिकेकडे सादर प्रकल्प मंजुरीसाठी सादर होणारे अर्ज मंदावले आहेत, असे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष हेमंत नाईकनवरे यांनी बुधवारी सांगितले.

‘कन्या’ सायकलवरून कन्याकुमारीला

$
0
0
स्वामी विवेकानंदांच्या १५१ जयंतीनिमित्त पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या २० विद्यार्थिनी त्यांना अनोखी मानवंदना देणार आहेत. ‘पुणे ते कन्याकुमारी’ हे तब्बल १६०० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करण्याचे शिवधनुष्य या कन्या पेलणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images