Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंगळयान मंगळाकडे जाण्यास सज्ज

$
0
0
भारताच्या मंगळ मोहिमेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा शनिवारी मध्यरात्री (१२ वाजून ४९ मिनिटे) पार पडणार आहे. नियोजित वेळी यानाचे इंजिन २३ मिनिटांसाठी प्रज्ज्वलित करण्यात येईल. यातून मिळणाऱ्या ६४८ मीटर प्रतिसेकंद या वेगाच्या साह्याने मंगलयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परीघ पार करून मंगळाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहे.

गॅझेटला एकवीस दिवस का?

$
0
0
मोठ्या हाउसिंग कॉम्प्लेक्समधील वीस टक्के फ्लॅट गरिबांसाठी राखून ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबतचे राजपत्र (गॅझेट) अखेर शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर २९ नोव्हेंबर हा प्रसिद्धीचा दिनांक म्हणून नमूद करण्यात आला आहे. सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याचे गॅझेट प्रसिद्ध करण्यास २१ दिवसांचा कालावधी बिल्डर लॉबीला सवलत देण्यासाठीच लावण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

धर्मांध शक्तींना ‘क्लिन चिट’ नाही

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी धर्मांध शक्तींविरोधात सध्या पुरावे उपलब्ध नसले, तरी त्यांना ‘क्लिन चिट’ दिलेली नाही, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.

विठ्ठलाचा गाभारा सुवर्णजडित होणार

$
0
0
रस्ते, स्वच्छता आणि वारकऱ्यांसाठी इतर सुविधा उपलब्ध करून देत पंढरपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासह मंदिराचा गाभारा सुवर्णजडित करण्याचा संकल्प राज्यातील कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील प्रमुखांच्या बैठकीत नुकताच सर्वानुमते घेण्यात आला.

मॅरेथॉनमध्ये इथिओपियाची सरशी

$
0
0
पुण्याच्या २८ व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष आणि महिला या दोन्ही गटात इथिओपियाचे धावपटू विजेते ठरले.

‘एलबीटी’चा बागूलबुवा करू नका

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अंमलबजावणीपासूनच समज-गैरसमज, वाद-आंदोलने सुरू आहेत. आता तर पुणे महापालिकेने कारवाईदेखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करणे आवश्यक आहे.

आंबट-गोड अॅपल बोर

$
0
0
चवीला आंबट-गोड आणि आकाराने मोठे असणारे अॅपल बोर प्रथमच पुण्याच्या बाजारपेठेत आले आहे. या फळाचा आकार सफरचंदासारखा असल्यामुळे त्याचे नामकरण अॅपल बोर असे करण्यात आले आहे.

बाजाराला आला पालेभाज्यांचा बहर

$
0
0
थंडीचा जोर ओसरल्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आले आणि शेवगा वगळता अन्य सर्व भाज्या स्वस्त झाल्या आहेत.

पुजारी खून खटला : आरोपीचा आक्षेप फेटाळला

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरी याची ‘इन कॅमेरा’ साक्षीला बचाव पक्षाने घेतलेला आक्षेप मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे चौधरीची साक्ष ही आता इन कॅमेराच होणार आहे.

विमानतळासाठी नदीच्या प्रवाहावर परिणाम नाही

$
0
0
नवी मुंबई येथे बांधण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची उंची किती असावी, याचा अहवाल सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशनने (सीडब्ल्यूपीआरएस) तयार केला आहे. त्यामध्ये गादी नदीचा प्रवाह न वळविता आणि पनवेलमधील कमीत कमी घरांचे स्थलांतरण करून सुमारे एक हजार ६० हेक्टर जागेत विमानतळ बांधणे शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

कटुतेनंतर पुन्हा झाले मनोमीलन

$
0
0
लग्नानंतर जवळपास वीस वर्षांनी त्यांच्यात होऊ लागलेले वैचारिक मतभेद विकापोला गेल्यामुळे पती आणि चार मुलांना सोडून ती माहेरी परतली. चार वर्षे पतीला सोडून ​राहिलेल्या तिने पुन्हा पतीचे वागणे सुधारेल याची अपेक्षा सोडून दिली होती.

पुण्यात १५० ‘हार्ले-डेव्हिडसन’

$
0
0
‘हार्ले-डेव्हिडसन’च्या बाइकप्रेमींची पुण्यातील संख्या एक... दोन... तीन नसून, तब्बल दीडशे आहे; तसेच यात आणखी पंधरा जणांची भर लवकरच पडणार आहे. कंपनीचे नवे शोरूम अमनोरा येथे सुरू झाले आहे. या ठिकाणी आतापर्यंत पंधरा सुपरबाइकचे बुकिंग झाले आहे.

बंद लोकन्यायालय पुन्हा सुरू होणार!

$
0
0
शिवाजीनगर कोर्टात गेली दोन वर्षे बंद असलेले दैनंदिन लोकन्यायालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पक्षकारांना त्यांच्या केसेस सामोपचाराने आणि सामंजस्याने मिटविता याव्यात, यासाठी हे लोकन्यायालय सुरू करण्यात आले होते.

विना पासिंग रिक्षावाल्यांवर कारवाई

$
0
0
रिक्षा मीटरचे पासिंग करण्याची प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या रिक्षाचालकांवर एक जानेवारीपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळवी यांनी सांगितले.

चारा छावणीत ४० कोटींचा भ्रष्टाचार

$
0
0
सांगोला तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये ३० ते ४० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे सदस्य प्रफुल्ल कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. या भ्रष्टाचारामागे राष्ट्रवादीचेच स्थानिक नेते असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा दावाही कदम यांनी केला.

मातृभाषेतूनच शिक्षण हवे!

$
0
0
‘संकल्पना, शब्दसंख्या आणि भाषेशी शिक्षण निगडित असते. मातृभाषेला संस्कृती असल्याने मातृभाषेतूनच शिकवले पाहिजे. इंग्रजीला विरोध नाही; पण विचारांच्या गतिशीलतेसाठी मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे.

गोपुंना मरणोत्तर तन्वीर सन्मान

$
0
0
ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांना मरणोत्तर तन्वीर सन्मान, तर कणकवली येथील वामन पंडित यांना ‘तन्वीर नाट्यधर्मी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. रूपवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू आणि सचिव दीपा श्रीराम यांनी सोमवारी ही माहिती दिली.

कर्णबधिरांच्या भाषेची जडण-घडण हवी

$
0
0
कर्णबधीर आणि सर्वसामान्य मुलांमध्ये मूलभूत फरक आहे तो भाषेचा.. त्यामुळे त्यांना समकक्ष करण्यासाठी आणि मूळ प्रवाहात आणण्यासाठी गरज आहे ती..संवादाची. जागतिक अपंग दिनानिमित्त समस्यांचा घेतलेला वेध..

दुधाच्या दर्जाचा अहवाल बंधनकारक

$
0
0
दूध संघांकडून विक्री करण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाचा अहवाल वर्षातून दोन वेळा ‘अन्न आणि औषध प्रशासना’कडे (एफडीए) सादर करावा लागणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवरील ‘गॅरेज’ पोलिसांचे लक्ष्य!

$
0
0
शहरातील फुटपाथवर वाहने दुरुस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिस हाती घेणार आहेत. येत्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू होईल, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images