Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रस्त्यावर खिळे टाकणारे पोलिसांच्या रडारवर

$
0
0
रस्त्यावर खिळे टाकून वाहने पंक्चर करणाऱ्या ‘दुकानदारांना’ शोधण्याचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी शहरातील पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. या ‘दुकानदारांवर’ अधिकाधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सूचनाही सोळुंके यांनी दिल्या आहेत.

शहरात पुन्हा ढगाळ हवामान

$
0
0
राज्यभरात गुरुवारी वाढलेला थंडीचा कडाका शुक्रवारी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा कमी झाला. परंतु, शहरात शुक्रवारी ११.७ अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदले गेले. दरम्यान, पुढील दोन दिवस पुण्यासह राज्यात ढगाळ वातावरण राहून किमान तापमानात काहीशी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

उर्वरित ऑनलाइन पेपर लेखी परीक्षेनंतर

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या पाच विषयांची ऑनलाइन परीक्षा आता लेखी परीक्षेनंतर म्हणजे १२ डिसेंबरनंतर होणार आहे. ‘सर्व्हर’ रुसल्याने गेल्या आठवड्यात परीक्षेला पहिल्याच दिवशी ‘खो’ बसून परीक्षा स्थगित करावी लागली होती.

शहर हद्दीवरील प्रमुख चौकांत CCTV

$
0
0
पुणे शहराच्या बाजूने असलेल्या महामार्गांवरून शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रमुख चौकांमध्ये क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यादृष्टीने कॅमेऱ्यांची ठिकाणे निश्चित करण्याची खबरदारी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) घेतली आहे.

कार्ड स्वाइप करण्यास ‘पिन’ आवश्यक

$
0
0
डेबिट कार्डवरील माहिती चोरून डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी एक डिसेंबरपासून डेबिट कार्डवरील सर्व रिटेल व्यवहार ‘पिन’वर आधारित असणार आहेत. कोणताही व्यवहार ‘पिन’ वापरल्याशिवाय करता येणार नाही.

पुण्यासह राज्यात ‘HIV’चा टक्का घटतोय

$
0
0
राज्यातील ‘एचआयव्ही’ संसर्गितांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघ्या एका टक्क्याने खाली आले आहे. दुसरीकडे बाधितांमध्ये राज्यात आजमितीला मुंबईच आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुण्याचे प्रमाण घसरल्याने ते चौथ्या क्रमाकांवर आहे.

आरोपीने फेकली न्यायाधीशांवर चप्पल

$
0
0
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींने संतापाच्या भरात शुक्रवारी शिवाजीनगर कोर्टात एका जिल्हा न्यायाधीशाच्या अंगावर चप्पल भिरकावल्याची माहिती ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी दिली.

लष्करी संस्थांच्या सुरक्षेत वाढ

$
0
0
आज (शनिवारी) होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षांत संचलनाच्या पार्श्वभूमीवर लष्करातर्फे पुण्यातील सर्व लष्करी संस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली.

‘राजशब्दा’ला पुण्यात जाहीर आव्हान

$
0
0
शहरात वरिष्ठांच्या बैठका सुरू असतानाच घडलेल्या नाराजी नाट्यामुळे मनसेत ‘राज’शब्द अंतिम मानणाऱ्यांमध्येच पदांवरून राजकीय धुसफूस रंगली आहे. नवनिर्माणाचे स्वप्न दाखवित मतदारांची अपेक्षा उंचावणाऱ्या पक्षाच्या ‘भिंती’ही इतर पक्षांप्रमाणेच मातीच्याच असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

‘BRT’वरील अपघातसत्र सुरूच

$
0
0
स्वारगेट चौकात (जेधे चौक) शुक्रवारी सकाळी हडपसर ‘बीआरटी’ ट्रॅकवरून आलेल्या ‘पीएमपी’ चालकाने वळण घेत असताना एका पादचाऱ्याला उडविले. हा पादचारी बचावला असून त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

गरिबांसाठीच्या घरांवर डल्ला

$
0
0
मोठ्या गृह प्रकल्पांतील वीस टक्के सदनिका गरिबांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरीही त्याचे राजपत्र अद्याप प्रसिद्ध न झाल्याचा फायदा उठविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये बिल्डरची रीघ लागली आहे.

'आयसॉन' अद्याप जिवंत?

$
0
0
धूमकेतूच्या लहरी गुणधर्माचे दर्शन घडवत शुक्रवारी ‘आयसॉन’चा ढग पुन्हा सौरदुर्बिणीत प्रकट झाला. गुरुवारी सूर्याच्या सर्वात जवळ असताना या धूमकेतूचे विभाजन झाल्याचे दिसून आले होते. त्यावरून नासाने लागोलाग ‘आयसॉन’ नष्ट झाल्याचे जाहीर केले. मात्र, शुक्रवारी पुन्हा ‘सोहो’ या सौर दुर्बिणीत धूमकेतूचा मोठा ढग दिसू लागला.

मारणे टोळीतील २ गुंडांना अटक

$
0
0
कुख्यात गुंड गणेश मारणे टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. अटक आरोपींवर खंडणीचे गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

रेल्वेच्या धडकेने मृत्यू

$
0
0
रेल्वेचे फाटक ओलांडताना रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रामटेकडी येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

अतिक्रमण पथकावर सोडले कुत्रे

$
0
0
तळजाई वसाहत येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर पाळलेले कुत्रे सोडल्यामुळे दोन कर्मचारी जखमी झाल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पूर्वप्राथमिक’ची प्रवेश प्रक्रिया थांबवा

$
0
0
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशाबाबतच्या नव्याने जाहीर केलेल्या आदेशांना धाब्यावर बसवत, शहरातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

समाजसेवकांना ‘पद्म’ पुरस्कार का नाही?

$
0
0
देशाला एकसंध ठेवत देशसेवा करणाऱ्या समाजसेवकांना ‘पद्म’ पुरस्काराने का सन्मानित केले जात नाही असा सवाल राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी उपस्थित केला. ‘पद्म’ पुरस्कारासाठी नावे सुचविण्यावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी या पुरस्कारांर्थींच्या निवडीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले.

पावसाच्या हलक्या सरी अन् ढगाळ हवा

$
0
0
नोव्हेंबर महिन्यातील शनिवारचा शेवटचा दिवस पुणेकरांना जून-जुलैमधील ऐन पावसाळ्याच्या दिवसांची आठवण करून देणारा ठरला. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली होती. सकाळी शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. दरम्यान, रविवारी आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ७ नवी मेडिकल कॉलेज

$
0
0
ग्रामीण व दुष्काळी भागात डॉक्टरांचा नेहमीच तुटवडा भासतो, यासाठी राज्यात मुंबई, रायगड, बारामती, सातारा, चंद्रपूर, गोंदिया व नंदूरबार येथे अत्याधुनिक वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटल उभारण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पालिका आपल्या मालकीची नाही

$
0
0
‘समाजाचा पैसा खर्च करताना आपण मालक नाही, तर विश्वस्त आहोत, याचे भान बाळगा’, असे खडे बोल सुनावत जनतेचा पैसा खर्च करताना पारदर्शक व्यवहार ठेवा, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सत्ताधाऱ्यांना दिल्या. ‘पालिकेसाठी आवश्यक औषधांची खरेदी खूप महागात केल्याचे वृत्तपत्रातून समजले. खरे-खोटे काय झाले, हे माझ्यापेक्षा स्थायी समितीलाच अधिक ठाऊक असेल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images