Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फायर बुलेट आता ‘व्हीव्हीआयपीं’च्या ताफ्यात ?

$
0
0
कोट्यवधी रुपये खर्चूनही अग्निशामक दलात धूळ खात पडून असलेल्या ‘फायर बुलेट’ आता मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन्ही ‘व्हीव्हीआयपीं’च्या पुणे दौऱ्यात फायर बुलेटचा समावेश करण्याचे पत्र पालिकेतर्फे पोलिसांना पाठविले जाणार आहे.

संसर्गग्रस्तांना आधार ‘विहान’चा

$
0
0
​राज्य सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या ‘एचआयव्ही’ संसर्गितांना योजनांचा आधार देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता राज्यभरातील ३५ जिल्ह्यांत ‘विहान’ हे आधार व काळजी केंद्र येत्या शुक्रवारपासून (दि. २९) पासून कार्यान्वित करण्यात येत आहेत.

विद्येच्या माहेरघरात… वर्ग आंदोलनांचा

$
0
0
‘एसपी’ची मान्यता काढून घेण्यामुळे विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या समस्येला कॉलेजचा अडमुठेपणाच जबाबदार असल्याचे पुणे विभागीय मंडळाकडून गुरुवारी सांगण्यात आले.

विविध विद्यार्थी संघटना एकवटल्या

$
0
0
‘एसपी’ कॉलेजमधील बनावट गुणपत्रिका प्रकरणी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्वीकारण्याच्या बोर्डाच्या निर्णयाविरोधात शहरातील विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

विमान प्रवास, मोबाइलवर पदाधिकाऱ्यांची दौलतजादा

$
0
0
शिक्षण निधीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या तिजोरीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांची पदाधिकाऱ्यांनी उधळपट्टी केल्याचा ठपका विशेष चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

पुण्यात वाढतोय थंडीचा कडाका

$
0
0
शहरात थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी ढगाळ हवामान दूर झाल्यानंतर शहरात किमान तापमानात घट झाली. गुरुवारी पुण्यात १४.४ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

मान्सूनसाठी ‘क्लायमेट मॉडेल’

$
0
0
'हवामानबदलांच्या पार्श्वभूमीवर येत्या शंभर वर्षांत मान्सूनचे देशभरातील प्रमाण आणि वितरण कसे राहील याचा अंदाज वर्तवणारे देशातील पहिले 'मान्सून क्लायमेट मॉडेल' येत्या २०१७ पर्यंत विकसित होईल.

संवेदनशील ठिकाणी CCTV

$
0
0
पुण्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असल्याने पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा विचार करून भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जागा निवडल्या आहेत.

माझी माउली, मायेची सावली

$
0
0
कपाळी केशरी गंध, मुखात हरिनामाचा छंद आणि मनात दाटलेला आनंद या भावनेने माय माउलींच्या प्रेमात अवघी अलंकापुरी दंग झाली आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे, तर अन्य राज्यातूनही भाविक दाखल झाले आहेत.

साताऱ्याचा सूरज NDAत चमकला

$
0
0
साताऱ्याच्या सूरज इथापे याने एनडीएच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात सामाजिक शास्त्र विषयात प्रथम येत एनडीए प्रमुखांचे रौप्यपदक आणि चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफीही पटकावले.

आयसॉन धूमकेतू 'अग्निपरीक्षे'त अपयशी

$
0
0
गेले वर्षभर जगभरातील आकाशप्रेमींच्या चर्चेचा विषय बनलेला ‘आयसॉन’ धूमकेतू गुरुवारी मध्यरात्री सूर्यापासून सर्वात कमी अंतरावर पोचला. मात्र, सूर्याच्या वातावरणातून प्रवास करत असताना त्याचे विभाजन झाल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले.

आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग

$
0
0
चौदा वर्षांच्या मुलाने आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सुधारगृहात उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘SP’च्या विद्यार्थ्यांचे अर्ज बोर्ड स्वीकारणार

$
0
0
एस. पी. कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार असल्याचा दिलासा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुनील चौहान यांनी शुक्रवारी दिला.

रंगभूमी सेन्सॉर बोर्डाची राज्य सरकारकडून फेररचना

$
0
0
रंगभूमीवर सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या संहितांचे पूर्वनिरीक्षण करण्याऱ्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) पुनर्रचना करण्यात आली आहे. नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या जागी ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

व्याघ्र संरक्षण दलांमध्ये आता वन निरीक्षकही

$
0
0
वाघांच्या शिकारीला प्रतिबंध आणि त्यांच्या संरक्षणसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र संरक्षण दलामध्ये आता वन निरीक्षकांचा (फॉरेस्ट वॉचर्स) समावेश केला जाणार आहे. व्याघ्र प्रकल्पात असलेल्या गावांमधील तरुणांना वन निरीक्षक म्हणून काम करण्यास संधी दिली जाणार आहे.

बुद्धीला वाव देणारे शिक्षण हवे

$
0
0
तरुण पिढीच्या वर्तणुकीला दोष देण्यापेक्षा बदलती आव्हाने लक्षात घेऊन पिढ्यानपिढ्या चालत आलेली शिक्षण पद्धती स्वीकारा. प्रचलित समस्यांचे भान ठेवून मुलांची संवेदशीलता, बुद्धिमत्तेला वाव देणारे धडे त्यांना द्या, असे मत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शनिवारी व्यक्त केले.

नगर परिषदांमध्ये हस्तांतरणीय विकास हक्क

$
0
0
नगर परिषदेच्या हद्दीतील आरक्षित जमिनी ताब्यात घेण्यासाठी जागामालकांना रोख मोबदला देण्याऐवजी हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्याची तरतूद सुधारित विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करण्यात आली आहे.

संशोधनाची उपयुक्तता पाहून संशोधन व्हावे

$
0
0
विज्ञानाच्या क्षेत्रातील नानाविध संशोधनांचा वेध घेत, त्यामध्ये महिलांच्या कर्तृत्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आयोजित महिला वैज्ञानिकांच्या बाराव्या त्रैवार्षिक राष्ट्रीय परिषदेचे उद्‍‍घाटन पुण्यात झाले. ‘इंडियन विमेन सायंटिस्ट्स असोसिएशन’तर्फे (इवसा) आयोजित या परिषदेच्या माध्यमातून तीन दिवसांमध्ये विज्ञानाच्या मूलभूत संशोधनामधील सर्व विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे.

‘टॉमी हिलफिगर’कडून LBT वसुली

$
0
0
स्थानिक संस्था करांतर्गत (एलबीटी) सर्वांत मोठी कारवाई करून शुक्रवारी पालिकेने ४४ लाख रुपये दंड वसूल केला. या कारवाईनंतर ‘टॉमी हिलफिगर’ या सॅफरॉन लाइफस्टाइल ट्रेडर्सच्या दालनांचे ‘सील’ उघडण्यात आले.

CNG पंपावरील मीटरमध्ये बिघाड

$
0
0
शहरातील ‘सीएनजी’च्या पंपावरील मीटरमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे ‘सीएनजी’वर धावणाऱ्या रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरला जात असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात दोषी पंपावर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा कृती समितीचे पदाधिकारी शनिवारी जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे खजिनदार बापू भावे यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images