Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१ छदामही कर न भरणाऱ्यांवरच कारवाई

0
0
शहरात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यापासून महापालिकेकडे नोंदणी न केलेल्या आणि एक रुपयाचाही एलबीटी न भरणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांवर राज्य सरकारची परवानगी घेऊनच कारवाई केली जात आहे. गेल्या आठ दिवसात १६ ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ करुन पालिका प्रशासनाने २३ लाख रुपयांचा एलबीटी वसूल केला आहे. यापुढील काळातही एलबीटी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.

शंकानिरसन करायचे कोठे?

0
0
‘जेईई-मेन’चा फॉर्म भरताना सध्या विद्यार्थी आणि पालकांना काही शंका उपस्थित होत असून, त्यांची उत्तरे मात्र पुण्यातील मदत केंद्रांवर उपलब्ध नाहीत. या परीक्षेचे संचालन करणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही (सीबीएसई) या शंकांबाबतचे निरसन झालेले नाही.

वीजबचतीसाठी महावितरणचा महामंत्र

0
0
‘विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती’ याचा दाखला महावितरणने स्वतःच्या कार्यपद्धतीपासूनच दिल्याने तब्बल चार लाख युनिट विजेची बचत होणे शक्य झाले आहे. हीच पथदर्शी योजना राज्यभरात एनर्जी एफिशियंट कृषिपंप बसवून राबवली जाणार आहे.

भारतात ‘ब्रेन ड्रेन’ वाढतोय!

0
0
देश आर्थिकदृष्ट्या बळकट होत असताना भारतात ब्रेन ड्रेनचे प्रमाण वाढत असल्याची खंत जागतिक कीर्तीचे गणिती प्रा. एम. एस. नरसिंहन यांनी व्यक्त केली. एच. के. फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा फिरोदिया पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच

0
0
शहरात गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी हिसकावण्याचे सहा गुन्हे घडले असून त्यात साडे तेवीस तोळे वजनाचे दागिने दुचाकीवरील चोरींनी हिसकावले आहेत. नारायण पेठ, डहाणूकर कॉलनी, चिंचवडगाव, निगडी, एनआयबीएम रोड परिसरात हे गुन्हे घडले आहेत.

पुण्यात ३५९ ‘सीसीटीव्ही’ हवेत

0
0
पुण्यात जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रस्ता या ​ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्या ठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेरे बस​वावे लागणार आहेत, याचे सर्वेक्षण भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) केले आहे. या सर्वेक्षणानुसार पुण्यात ३५९, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ५९ ठिकाणी कॅमेरे लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

‘एसपी’ला बोर्डाचा दणका

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एचएससी बोर्ड) बनावट गुणपत्रिकेबाबत पोलिसांकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याविषयी केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करणे ‘एसपी’ कॉलेजला चांगलेच भोवले असून, फौजदारी गुन्हा न नोंदविल्याने बोर्डाने एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्वीकारण्याचा, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका न देण्याचा निर्णय बुधवारी घेतला.

बायपास ठरतोय मृत्यूचा सापळा

0
0
कात्रजचा नवीन बोगदा ते देहूरोडपर्यंतचा बायपास या रस्त्यावर शहरातील गल्लीबोळाप्रमाणे अनियंत्रित वाहतूक असून, तो मृत्यूचा सापळा बनला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधांपासून नियंत्रण-देखरेखीच्या कडक उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

फुलविभाग आयुक्तांच्या बदलीची मागणी

0
0
मार्केट यार्डमधील फुलबाजाराच्या परिसरात अनाधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्याची संख्या वाढली आहे. बाजार समितीचे फुल विभागाचे प्रमुख चंद्रकांत ढमढेरे या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेत आहेत, त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी फुलबाजार आडते असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

नव्या सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना

0
0
रंगभूमीवर सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या संहितांचे पूर्व निरीक्षण करण्याऱ्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) पुनर्रचना करण्यात आली आहे.

बंदोबस्त नसल्याने कैदी उपचाराविना

0
0
येरवडा तुरुंगातील कैद्यांना ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बंदोबस्त (एस्कॉर्ट) मिळत नसल्यामुळे दरमहा सुमारे १७५ कैद्यांना उपचाराविनाच राहावे लागत आहे.

आजपासून बालकुमार साहित्य संमेलन

0
0
रौप्यमहोत्सवी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन शुक्रवारपासून (२९ नोव्हेंबर) बालगंधर्व रंगमंदिरात सुरू होत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद‍्घाटन होणार आहे.

ब्राऊन यांची मुलासह सुखोई भरारी!

0
0
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांनी पुणे विमानतळावरून ‘सुखोई ३०’ या अत्याधुनिक लढाऊ विमानातून गुरुवारी आपल्या कारकिर्दीतील अखेरचे उड्डाण केले.

लुटीचा बनाव रचणारा गजाआड

0
0
रेल्वेत लुटीचा बनाव रचून सराफी व्यावसायिकाचे पावणेअकरा लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट आणि दागिने खिशात घालणाऱ्या नोकरासह त्याच्या तीन साथीदारांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

हरियाणाचा सोनू बराक एनडीएत अव्वल

0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सर्व शाखांमधून प्रथम येणाऱ्या छात्रासाठीची चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी हरियाणाच्या सोनू बराक याने पटकावली.

‘खेड डेव्हलपमेंट’ बरखास्त होणार?

0
0
खेड येथील प्रकल्पग्रस्तांना आयुष्यभर परतावा मिळावा, या उद्देशाने स्थापन केलेली ‘खेड डेव्हलपमेंट लिमिटेड’ ही कंपनी बरखास्त करून त्यातील जागा परत करावी, असा पवित्रा या परिसरातील काही शेतकऱ्यांनी गुरुवारी घेतला.

महात्मा फुले यांच्या स्मृतींना उजाळा

0
0
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील विविध संस्था, संघटनांतर्फे गुरुवारी दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करून फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. महात्मा

पुण्यातून लोकसभेसाठी उल्हास पवार इच्छुक

0
0
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या यादीत माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक व पक्षाचे निष्ठावंत नेते उल्हास पवार यांचेही नाव आले आहे.

कोल्हापूर, सांगलीच्या एसटी अद्याप बंदच

0
0
पश्चिम महाराष्ट्रात ऊसदरावरून सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशी पुण्याहून कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणाऱ्या बसगाड्या एसटीने रद्द केल्या. गेल्या दोन दिवसांपासून गाड्या रद्द झाल्यामुळे एसटीला दोन लाख रुपयांचा तोटा झाला असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पुणे विद्यापीठ नामकरणासाठी एकी गरजेची’

0
0
पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा ठराव सिनेटमध्ये मंजूर झाला आहे. मात्र, इथे शुक्राचार्य खूप आहेत, त्याच्याकडून वेगवेगळ्या मागण्या होत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images