Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेश्याव्यवसाय करणा-या ११ जणींची सुटका

0
0
बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून अकरा युवतींची सुटका केली. मुख्य दलालासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. सोमवारी (२५ नोव्हेंबर) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

हरित न्यायाधिकरण : शहरात उदासीनता

0
0
‘पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. पर्यावरणाबाबत संवेदनशील असलेल्या पुण्यातही तीन महिन्यांपूर्वी न्यायाधिकरण सुरू झाले आहे, मात्र याबाबत जागृती नसल्याने इतरांच्या तुलनेत पुण्यात अत्यल्प अर्ज दाखल झाले आहेत,’ असे मत पुणे हरित न्यायाधिकरणाचे तांत्रिक सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी व्यक्त केले.

सोसायट्यांना बाँडमधून सरसकट सवलत नाही

0
0
सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अन्य सहकारी संस्थांवरील पदाधिकाऱ्यांना बंधपत्रे सादर करण्याच्या तरतुदीतून सरसकट सुटका मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘आयुक्त शिक्षण’ पद रद्द करण्याची मागणी

0
0
शिक्षण विभागामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याची वर्णी लावण्यासाठी ‘आयुक्त शिक्षण’ या पदाची करण्यात आलेली निर्मिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची टीका अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघातर्फे करण्यात आली.

सहकार क्षेत्र सर्वांच्या भल्यासाठीच !

0
0
‘सहकार क्षेत्र हे सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच असून, या क्षेत्रातील बँकांनी समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना हात दिला आहे. कॉसमॉस बँकेकडून ही परंपरा अधिक जोरकसपणे पुढे नेण्यात येत आहे,’ असे प्रतिपादन कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांनी केले.

रेल्वे आरक्षणामुळे पास होल्डर ‘नापास’

0
0
पास होल्डरचा डबा काढून त्यामध्ये अन्य प्रवाशांसाठी आरक्षण देण्याचा प्रताप रेल्वे प्रशासनाने रविवारी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये केला, त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या पास होल्डर सदस्यांवर उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली.

वीजबिलातील अतिरिक्त चार्ज मार्चपर्यंतच

0
0
नागरिकांच्या वीजबिलात सध्या लागू करण्यात आलेला अतिरिक्त आकार येत्या मार्चपर्यंतच आकारण्यात येणार आहे, असे महावितरणच्या वतीने मंगळवारी स्पष्ट करण्यात आले आहे.

अपात्र कंपनीवर संचालकांची मेहेरनजर

0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची बी. जे. रस्त्यावरील मुख्य इमारतीची कोट्यवधी रुपयांची जागा भारूका असोसिएटस या कंपनीला बीओटी तत्त्वावर विकसनाला देण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने विशेष मेहेरनजर दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीडीपी ठराव अद्याप पालिकेकडेच

0
0
जैववैविध्य उद्यानांच्या आरक्षणांच्या जागेत (बीडीपी) बांधकामांना परवानगी द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने वाजतगाजत केलेला ठराव अजून राज्य सरकारच्या दरबारीच दाखल झालेला नसल्याचे उघडकीस आले आहे.

निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कारवाई

0
0
वराती, बँडबाजा, डीजे सिस्टीम आणि फटाके वाजविण्यावर निर्बंध असूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या वऱ्हाडी आणि मंगल कार्यालयांच्या चालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिसांनी सोमवारी केल्या. तसेच, म्हात्रे पुलाजवळील रस्त्यावर दुभाजक, फूटपाथ आणि पादचारी क्रॉसिंगची कामे महापालिकेने तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

एलबीटीची कारवाई आता लघुउद्योगांवरही

0
0
शहरातील व्यावसायिकांसह माल आयात करून एलबीटी न भरणाऱ्या लघुउद्योगांवरही पालिकेने कारवाई केली आहे. तसेच, एलबीटी नोंदणी क्रमांकाशिवाय मालवाहतूक केल्यास मालवाहतूकदारांवरही कारवाई करण्याचा इशारा एलबीटी विभागाने दिला आहे.

अतिजलद मार्गाच्या गजगतीची कबुली

0
0
शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत आणि नियोजनबद्ध होण्यासाठी आवश्यक असलेला अतीजलद महामार्ग (हाय कॅपेसिटी मास ट्रान्झिट रोड) तयार करण्यास महापालिकेला अपयश आल्याची कबुलीच महापालिका प्रशासनाने मंगळवारी दिली.

बीआरटी मार्गावरील कारवाई सुरूच

0
0
बीआरटी मार्गावर घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहनांवर हाती घेण्यात आलेली कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू होती. हडपसर आणि कात्रज बीआरटी मार्गावर दिवसभरात ३४७ वाहनांवर कारवाई करून ४२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

बीआरटी मार्गाची नियमित पाहणी

0
0
बीआरटी मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातानंतर अखेर पालिका आणि पोलिस प्रशासनही खडबडून जागे झाले असून, महापौर, वाहतूक पोलिस उपायुक्त आणि पालिकेच्या वाहतूक नियोजन अधिकाऱ्यांतर्फे बीआरटी मार्गाची नियमित पाहणी करण्यात येणार आहे.

नियमावलीचे उल्लंघन अधिका-यांना भोवणार

0
0
शहरात विनापरवाना जाहिरात फलक उभारणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच चुकीच्या पद्धतीने जाहिरात फलक उभारण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

अपंगत्वाच्या सर्टिफिकेटला विलंब

0
0
अपंगांच्या प्रमाणपत्रांच्या ‘बोगस’गिरीला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ‘ऑनलाइन’ सर्टिफिकेट यंत्रणेला राज्यात सर्वच ठिकाणी ‘पंगुत्व’ आले आहे. त्यामुळे अपंगांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी जाणाऱ्या अपंगांना ससून हॉस्पिटलसह सर्वत्रच हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

पावसामुळे पालिकेचे 'पितळ' उघडे

0
0
पावसाळ्यात खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण करून खड्डे भरण्याचा प्रयत्न महापालिकेने केलेला प्रयत्न पावसाने उघडा पडला. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेचे पितळ उघडे पडले आहे.

स्टँप ड्युटीचे ९० कोटी पालिकेलाच!

0
0
मुद्रांक शुल्कावरील (स्टँप ड्युटी) एक टक्का अधिभाराची गेल्या सहा महिन्यांतील प्रलंबित थकबाकीपैकी सुमारे ९० कोटी रुपये ‘एलबीटी’पोटी पुणे महापालिकेच्या खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

१२ वीचे अर्ज आता ‘ऑनलाइन’

0
0
बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डाच्या परीक्षेसाठीचे अर्ज आता ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे त्यासाठी आवश्यक त्या सूचना सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना देण्यात आल्या असून, यंदाच्या परीक्षेपासून ही पद्धत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे. हे अर्ज भरण्यासाठीची सुरुवात आजपासून (२७ नोव्हेंबर) होणार आहे.

१२५ कोटी ‘लटकले’!

0
0
शहरातील विविध भागात उभारण्यात आलेले बेकायदा जाहिरात फलक तसेच अधिकृत फ्लेक्स यांच्याकडे तब्बल १२५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा ठपका पालिकेच्या ऑडिट विभागाने ठेवला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images