Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उशिपसाठी कुलगुरू डॉ. गाडे यांची हाक

$
0
0
राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियानामधील (रुसा) विविध तरतुदी आणि मान्यतांचा लाभ घेण्यासाठी राज्य पातळीवर आवश्यक असणारी ‘उच्चशिक्षण परिषद’ अद्यापही राज्यात स्थापन झालेली नाही.

‘बीडीपी’ हरकतींवर सुनावणी

$
0
0
महापालिकेतील समाविष्ट गावांमधील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणापोटी दहा टक्के टीडीआर देण्याच्या निर्णयावरील हरकती व आक्षेपांची सुनावणी सुरू होत आहे. नगररचना विभागाचे सहसंचालक अविनाश पाटील यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

१० वी, १२ वी ऑक्टोबरचे निकाल मंगळवारी

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी दुपारी जाहीर होणार आहेत.

वेळापत्रकापूर्वी प्रवेश ठरणार कारवाईस पात्र

$
0
0
राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे प्राथमिक शाळांच्या प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची तंबी संचालनालयातर्फे देण्यात आली.

ऊस दर आंदोलनात कारखाने बंदचे आवाहन

$
0
0
‘शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही पाठिंबा द्यावा आणि दोन दिवस जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवावेत,’ अशी भूमिका शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने सोमवारी घेतली.

सरपंच-उपसरपंचांवर कारवाईचा बडगा

$
0
0
हद्दीलगतच्या गावांमधील बेकायदा बांधकामांना मान्यता दिल्याबद्दल आता सरपंच-उपसरपंच आणि ग्रामपंचायतींच्या सदस्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

BRT मार्गावरील खासगी वाहने ‘रडार’वर

$
0
0
बीआरटी मार्गावर घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहनचालकांविरोधात कारवाईच्या मोहिमेला वाहतूक पोलिसांनी सोमवारपासून सुरूवात केली. हडपसर आणि कात्रज बीआरटी मार्गावर वाहतूक पोलिसांनी दिवसभरात ५७२ जणांवर कारवाई केली.

अण्णांना शहीद करण्याचा केजरीवालांचा डाव होता!

$
0
0
भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाच्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शहीद करण्याचा अरविंद केजरीवाल यांचा डाव होता, असा खळबळजनक आरोप स्वामी अग्निवेश यांनी सोमवारी केला.

बेमुदत बंदचा पूना मर्चंट्सचा इशारा

$
0
0
दुकानात शिरून तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आल्याने राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचा भंग होत असल्याची टीका दि पूना आयर्न अँड स्टील मर्चन्टस् असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

महापालिका कोर्टात दाद नाही

$
0
0
बेकायदा बांधकाम केल्याबद्दल पालिकेने दिलेल्या नोटिसांवर पालिका कोर्टात दाद मागता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका कोर्टाने दिला आहे.

अतिक्रमणांविरोधात पालिकेची कारवाई

$
0
0
फ्रंट आणि साइड मार्जिनमधील बांधकाम, रस्ते आणि फूटपाथवरील अतिक्रमण; तसेच विनापरवाना उभारलेल्या शेड्स यावर पालिकेने सोमवारी जोरदार कारवाई केली.

टेम्पो दरीत कोसळून ३ वारकरी मृत्युमुखी

$
0
0
उरळी ते जेजुरी मार्गावरील सिंदवणे घाटात टेम्पो दरीत कोसळून सकाळी ११ वाजता झालेल्या अपघातात सोमवारी तीन वारकऱ्यांचा मुत्यू झाला, तर ४१ जण जखमी असून, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शाळा बंद ठेवणार नाही

$
0
0
शालेय वाहतुकीची जबाबदारी सरसकट मुख्याध्यापकांवर सोपविणे अन्यायकारक आहे.

‘MBA-CET’ होणार ऑनलाइन

$
0
0
राज्याची एमबीए/एमएमएस-सीईटी प्रथमच ऑनलाइन होत आहे. सन २०१४-१५ च्या प्रवेशांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) १५ आणि १६ मार्च २०१४ला ही ऑनलाइन परीक्षा होईल.

कारवाईचा धडाका बिअर शॉपीवरही

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील माहितीच्या आधारे सोमवारपासून बिअर शॉपीवरही कारवाईला सुरुवात केली आहे.

पावसामुळे वीजपुरवठा खंडित

$
0
0
सोसाट्याच्या वाऱ्यासह शहर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे सोमवारी शहराच्या विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. भवानी पेठ, हडपसर, बिबवेवाडी आदी ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या.

२६/११ च्या पुनरावृत्तीचा कट?

$
0
0
देशात मुंबईतील २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याचा कट ‘अल् कायदा’ने आखल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संघटनेचे दहशतवादी देशात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

पावसात वाहून गेली थंडी!

$
0
0
अंधारून आल्यानंतर चमकलेल्या जोरदार विजा....झोंबणारे वारे....आणि त्यानंतर सुरू झालेला जोरदार पाऊस यामुळे सोमवारी पुणेकरांनी ऐन थंडीत पावसाळ्याचा अनुभव घेतला.

ज्येष्ठ कलाकारांचे मानधन थकले

$
0
0
पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे दीड हजार ज्येष्ठ कलावंतांना मानधन देण्यासाठी एक कोटी ३७ लाख रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला मिळाले आहे.

पवार, शिंदेंना नाट्य संमेलनाचे निमंत्रण

$
0
0
चंद्रभागेच्या काठी, विठुमाऊलीच्या साक्षीने जानेवारीच्या अखेरीला रंगणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीसाठी पंढरपूरकरांनी कंबर कसली आहे. उदघाटनाच्या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या रंगमंचावर ‘राजकीय नाट्य’ रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images