Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रेशनकार्डांवर लाभार्थ्यांचे शिक्के मारण्याचे काम सुरू

0
0
अन्नसुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीची तयारी प्रशासनाने सुरू केली असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांच्या रेशनकार्डवर लाभार्थी असल्याचे शिक्के मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पेशंटच्या नातेवाइकांच्या फसवणुकीचा प्रयत्न

0
0
डॉक्टरचा सहाय्यक असल्याचे भासवून पेशंटच्या औषधांसाठी बँकेच्या खात्यात ३२ हजार भरण्यास सांगून फसवणुकीप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली.

हॉस्पिटलमधून चोरी करणाऱ्यास कोठडी

0
0
रुबी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल पेशंटच्या नातेवाइकाची पर्स चोरल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या आधीच उद्यानाचे उद‍घाटन

0
0
सत्ताधाऱ्यांनी विश्वासात न घेता उद्यानाच्या उद‍्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप करीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद‍्घाटन होण्यापूर्वीच शुक्रवारी सकाळी चिखली-कुदळवाडी येथील उद्यानाचे उद‍घाटन केले.

पुणे पोलिस पाठविणार रिझर्व्ह बँकेला पत्र

0
0
‘ऑटोमेटेड टेलर मशिन’च्या (एटीएम) ठिकाणी सुरक्षितता हा केवळ स्थानिक विषय नसून, राष्ट्रीय पातळीवरील आहे. ‘एटीएम’साठी सध्या कोणतीही मानके नाहीत.

परीक्षांमागील शुक्लकाष्ठ संपेना...

0
0
पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा ‘हँग’ होण्याचे शुक्लकाष्ठ न संपण्याची चिन्हे आहेत. ‘एमबीए’च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्राच्या पहिल्याच ऑनलाइन परीक्षेला सर्व्हर रुसल्याने ‘खो’ बसला.

२० हजार पोटगीचे भोंदूबाबाला आदेश

0
0
आश्रमात येणा-या महिलेला फसवून तिच्याबरोबर दुसरे लग्न केलेल्या भोंदूबाबाने संबंधित महिलेला दरमहा वीस हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश नुकताच कोर्टाने दिला.

‘ATM’च्या सुरक्षेची जबाबदारी बँकांचीच

0
0
‘ऑटोमेटेड टेलर मशिनच्या (एटीएम) ठिकाणी सुरक्षा पुरविणे ही बँकांचीच जबाबदारी आहे. एटीएमच्या सुरक्षिततेसाठी बँकांनी बंदूक परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना एका आठवड्याच्या आतच परवाना देण्याची व्यवस्था पोलिसांकडून केली जाईल,’ अशी ग्वाही पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शुक्रवारी दिली.

‘बीआरटी’चा भुलभुलैया उठला निष्पापांच्या जीवावर

0
0
सोलापूर रोडवरील ‘बीआरटी’ ट्रॅकवर एसटी बसखाली चिरडून १७वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. वर्गमित्रासमवेत दुचाकीवर जात असताना समोरून येणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला.

वॉर्डन नेमणुकीसाठी निधीची घोषणा हवेतच

0
0
बीआरटी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी महापौरांनी जाहीर केलेला २५ लाखांचा निधी अद्याप लालफितीतच अडकल्याने वॉर्डनअभावी शुक्रवारी सकाळी आणखी एक बळी घेतला.

नागरिकांची काळजी की निधीची चिंता?

0
0
पालिकेतील अधिकाऱ्यांची बेफिकीर वृत्ती आणि बेजबाबदार कारभारामुळे बीआरटी मार्गावर नागरिकांचा जीव जात असतानाच ब‌ीआरटी न राबविल्यास केंद्राचा ८०० कोटींचा निधी परत जाईल, अशी भीती दाखवत पालिका आयुक्त लोकप्रतिनिधींना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला.

व्यापा-यांना त्रास दिल्यास राज्यभरात बंद पाळू

0
0
स्थानिक संस्था करावरून (एलबीटी) महापालिकेने व्यापाऱ्यांना जाणूनबुजून त्रास दिल्यास राज्यभर बंद करण्याचा इशारा ‘पुणे व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिला.

७५० व्यापारी ‘एलबीटी’च्या जाळ्यात

0
0
स्थानिक संस्था करांतर्गत (एलबीटी) सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल साडेसातशे व्यापाऱ्यांनी तीन कोटींहून अधिक रक्कम ‘एलबीटी’पोटी पालिककेडे जमा केली आहे.

थंडीचा कडाका कमी होणार

0
0
काही दिवस थंडीचा कडाका अनुभवल्यानंतर आता पुढील दोन ते तीन दिवस शहरातील तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

BSNL लवकरच पेपरलेस

0
0
‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (बीएसएनएल) कारभारात पारदर्शकता आणण्याबरोबरच पेपरलेस कामकाज करण्यासाठी सॅप प्रणालीचा अवलंब सुरू करण्यात आला आहे.

एक लाख दावे निकाली काढणार

0
0
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे गेल्या तीन वर्षात महालोकअदालतद्वारे २ लाख, ३८ हजार १०७ दावे सामोपचाराने आणि तडजोडीने निकाली काढण्यात आले आहेत.

दरवाजांसाठी ३ कोटी रुपये

0
0
आळंदी तसेच नगररोडवरील बीआरटी मार्गावर उभारण्यात आलेल्या बसस्टॉपवर आधुनिक पद्धतीचे ऑटोमॅटिक दरवाजे बसविण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

‘बीआरटी’वर ‘डेथ रेस’

0
0
‘बीआरटी’ मार्गावरील जीवघेण्या अपघातांचे गेल्या सात वर्षांचे सत्र संपायला तयार नसून शुक्रवारी हडपसरजवळ बारावीतील विद्यार्थ्याचा बळी गेला.

नवी पेठेतील इमारतीला आग

0
0
पुण्याच्या नवी पेठ भागातील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या गुरुदत्त इमारतीला आज (शुक्रवारी) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत एका रहिवाशाचा मृत्यू झाला

रवी पुजारीच्या हस्तकास अटक

0
0
खराडी भागातील जमिनीचा वाद सोडविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकास धमकविल्याप्रकरणी कुख्यात गुंड रवी पुजारी याच्या हस्तकास खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images