Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सहकारी संस्थांच्या निवडणुका वाऱ्यावरच

$
0
0
सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक प्राधिकरणाची स्थापना वर्षाअखेरपर्यंत न केल्यास हे काम राज्य निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात येईल, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे.

हौशी रंगकर्मींही नाट्य संमेलनात

$
0
0
नाट्यचळवळीचा कणा मानल्या जाणाऱ्या प्रायोगिक आणि हौशी रंगकर्मींनाही पंढरपूरमध्ये रंगणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कोतवालांना हक्काची जागा

$
0
0
तलाठी कार्यालयामध्ये ‘भाऊसाहेबां’पेक्षा अधिक रूबाब करणाऱ्या शिकाऊ कर्मचारी व अन्य खासगी व्यक्तींना आता लगाम घातला जाणार आहे. अशा व्यक्तींना अटकाव घालून कोतवालांचे कामासाठी मदत घेण्याची सूचना महसूल खात्याने तहसीलदारांना केली आहे.

शिक्षणातील आयएएसचे पंख छाटणार

$
0
0
शिक्षण खात्यातील वेगवेगळ्या आठ संचालनालयांमध्ये आणि त्यांच्या संचालकांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारने ‘आयुक्त शिक्षण’ हे पद निर्माण केले. मात्र, महिन्याभरामध्येच केवळ चार संचालनालयांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘आयुक्त शिक्षण’ यांना जबाबदारी द्यावी, अशी भूमिका शिक्षण खात्यातून पुढे येऊ लागली आहे.

कॉलेज विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणेमधील (सीओईपी) तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा गुरुवारी प्रयत्न केला. ही बाब त्याच्या वर्गमित्रांच्या वेळीच लक्षात आल्याने, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आणि त्याचे प्राण वाचले.

...आणि भारतीयांच्या स्वप्नांनी खरीखुरी झेप घेतली

$
0
0
रॉकेट तसे छोटेच, वातावरणात पन्नास किलोमीटरपर्यंत पोचणारे.. अमेरिकी बनावटीच्या त्या ‘नाईके अपाची’ या ‘साउंडिंग रॉकेट’ची पुनर्जोडणी झाली. उड्डाणाची वेळ जवळ येताच सर्वांच्या नजरा थुंबाच्या समुद्रकिनाऱ्यावरील तात्पुरत्या लाँचपॅडवर खिळल्या.

७३ टक्के नागरिकांना ‘आधार’

$
0
0
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील आधार कार्डांच्या नोंदणीने वेग घेतला असून, जिल्ह्यातील ६८ लाख नागरिकांची या कार्डांसाठी नोंदणी झाली आहे. पुणे शहरात हे काम अधिक गतीने झाले असून, शहरातील आधार कार्डांच्या नोंदणीची संख्या २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

दोघा संशयित गुन्हेगारांना अटक

$
0
0
कुणाल पोळ यांच्या खुनासाठी वापरलेली सहा पिस्तुले सांभाळणाऱ्या दोघा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. या दोघाही गुन्हेगारांना पोळचा खून होणार असल्याची माहिती होती, तसेच या खुनासाठी त्यांनी मदत केली असा ठपका त्यांच्यावरआहे.

पूरग्रस्तांना अखेर गाळ्यांची मालकी

$
0
0
पानशेत पूरग्रस्तांना देण्यात आलेले गाळे मालकी हक्काने करून देण्याचा आदेश राज्य सरकारने गुरूवारी काढला आहे. या पूरग्रस्तांना भाडेपट्टाधारक (एल) न संबोधता ‘धारक’ (एच) म्हणून मिळकत पत्रिकेवर (प्रॉपर्टीकार्ड) नोंद करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

आपली सुरक्षा आपल्याच हाती

$
0
0
ऑटोमेटेड टेलर मशिनच्या (एटीएम) ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षक ठेवणे बँकांना परवडत नसून, बंदुकीच्या परवान्याचा मुद्दाही यातील अडथळा ठरत आहे. त्यामुळे ‘एटीएम’ केंद्राच्या ठिकाणी ग्राहकांनीच पुरेशी काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाट्यगृहाच्या उद्घाटनावरून रंगले राजकीय नाट्य

$
0
0
महपालिकेच्या वतीने बिबवेवाडी भागात उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे उद‍्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यावरून गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार राजकीय नाट्य रंगले.

मेंटल हॉस्पिटलची सुरक्षा ऐरणीवर

$
0
0
येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील तीन मनोरुग्णांमध्ये झालेल्या मारहाणीवरून पेशंटच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मारहाणीकडे रात्रीच्या ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

एलबीटी न भरणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक संस्था कर (एलबीटी) कायद्याअंतर्गत बाणेर येथे ‘सर्च रेड’ कारवाई केली असून, एक रुपयाचाही एलबीटी न भरणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शाळांमध्ये वाहतूक समितीच नाही

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील प्रत्येक शाळेमध्ये वाहतूक समिती स्थापन करण्याचा निर्णय शालेय विद्यार्थी वाहतूक समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुण्यातील एक हजार ३१० शाळांमध्ये ही समिती स्थापन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

तीन हजार मद्यपी चालक अटकेत

$
0
0
मद्यपान करून बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या तीन हजार ५० जणांना गेल्या वर्षभरात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ही कारवाई केली आहे. शहर आणि परिसरात वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई सातत्याने सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

मनोरुग्णाकडून दोघांचा खून

$
0
0
झोपेत अंगावरील चादर ओढल्याच्या कारणावरून चिडलेल्या एका २८ वर्षांच्या मनोरुग्णाने स्किझोफ्रेनियाच्या अन्य दोघा पेशंटला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये घडली.

BRT नकोय? ८०० कोटी परत द्या!

$
0
0
चांगला रस्ता खराब करणे म्हणजे ‘बीआरटी’ असून, अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असल्याचे नमूद करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

पहिलीचे प्रवेश ऑनलाइन

$
0
0
राज्याच्या शहरी आणि निमशहरी भागांतील सर्व शाळांमधील बालवाडी आणि पहिली या इयत्तांसाठीचे प्रवेश केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यांत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

गुजरात गिरवणार महाराष्ट्राचा कित्ता

$
0
0
महाराष्ट्रातील जमीन अभिलेखांशी संबंधित राबविल्या जाणाऱ्या इ-चावडी, इ-मोजणी, इ-स्कॅनिंग या प्रगत तंत्रज्ञानाधारित योजनांचे मॉडेल आता गुजरातमध्ये राबविले जाणार आहे.

शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नाही

$
0
0
खेड विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध करणा-या शेतक-यांशी लवकरच चर्चा करून त्यातून सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images