Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ICT’ सक्तीचे करताना सुविधांची पाहणी का केली नाही?

$
0
0
राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञानाचा (आयसीटी) विषय सक्तीचा करताना सर्व शाळांमध्ये त्यासाठीच्या प्रॅक्टिकलसाठीची सुविधा आहे की नाही, याची पाहणी राज्य सरकार वा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने का केली नाही, असा सवाल शिक्षणविश्वातून उपस्थित केला जात आहे.

संतोष मानेला जेलमध्ये धोका

$
0
0
स्वारगेट येथे बेदरकारपणे बस चालवत नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी संतोष माने याला जेलमध्ये धोका असल्याचे पत्र येरवडा जेल प्रशासनातर्फे कोर्टात सादर करण्यात आले आहे.

मद्यपी चालकाने वाहनांना उडवले

$
0
0
जंगली महाराज रोडने डेक्कनच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या तळीराम कारचालकाने पीएमपी बस डेपोसमोर चार दुचाकी, एक रिक्षा आणि हातगाडीला उडवून सहा नागरिकांना जखमी केले.

‘पीएफ’बाबत ‘पीएमपी’ डिफॉल्टर

$
0
0
आर्थिक विवंचनेमुळे घरघर लागलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) कर्मचाऱ्यांचा तब्बल एक कोटी १९ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) भरला नाही म्हणून एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (ईपीएफओ) ‘पीएमपी’ला ‘डिफॉल्टर’ म्हणून जाहीर केले आहे.

‘एलबीटी’ची पहिलीच ‘सर्च रेड’

$
0
0
स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) भरणा अपेक्षेनुसार होत नसल्याने कर चुकविणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महापालिकेने बुधवारी प्रथमच कारवाई केली. एलबीटी कायद्यांतर्गत ईशान्य मॉलमधील तीन व्यावसायिकांवर ‘सर्च रेड’ टाकून दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली.

घरे आणखी महागणार?

$
0
0
मंदीसदृश परिस्थितीतही शहर व ग्रामीण भागात जमिनीची खरेदी-विक्री आणि मालमत्तांच्या वाढलेल्या व्यवहारांमुळे नवीन वर्षात बाजार मूल्यांकनाच्या दरामध्ये (रेडिरेकनर) १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरे आणखी महागणार आहेत.

पहिलीचे प्रवेशही केंद्रीय पद्धतीने

$
0
0
राज्याच्या शहरी आणि निमशहरी भागांतील सर्व शाळांमधील बालवाडी आणि पहिली या इयत्तांसाठीचे प्रवेश केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यांत ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. खासगी शाळांनी आपली स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबविल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

पुण्यातही पियानो ‘इन डिमांड’

$
0
0
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षांपासून रुक्साना अंकलेसरिया डॉक्टर यांनी पियानो वाजविण्यास सुरुवात केली. पुढे कॅनडात राहून त्यांनी या वाद्यावर कौशल्य मिळविले आणि आता पुण्यातील पियानोप्रेमींसाठी त्या दरवर्षी पियानो फेस्टिव्हल आयोजित करीत आहेत.

आरटीओतील रिक्त पदांना मुहूर्त मिळेना

$
0
0
गेल्या काही वर्षांपासून आरटीओमध्ये मोकळी असणारी ५१ पदे भरण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडत नसल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत असल्याचे समोर आले आहे. रिक्त असणारी पदे भरण्यासंदर्भात आतापर्यंत परिवहन विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी हे काम अद्याप मार्गी लागू शकलेले नाही.

‘माननीयां’ची स्विमिंगपुलावर उधळपट्टी

$
0
0
शहरातील विविध भागांत असलेले सात स्विमिंग टँक वापर नसल्याने ‘कोरडे’ पडले असतानाही हडपसर येथे नव्याने स्विमिंग टँक उभारण्यासाठी दीड कोटी रुपये देण्यास दिलेली मंजुरी म्हणजे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशाची उधळपट्टी आहे.

पालिका हॉस्पिटलमध्ये औषधेच ‘बेपत्ता’

$
0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला आवश्यक ती औषधे उपलब्ध व्हावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण ‌समितीच्या वतीने पालिकेत आंदोलन करून प्रभारी‌ आरोग्य प्रमुखांना घेरावा घालण्यात आला.

‘एनडीए’च्या छात्रांना मगरीचा धोका

$
0
0
खडकवासला धरणाच्या पाण्यात असलेल्या मगरीचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला धोका निर्माण होऊ लागला आहे. खडकवासला धरणाच्या पाण्यात मगर असून तिच्या शोधासाठी एनडीएतर्फे विविध उपाय योजण्यात येत आहेत. परंतु, अजूनही मगरीचा शोध लागला नसल्याने एनडीएमधील नौदल प्रशिक्षणावर निर्बंध आले आहेत.

‘एनडीए’मधील प्रवेशक्षमता वाढणार

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) छात्रांसाठी नवीन सोळावी स्क्वाड्रन उभारण्यात येत असून पाचव्या बटालियनची उभारणी करण्याबाबतचा प्रस्तावही देण्यात आला आहे. परिणामी, प्रवेशक्षमतेत वाढ होण्याबरोबरच छात्रांना अधिक चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे.

‘हेरिटेज’ आराखडा तयार; हवा केंद्राचा निधी

$
0
0
पुण्यातील वारसा स्थळांचा कृती आराखडा तयार झाला असून यात पर्यावरण आणि वास्तूंना महत्त्व देण्यात आले आहे. या वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी पुणे महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्निमाण अभियानाअतंर्गत निधी मागितला आहे.

अभिजात दर्जासाठी मराठीचा प्रस्ताव केंद्राकडे

$
0
0
मराठी भाषेला तब्बल दोन हजार वर्षांचा वारसा लाभला असून तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे नुकताच एक प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या निर्मितीमध्ये अभ्यासकांनी सहकार्य केले आहे, अशी माहिती नगरविकास, क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिली.

महालोकअदालतीत उद्या सव्वा लाख केसेस

$
0
0
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार, दि. २३ नोव्हेंबररोजी होणाऱ्या राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये एक लाख ३४,१९९ केसेस निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यात ७५ हजार दाखलपूर्व केसेसचा समावेश आहे.

‘पॅरासाइट’वर विद्यापीठाचा बडगा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अधिकृत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठ ही कारवाई करणार असून, त्याला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली.

पीएमपी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) कंत्राटी कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) कपात न केल्यामुळे ‘पीएमपी’वर ‘डिफॉल्टर’ होण्याची नामुष्की आली आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र कामगार मंचने केली आहे.

गुजरात राबविणार महाराष्ट्राचे लँड रेकॉर्ड मॉडेल !

$
0
0
महाराष्ट्रातील जमीन अभिलेखांशी संबंधित राबविल्या जाणाऱ्या ई-चावडी, ई-मोजणी, ई-स्कॅनिंग या प्रगत तंत्रज्ञानाधारित योजनांचे मॉडेल आता गुजरातमध्ये राबविले जाणार आहे. गुजरातचे जमाबंदी आयुक्त व त्यांचे एक पथक या तंत्रज्ञानाच्या पाहणीसाठी पुण्यात दाखल झाले असून त्यांनी या योजनांची माहिती घेतली.

ठरवून झाले ‘ऐनवेळी’चे प्रकाशन!

$
0
0
‘संस्थापकाने पक्ष न बदललेला एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना. त्या पक्षाच्या संस्थापकाने अर्थातच, शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्यावर मी ‘सामना’ या वृत्तपत्रात लिहू लागलो.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images