Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाघांसाठी मुंबई ते ताडोबा फेरी

0
0
जंगलातून नष्ट होत असलेल्या वाघांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘ग्रेट आउटडोअर्स’तर्फे ‘टायगर सायक्लो-वॉक’ हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.

मात्र, रस्त्याचा पत्ताच नाही!

0
0
पुणे स्टेशनवर वाढलेली गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर येथे नवीन स्टेशन करण्याची योजना तयार केली असली तरी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता कुठे करायचा, या मुद्द्यावर हा प्रश्न अडकून राहिला आहे.

‘वंचित’ बालकांना मातेचे दूध मिळणार

0
0
मातेच्या दूधापासून वंचित असलेल्या तसेच उपचारासाठी नवजात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या नवजात शिशूंना ससून हॉस्पिटलच्या मातृ दुग्ध पेढीतून आता मातेच्या दुधाची मोफत संजीवनी देण्यात येणार आहे.

राज्य सहकारी संघाचे १२७८ कोटींचे नुकसान

0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे १२७८ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल संघाच्या ‘बीओटी कमिटी’च्या सदस्यांवरील जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई सुरू झाली आहे.

‘नायजेरियन फ्रॉड’पासून सावधान

0
0
इन्कम टॅक्स रिटर्न, कर्ज काढून देणे, लग्न करण्याचा बहाणा, ब्लॅक डॉलर व्हाइट करून देणे, फायनान्स करणे, बनावट मेल पाठवून बँक अकाउंटचे डिटेल्स घेणे, मेल अकाऊंट हॅक करणे, लॉटरी लागल्याचा बहाणा करणे... अशा विविध प्रकारे नागरिकांना फसवण्याच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

केंद्राचा निधी मिळाल्याने टपाल खाते कात टाकेल

0
0
टपाल खाते अत्याधुनिक करून अधिक सक्षमपणे सेवा देण्यासाठी केंद्र सरकारने चार हजार ९०९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आगामी काळात पोस्ट खात्याचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास राज्याचे मुख्य पोस्टमास्तर जनरल के. सी. मिश्रा यांनी व्यक्त केला.

वाहतूक समितीचा बोजवारा

0
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या शालेय वाहतूक समितीच्या बैठकीमध्ये शहरातील प्रत्येक शाळेमध्ये वाहतूक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अधिकारी असल्याचे सांगून डॉक्टरला फसविले

0
0
शासकीय अधिकारी असल्याचे भासवून एका डॉक्टरला १६ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

प्रश्नपत्रिकांना उशीर; उत्तरपत्रिका वेळेत

0
0
इंजिनीअरिंगच्या परीक्षेत ऑनलाइन प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याने मंगळवारी गोंधळ झाला.

एस. एम. जोशींच्या टपाल तिकिटाला विलंब

0
0
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार व ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या टपाल तिकिटाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.

मुख्याध्यापक कसे जबाबदार?

0
0
शालेय वाहतुकीची जबाबदारी सरसकट मुख्याध्यापकांवर सोपविणे योग्य नसल्याची भावना अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त मंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आमचेच अभ्यास बंद का?

0
0
सामाजिक जबाबदारीचे गणित जुळवित बहिःस्थांचे अभ्यासक्रम सुरू ठेवणाऱ्या पुणे विद्यापीठाने गणिताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत मात्र विद्यार्थ्यांची निराशाच केली.

७ स्विमिंग टँक बंद; तरीही नव्यासाठी १.५ कोटी

0
0
कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने बांधलेल्या स्विमिंग टँकपैकी सात टँक बंद पडलेले असतानाही हडपसर येथील क्रीडा संकुलात नवीन स्विमिंग टँक बांधण्याचा अट्टाहास केला जात आहे.

नेहरू स्टेडियमचे भाडे ५ पटींनी वाढले

0
0
नेहरू स्टेडियम येथील गाळे आणि इतर सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय माफक भाडेदरांत वापरणाऱ्या क्रीडा संघटना आणि राजकीय वरदहस्त लाभलेल्या संस्थांना आता त्यासाठी पाचपट शुल्क मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

दाभोलकर हत्येचा तपास अपूर्णच

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला बुधवारी तीन महिने पूर्ण होत असताना त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आरोपींना पकडण्याचे २५हून अधिक ‘ट्रॅप’ अयशस्वी झाल्यानंतरही पोलिसांकडून आणखी एका ‘ट्रॅप’वर लक्ष केंद्रित केले आहे.

तज्ज्ञांच्या सूचना धाब्यावर

0
0
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) आधुनिकीकरणाचाच एक भाग म्हणून आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या एका उच्चपदस्थ समितीने ‘बालभारती’च्या आयटी विभागाच्या पुनर्बांधणीच्या सूचना केल्या होत्या.

१० वी ‘ICT ’चे प्रॅक्टिकल ‘ऑप्शन’ला

0
0
राज्यभरातील ६५ टक्के शाळांमध्ये कम्प्युटर लॅबची सुविधा नसल्यामुळे दहावीसाठीच्या ‘इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ (आयसीटी) या विषयाच्या प्रॅक्टिकल शाळांच्या सोयीनुसारच घेतली जाणार आहेत.

पाचगाव पर्वतीची सुरक्षा धोक्यात

0
0
पाचगाव पर्वतीच्या सुरक्षेसाठी निधी वापरायचा नाही, असा हट्ट धरलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे टेकडीवर गस्त घालणारे सुरक्षारक्षक सध्या ‘ऑक्सिजन’वर आहेत.

‘भारतरत्न’ला कोर्टात आव्हान

0
0
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला ‘भारतरत्न’देण्यास येथील एका माजीसैनिक वकिलाने न्यायालयात आव्हान दिले आहे. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या या दाव्यात सचिनला हा किताब देणे योग्य नसल्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.

उर्जा खात्याकडून कोटींची लूट

0
0
गेल्या दहा वर्षांत कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांवरील वाया गेलेला खर्च यांमुळे वीजगळती लपवून व कृषिपंपांचा खोटा वापर दाखवून उर्जा खात्याने महाराष्ट्रातील जनतेची ७३ हजार कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images