Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोसायट्याही आता ‘गॅस’वर!

$
0
0
घरगुती गॅस सिलिंडरच्या वैयक्तिक ग्राहकांप्रमाणेच आता पाइपगॅसचा अवलंब करणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांनाही सिलिंडरचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याची योजना (डीबीटी) लागू होणार आहे.

नवीन बीआरटी इतक्यात नाही

$
0
0
संगमवाडी-आळंदी रोडसह नगर रोडवरील प्रस्तावित मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता झाल्याशिवाय बीआरटी सुरू केली जाणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा पीएमपी प्रशासनाने दिला.

ससूनचा होतोय मेकओव्हर

$
0
0
जुन्या झालेल्या फरशा, रंग उडालेल्या भिंती आणि साचेबद्ध आकाराचे दरवाजे हे गेली साठ वर्षे असणारे ससून हॉस्पिटलचे चित्र लवकरच बदलणार आहे.

कुत्र्याला फ्रॅक्चर,तरुणाविरुद्ध FIR

$
0
0
रस्त्यावर मोकाट फिरणा-या कुत्र्याला बॅट फेकून मारून त्याचा पाय फ्रॅक्चर करणा-या १६ वर्षीय युवकाविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘शिवनेरी’ला स्पीड लॉक

$
0
0
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये व्होल्वो बसला झालेल्या अपघातामुळे एसटीने शिवनेरी बसच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. एसटीच्या ताफ्यात असणाऱ्या सर्व शिवनेरी व्होल्वो बसेसचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी या गाड्यांना स्पीड लॉक करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

अमंगल अमेरिकी प्रपोजल

$
0
0
खासगी कंपनीच्या जनरल मॅनेजरला (फायनान्स) विवाह जुळविणाऱ्या एका वेबसाइटवरून १८ लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवनमान उंचावण्यास संशोधन हवे

$
0
0
‘संशोधनाच्या माध्यमातून आयुर्मर्यादा वाढत असली, तरी त्यातून जीवनमान उंचावतेच असे नाही. समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. त्यासाठी सध्या कृत्रिम झालेल्या शिक्षणव्यवस्थेत संशोधन करून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी रविवारी केले.

मारिओ यांच्या चित्रांचं प्रदर्शन

$
0
0
‘टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप’मध्ये कार्टूनिस्ट म्हणून काम करणारे गोव्याचे दिवंगत चित्रकार मारिओ दी मिरांडा यांच्या चित्रांचं प्रदर्शन सध्या कॅम्पमधील अयताना आर्ट गॅलरी इथं सुरू आहे.

संत नामदेवः एक अलौकिक युगपुरुष

$
0
0
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरहून आळंदीकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीकरता निघालेली आहे. ही पालखी २५ नोव्हेंबरला सायं. सात वाजता पुण्यात श्री राममंदिर, एम.जी.रोड, कँप येथे येणार आहे.

नगरसेवकांच्या बजेटला कात्री

$
0
0
महापालिकेने जकात रद्द करून सुरू केलेल्या स्थानिक संस्था करातून (एलबीटी) कमी उत्पन्न मिळत असल्याने शहराच्या विकासासाठी पालिकेने हाती घेतलेले मेट्रो, पीएमपीएमएलची बसखरेदी, यांसह जेएनएनयुआरएम योजनेच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

क्रिकेटच्या संग्रहालयाची घोषणा हवेतच

$
0
0
क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे नाव जगभर पोहचविणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावाने बाणेर, बालेवाडी परिसरात संग्रहालय उभारण्याची महापालिकेने केलेली घोषणा हवेतच विरली आहे.

कॅन्टोन्मेंटच्या दंडाकडे पालिकेची पाठ

$
0
0
बेकायदा बांधकामांवर कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेनेच पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत बेकायदा बांधकाम केल्यामुळे दंड भरून संबंधित बांधकाम नियमित करून घेण्याचे फर्मान बोर्डाने महापालिकेला सोडले आहे.

महापालिका वाहनांना खासगी पंपांवरून डिझेल

$
0
0
महापालिकेच्या वाहनांसाठी आवश्यक असलेली डिझेलची खरेदी खासगी पंपावरून करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याने डिझेलच्या प्रती लिटरमागे १४ रुपये पालिकेला कमी द्यावे लागणार आहे.

सेवेतील त्रुटीवरून कुरिअर कंपनीला दंड

$
0
0
हैद्राबादला कुरिअर करण्याची जबाबदारी घेऊन नंतर तेथे कुरिअर सेवा उपलब्ध नसल्याचे सांगून उद्योजकाचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ग्राहक मंचाने कु​रिअर कंपनीला सेवेत त्रुटी ठेवल्याप्रकरणी दहा हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

येरवडा जेलच्या लिपिकाने केल्या बनावट नोंदी

$
0
0
येरवडा जेलमधील कार्यालयातील रोकडवहीत बनावट नोंदी करून सहा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ लिपिकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

७ दिवसांची मुदत ; तीव्र आंदोलनाचा इशारा

$
0
0
पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदीच्या पुलावरील सुरक्षेचे काम येत्या सात दिवसांमध्ये पूर्ण न केल्यास २७ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नवभारत नागरिक मंचाच्या प्रमुख विनिता देशमुख यांनी दिला.

पुणे-सातारा मार्ग पुन्हा तपासणार

$
0
0
पुणे-सातारा महामार्गाची सुरक्षिततेच्या कारणास्तव पुनश्च तपासणी करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही तपासणी करण्यात येणार असल्याचे ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

एलकुंचवार यांना ‘पुल स्मृती सन्मान’

$
0
0
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यंदाच्या पुलोत्सवात ‘पुल स्मृती सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्य नाट्यच्या अंतिम फेरीचे विकेंद्रीकरण

$
0
0
राज्य नाट्य स्पर्धेला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेपाठोपाठ आता हिंदी नाट्य स्पर्धा आणि संगीत नाटक स्पर्धा यांच्याही अंतिम फेरीचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनसाखळी चोरीच्या ३ घटना

$
0
0
दोन बिबवेवाडी, हिंगणे खुर्द आणि कोथरूड येथे तीन सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे केले असून, या घटनांमध्ये सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images