Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरोग्य विद्यापीठाच्या प्राथमिक मतदार याद्या प्रसिद्ध

$
0
0
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळ व प्राधिकरणांच्या एकूण १८६ जागांसाठीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, मतदारांच्या प्राथमिक मतदार याद्या विद्यापीठाने शुक्रवारी प्रसिद्ध केल्या.

पाणीटंचाईवर मात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची

$
0
0
शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चे अभियान हाती घेण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यात सरकारी, निमसरकारी आणि महापालिकेच्या तसेच नागरिकांच्या बिल्डिंगांमध्ये हे प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष मेधा कुलकर्णी यांनी दिली.

पगारापेक्षा भत्तेच अधिक

$
0
0
पुणे विद्यापीठातील क्लास वन अधिकाऱ्यांना विद्यापीठाच्या तिजोरीतून दिले जाणारे वेगवेगळे भत्ते विद्यापीठ प्रशासनाच्या रडारवर आहेत. पगारापेक्षा भत्तेच अधिक अशी अनेकांची स्थिती आहे.

अंध विद्यार्थ्यांसाठी ई-बुकची निर्मिती

$
0
0
जन्मजात अंधत्वावर मात करत उच्च शिक्षणात भरारी घेण्याचे ध्येय बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या अंध विद्यार्थी अध्ययन केंद्राने विशेष पुढाकार घेतला आहे.

मागास समाजात वर्णी लावण्याचे पेव

$
0
0
'आरक्षणासाठी मागास समाजाची जात चोरण्याचे राजकारण सध्या सुरू आहे. मागास समाजात वणीर् लावण्याचे पेव फुटल्याने समाजाला मागासपणाचे डोहाळे लागले आहेत,' असे मत प्रा. हरी नरके यांनी नुकतेच व्यक्त केले.

जस्मिन क्रांतीनंतर आता इजिप्तमध्ये एज्यु-क्रांती

$
0
0
पुरातन 'ममी' पाहण्यासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या इजिप्तला आता शैक्षणिक क्रांतीचे वेध लागले आहेत. देशात माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने इजिप्तच्या सुप्रिम कौन्सिल ऑफ युनिव्हर्सिटीजने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाशी (एमकेसीएल) नुकताच करार केला आहे.

व्याघ्रदर्शन महत्त्वाचे की वाघांना वाचविणे?

$
0
0
'इको टुरिझम धोरण राबविल्याने जंगलातील माणसाचा वावर वाढणार असून, वाघांसह इतर वन्यप्राण्यांना यामुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे वाघाचे वास्तव्य असलेल्या भागात पर्यटकांवर बंदी आणली पाहिजे.

बस तोडफोडप्रकरणी भाजपच्या दोघांना अटक

$
0
0
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुकारलेल्या भारत बंददरम्यान शनिवारवाडा येथे दोन बसवर दगडफेक केल्याप्रकरणी भाजपच्या एका नगरसेवकासह दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

डॉ. विनोद इंग्लंडमधील योग संस्थेच्या सदस्यपदी

$
0
0
पुण्यातील महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन या योगसंस्थेचे संचालक योगी डॉ. संप्रसाद विनोद यांची इंग्लंडमधील 'योग फॉर हेल्थ अॅण्ड एज्युकेशन ट्रस्ट'चे (वायएचईटी) सदस्य म्हणून निवड झाली आहे.

भाड्यातील सवलतीसाठी मालिका निर्मात्यांचे प्रयत्न

$
0
0
मुंबईच्या दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण केल्यास मराठी मालिकांना भाड्यामध्ये ५० टक्के सवलत पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

केरळच्या मुहूर्ताला मान्सूनची हूल

$
0
0
गेल्या पाच-सहा वर्षांची परंपरा खंडित करत, जून उजाडण्यापूर्वीच केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनने यंदा मात्र 'मुहूर्त' चुकविला आहे. एक जूनला मान्सून केरळात दाखल होण्याचा हवामान विभागाच्या अंदाजालाही मान्सूनने 'हूल' दिली आहे.

देहू मंदिराने घेतला मोकळा श्वास

$
0
0
संत तुकाराम महाराज मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील ‘देवपण’ आता लगतच्या परिसरालाही येणार असून, घरे आणि दुकानांनी कोंडलेला मंदिराचा परिसर आता मोकळा श्वास घेत आहे. मंदिराच्या परिसरातील ३२३ मिळकती काढल्याने मंदिर परिसराचा कायापालट झाला आहे.

बुद्धिस्ट सिनेमांचा महोत्सव सुरू

$
0
0
'भारतात उगम झालेला बौद्ध धर्म आता आशिया आणि जगाच्या इतर भागातही पोहोचला आहे. बुद्धविचार ही भारताची जगातील सर्वांत मोठी निर्यात आहे', असे मत ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी व्यक्त केले.

साक्षरतेच्या व्याख्येत केंद्राचे 'ई-क्लिक'

$
0
0
शेतीपासून ग्रामविकासापर्यंत माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे जीवनमान उंचाविण्यासाठी 'इन्क्लुझिव्ह' मोहीम आखताना साक्षरतेची व्याख्याही आता बदलण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खात्याने आखलेल्या मोहिमेत प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती ई-साक्षर करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

अपुरी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या पथ्यावर

$
0
0
महापालिका हद्दीलगतच्या गावांत झालेल्या बेसुमार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याचा फायदा उठवत बिल्डरांनी बेकायदा बांधकामे करून अक्षरश: हात धुवून घेतले आहेत.

जलशुद्धीकरण केंद्राची शिवसेनेकडून पाहणी

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ शिवसेनेनेदेखील सोमवारी पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याने नमुने बाहेरील संस्थेमार्फत तपासून घ्यावेत; तसेच येथील दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

कागदी पिशव्यांच्या अनुदानात घोटाळा

$
0
0
कागदी पिशव्या तयार करणा-या महिला बचत गटांना अनुदान देण्याच्या योजनेमध्ये आर्थिक घोटाळा झाला असून, या योजनेसाठी असलेल्या अनुदानाची लूट करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

आदिवासींना मिळणार हक्काच्या जमिनी

$
0
0
आदिवासींच्या जमिनी घेणाऱ्या खरेदीदारांकडून त्या परत मूळ आदिवासी मालकांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जमिनी परत मिळविण्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केल्याने अदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची नोटीस

$
0
0
जनावरांचे अवशेष उघड्यावर टाकल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नोटिस बजाविण्यात आली आहे. याप्रकरणी वेळेवर दखल न घेतल्यास पालिकेला पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल. अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ए.डी.मोहेकर यांनी दिली.

मान्सून केरळच्या दिशेने

$
0
0
अंदमानमधील गेल्या आठ दिवसांपासूनचा मुक्काम मान्सूनने सोमवारी हलवला. अरबी समुदासह मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भाग व्यापून पुढील ४८ तासांत केरळात दाखल होण्याचे संकेत मान्सूनने दिले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images