Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

श्रीकांत मोघे यांना गदिमा पुरस्कार

0
0
साहित्य, चित्रपट आणि कला क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना जाहीर झाला आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या गदिमा स्मृती समारोहामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अजित पवार हटाओ, महाराष्ट्र बचाओ

0
0
वीज दरवाढीमुळे हैराण झालेल्या उद्योजक, यंत्रमागधारक आणि शेतकऱ्यांच्या संघटनांनी आता 'अजित पवार हटाओ-महाराष्ट्र बचाओ'चा नारा दिला आहे. वीज दरवाढीच्या विरोधात येत्या दहा डिसेंबर रोजी राज्यभरात चक्का जाम व हायवे रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

शिक्षण मंडळाची वेबसाइट ‘अपडेट’

0
0
गेले अनेक महिने ‘अपडेट’ न झालेली महापालिकेच्या शिक्षण मंडळाची वेबसाइट अखेर अपडेट झाली आहे. यापुढील काळात या वेबसाइट बाबतची कोणतीही तक्रार राहणार नाही, अशी हमी शिक्षणमंडळाने दिली आहे.

पेस्को ते डिस्को व्हाया MSEB

0
0
खासगी कंपनीकडून सरकारीकरण...., उभारणीच्या काळापासून ते आर्थिक वैभवाची पायाभरणी...आणि बदलत्या काळानुसार पुन्हा (सरकारी) कंपनीकरण....पूर्वीची पूना इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी (पेस्को), महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ(एमएसईबी) आणि सध्या पुण्याला वीजपुरवठा करणारी महावितरण अर्थात डिस्को अशा पुण्याच्या वीजपुरवठ्याच्या प्रवासाला उद्या (शनिवारी) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.

खेड विमानतळाला ४५० हेक्टर जमीन

0
0
खेडमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भारत फोर्जच्या विशेष आर्थिक क्षेत्रासह निमगाव, दावडी, केंदूर व कन्हेरसर या चार गावांमधील सुमारे ४५० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. संपादित होणाऱ्या एकूण जमिनीपैकी दोनशे हेक्टरहून अधिक क्षेत्र बागायती आहे.

जाहिरात फलकांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई?

0
0
महापालिकेचे नियम डावलून शहरात विनापरवाना जाहिरात फलक उभारणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी.

बचतगटासाठी पालिकेची टेंडरऐवजी थेट खरेदी

0
0
बचतगटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी टेंडर प्रक्रिया न राबविता महिला बचतगटाकडून तीन लाख रुपयांच्या वस्तूंची थेट खरेदी करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

RTO ने मुख्यमंत्र्यांना केले रिक्षाचालक

0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आरटीओने रिक्षाचालक बनवल्याचा प्रकार कर्मचाऱ्याच्या कम्प्युटर पासवर्डच्या गैरवापरामधून झाला आहे, याचा तपास करण्यासाठी संगणकतज्ज्ञांची मदत घेण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांनी सांगितले.

आधुनिक शेतीनेच पाणीटंचाईवर मात

0
0
‘पिकांना ठिबक पद्धतीने पाणी देण्यासंदर्भात गांभीर्याने पावले उचलली, तरच पाणी कमी पडणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करावी लागेल,’ असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

बनावट नोटा बाळगणा-या दोघांना अटक

0
0
बनावट नोटा बाळगणाऱ्या दोन जणांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

‘एलबीटी’ पर्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

0
0
स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) समावेश व्हॅटमध्ये करण्याचा पर्याय असणारा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आला आहे.

रॉकेललाही अनुदानाचा लाभ

0
0
घरगुती गॅस सिलिंडरपाठोपाठ आता रॉकेलचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली असून पुणे विभागातील तब्बल ३३ लाख ७५ हजार रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पेशवे उद्यानाला ३ लाखांची ‘दिवाळी गिफ्ट’

0
0
दिवाळीच्या सुट्टीत बालगोपाळांनी पेशेवे पार्कला पसंती देत, पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेले साहसी खेळ खेळण्याबरोबरच फुलराणीत बसण्याचा आनंद घेतल्याने पंधरा दिवसात पालिकेला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

‘गेम’ ऑन, ‘खेळाडू’ हवेत!

0
0
भारतात गेम उद्योग मोठा नसला, तरी त्याचा विकास करणाऱ्या कंपन्यांमध्ये वेगाने वाढ होत आहे. एक हजार कुशल मनुष्यबळाची मागणी असताना पाचशेपेक्षाही कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे.

गावकऱ्यांवर निर्णय लादला

0
0
‘कस्तुरीरंगन अहवालातील शिफारसी मान्य करून केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील गावकऱ्यांवर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र लादले आहे.

मोबाइल टॉवर घातक नाहीत

0
0
‘मोबाइल फोनच्या नेटवर्कसाठी उभारल्या जाणाऱ्या टॉवर्समधून होणाऱ्या उत्सर्जनातून सार्वजनिक आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही.

गर्जेल तो पडेल काय?

0
0
पीएमपीची सेवा खिळखिळी झाल्याची ओरड करणाऱ्या पुणेकरांना बससेवेच्या संदर्भात तक्रारी देण्यासाठी प्रवासी दिनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध केली होती.

‘ना विकास’चा TDR पालिकेकडे द्या

0
0
शिवणे ते खराडी या रस्त्यासाठी ‘ना विकास विभागा’तून जाणाऱ्या रस्त्याचा टीडीआर देण्याचे हक्क पालिकेकडे देण्याची विनंती पालिका आयुक्तांतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

तापमानात वाढ; गारवा कायम

0
0
थंडी कायम असली, तरी शुक्रवारी शहराच्या तापमानात किंचित वाढ झाली. शुक्रवारी किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

RTOचे 'ऑपरेशन अचानक'

0
0
वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते आणि वाहतूक पोलिस नसतो, अशा ठिकाणी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन अचानक’ मोहीम सुरू केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images