Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बहिःस्थांसाठी दार खुले

0
0
सरसकट सर्व इच्छुकांसाठी बहिःस्थ अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने अखेर बुधवारी घेतला. यामुळे पदव्युत्तर पदवीसाठी बहिःस्थ पद्धतीने नोंदणी करणाऱ्या सर्वांचा मार्ग मोकळा झाला आहे.

नरेंद्र मोदींना भैरप्पांचा पाठिंबा

0
0
ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इतकेच नव्हे, तर ‘देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी मोदींना दोन तृतीयांश बहुमत द्यावे,’ असे आवाहनही केले आहे.

सावधान... मुले हरवताहेत!

0
0
मुलांचे शिक्षण, संगोपन, त्यांचे आरोग्य या विषयी सातत्याने प्रशासनाच्या पातळीवर धोरणे राबविली जात आहेत. पण छोट्यामोठ्या कारणांवरून घर सोडून जाणाऱ्या मुलांना कसे थांबवता येईल, याबाबत मात्र प्रशासन हतबल झाले आहे.

मिसेस वर्ल्ड स्पर्धेत जाणार शिल्पा

0
0
जगभरातील विवाहित महिलांसाठी असणाऱ्या ‘मिसेस वर्ल्ड ब्युटी पॅजंट’ या सौंदर्य स्पर्धेत शिल्पा भगत भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. यंदा ‘मिसेस वर्ल्ड २०१३’ ही स्पर्धा चीनमधल्या गुआंगझाउ इथं १४ ते २३ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

थंडीचा कडाका वाढला

0
0
थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे पुणेकरांना आता हुडहुडी भरायला लागली आहे. त्यामुळे आता स्वेटर शालींबरोबरच उबेसाठी शेकोट्याही पेटवल्या जाऊ लागल्या आहेत.

गोळ्या घालून तरुणाचा खून

0
0
एका हार्डवेअरच्या दुकानातील कामगाराचा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून खून केला. ही घटना भोसरी लांडेवाडी येथे बुधवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अनिल पुनियाराम विश्वकर्मा (वय ३०, रा. पगारिया प्लाझा, शीतलबाग जवळ, भोसरी ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गुंड कुणाल पोळची निर्घृण हत्या

0
0
पुण्याच्या शंकरशेठ रोजवर सेव्हन लव्ह्ज चौकाजवळ असलेल्या सम्राट प्युअर व्हेज हॉटेलमध्ये गुंड कुणाल पोळ याची रात्री साडेबाराच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. दहा ते पंधरा हल्लेखोरांनी पोळवर तुफान गोळीबार केला. अनेक गोळ्या लागल्यामुळे पोळच्या शरीराची पुरती चाळण झाली आहे.

कादंबरीने मराठी साहित्य समृद्ध झाले नाही

0
0
मराठी कादंबरीमध्ये सर्व समाजघटकांचा विचार झालेला नाही, कादंबरीमध्ये वास्तववादाच्या नावाखाली भरताड कोंबण्यात आली, रूपबंधाचे प्रयोग नाही, अशी परखड निरीक्षणे नोंदवत ज्येष्ठ समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांनी कांदबरीमुळे गेल्या पन्नास वर्षांत मराठी साहित्यविश्व समृद्ध झाले नसल्याचे मत व्यक्त केले.

मोबाइल टॉवरची संख्या अद्याप गुलदस्त्यातच

0
0
शहरात नेमके अधिकृत आणि अनधिकृत मोबाइल टॉवर किती याची माहिती घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीने सहा महिन्यांनंतरही अद्याप त्याबाबतच्या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल पालिकेला सादर केलेला नाही. त्यामुळे, अनधिकृत मोबाइल टॉवरवरील कारवाई थंडावली असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

परीक्षेच्या टेन्शनमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

0
0
आयआयटी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुरामुळे परीक्षेची तयारी करताना आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. श्रीकांत माणिकराव उंद्रे (वय १८, रा. रोहन हाइट्स, महेशनगर पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी बिल्डिंग एक वर्षात

0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रीन बिल्डिंगच्या उभारणीला आता मुख्य सचिवांच्या समितीच्या मान्यतेची प्रतीक्षा असून नवीन वर्षातच या इमारतीच्या उभारणीला मुहूर्त लागेल असे चित्र आहे. या इमारतीच्या खर्चाचा अंतिम आराखडा ६० कोटी रुपयांचा झाला आहे.

सल्लागार अन् तिजोरीवर भार

0
0
अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करून या नियुक्त्यांना नागरी हक्क सुरक्षा समितीने विरोध दर्शविला आहे.

लाखोंच्या मलईसाठी ठेकेदारांशी साटेलोटे

0
0
मीटर जोडणी, लोड मंजूर करणे, ​​विजबिले कमी करून देणे या कामांमध्ये सामान्यांना नाडणाऱ्या महावितरण कंपनीच्या भ्रष्टाचाराच्या अख्यायिका सर्वदूर पसरल्या आहेत. त्यात आता ठेकेदारांशी साटेलोटे करून सबस्टेशन उभारणे, लाईन टाकण्यासारख्या मोठ्या कामांमध्ये लाखो रुपयांची मलई खाण्याचे प्रकारही सर्रास घडत असून या भ्रष्टाचाऱ्यांना रोखणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

स्वस्त घरकुलप्रकरणी आर्थिक फसवणूक

0
0
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 'जेएनएनयुआरएम' अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या स्वस्तात घरकुल प्रकल्पाबाबत नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांनी केली आहे.

वाहतूक आराखडा समजावणारी पुस्तिका

0
0
पुण्याच्या वाहतुकीचे दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी पुणे महापालिकेने सर्वंकष वाहतूक आराखडा (काँप्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करून घेतला आहे. मात्र, हा आराखडा इंग्रजीमध्ये आणि तांत्रिक भाषेत असल्याने त्यातील तत्त्वे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ या संस्थेने ‘एनयूटीपी-सीएमपी ही काय भानगड आहे बुवा?’ ही पुस्तिका तयार केली आहे.

बहिःस्थांचे प्रवेश ३० नोव्हेंबरपर्यंत

0
0
पुणे विद्यापीठाने सरसकट सर्वांसाठी खुल्या केलेल्या बहिःस्थ अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व इच्छुकांना या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाइटवरच उपलब्ध असणाऱ्या वेबपोर्टलच्या माध्यमातून प्रवेश घेता येणार आहेत.

ग्रीन बिल्डिंगचा अंतिम आराखडा साठ कोटींचा

0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रीन बिल्डिंगच्या उभारणीला आता मुख्य सचिवांच्या समितीच्या मान्यतेची प्रतीक्षा असून नवीन वर्षातच या इमारतीच्या उभारणीला मुहूर्त लागेल असे चित्र आहे. या इमारतीच्या खर्चाचा अंतिम आराखडा ६० कोटी रुपयांचा झाला आहे.

खडकवासल्यातील झाडांवर घाला

0
0
खडकवासला धरणातील गाळ काढून त्या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांवर समाजकंटकांनी घाला घातला आहे. या परिसरात नव्याने लावलेली झाडे तोडण्याबरोबरच लोखंडी सळ्या, तारा, फलक आदी साहित्य चोरीला गेले आहे.

जीवनशैलीमुळेच डायबेटिस

0
0
जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यानेच डायबेटिसची व्याधी जडते असते नाही; तर, बदलती जीवनशैली आणि व्यसनाधीनतेमुळेही डायबेटिस होत असल्याचे समोर आले आहे. देशभरातील सुमारे सदतीस कोटी लोक डायबेटिसग्रस्त असून, २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये डायबेटिस होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वीस टक्के फ्लॅट्स गरीबांसाठी

0
0
महापालिका क्षेत्रांमध्ये एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर यापुढे २० टक्के फ्लॅट्स आर्थिक दुर्बल/अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखून ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच, हे फ्लॅट्स तीनशे ते पाचशे स्क्वेअर फुटांचे असावेत, अशी अटही घालण्यात आली असल्याने परवडणारी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images