Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कम्युनिटी फार्मासिस्ट’ संकल्पना रुजविणार

$
0
0
आपल्याकडे फार्मासिस्ट म्हणजे औषध विक्रेता अशी संकल्पना रूढ आहे. या रूढ संकल्पनेपुरेसे मर्यादित न राहता, फार्मासिस्टची ‘इमेज’ सुधारण्याचा विडा ‘द महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल’ने उचलला आहे.

कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होणार

$
0
0
शहरात केल्या जाणा-या कामांचा दर्जा कायम राखण्यासाठी तीन लाख रुपयांपासूनच्या सर्व कामांचे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ केले जाणार असल्याचे पालिकेने मंगळवारी स्पष्ट केले.

लोणावळा पालिकेची इमारत कोसळली

$
0
0
लोणावळा नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब मंगळवारी दुपारी अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खडकवासल्यात ३० हजारांचा गुटखा जप्त

$
0
0
खडकवासला येथील एका विक्रेत्याकडून तीस हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त करून कारवाई केली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सहकार्याने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला.

पत्नीला छळणा-या पतीला सक्तमजुरी

$
0
0
हुंड्यासाठी पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत पतीला एक वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

महिलांना स्वतंत्र तिकीट खिडक्या

$
0
0
सुरक्षिततेसाठी महिलांना तिकीट घेण्यासाठी स्वतंत्र खिडक्या उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्रीय प्रवासी सुविधा समितीने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच, रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक प्लॅटफार्मवर चकाचक ठेवण्याचा सल्लाही समितीने दिला.

नव्या कांद्यानेही डोळ्यात आणले पाणी

$
0
0
बाजारात दाखल झालेल्या नवीन कांद्याच्या किंमतीही चढू लागल्या आहेत. घाऊक बाजारपेठेत या कांद्याचा दर ३० ते ४० रुपयांपर्यंत गेला आहे, त्यामुळे आणखी काही दिवस कांद्याचे दर तेजीमध्ये राहाणार आहेत.

औषधांच्या टेंडरमधील घोळ उघड

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये औषधे पुरविण्यासाठी राबविलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याने टेंडर रद्द करण्याची नामुष्की बोर्डावर आली आहे.

‘आरटीओ’चे कामकाज सुरळीत

$
0
0
लोकांच्या रोषानंतर स्टेशनरी उपलब्ध झालेल्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामकाज सोमवारी सकाळपासून सुरळीत झाले. पुन्हा काम बंद होण्याच्या भीतीमुळे लोकांनी गर्दी केल्याने रांगा लागल्या होत्या.

आडमुठ्या रिक्षाचालकांवर ‘नजर’

$
0
0
‘अहो काका, लक्ष्मी रोडला जायचे आहे. मात्र, २० मिनिट थांबावे लागणार’... ‘येईन! मात्र, वेटिंग चार्ज घेईन मी...’ ‘साहेब, इलेक्ट्रॉनिक मीटर लागले. परंतु, आता तर, आपोआपच बिघाड होतो. वाटेल तेवढे पैसे दाखविले जातात.

अपहरण करणारा गुन्हेगार गजाआड

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्याऱ्या प्रमुख आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला डेक्कन पोलिसांनी अटक केली. या तरुणाला दिवसभर डांबून ठेवून बेशुद्ध झाल्यावर नदीपात्रात टाकून दिल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

रिक्षाचा पहिला टप्पा १.५ किलोमीटर?

$
0
0
रिक्षा प्रवासाच्या पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यात आता बदल करून तो दीड किलोमीटरचा करण्यात येणार आहे. त्यामुळे एका किलोमीटरसाठी प्रवाशांना १६ रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या अनेक विभागांचे ऑडिटच नाही

$
0
0
महापालिकेतील अनेक विभागांचे गेल्या १० ते १२ वर्षांपासून लेखापरीक्षणच झाले नसून, या विभागातील अधिकारी कामच करत नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी सभागृहासमोर उघड झाली.

अतिक्रमण कारवाईबाबत ‘नरो वा, कुंजरो वा’

$
0
0
शहरातील अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांसह पथारी व्यावसायिक-फेरीवाल्यांवर कारवाई करताना धोरण निश्चित करा; गरिबांचा विचार करा, अशी आर्जवी विनंती करणाऱ्या नगरसेवकांमुळे अखेर अतिक्रमण कारवाई करायची की नाही ते ठरवा, असा सवाल थेट आयुक्तांनाच उपस्थित करावा लागला.

‘पीएमपी’च्या विभाजनावर काँग्रेसची ‘हिट विकेट’

$
0
0
‘पीएमपी’च्या विभाजनासाठी राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्षांची एकत्र मोट बांधून त्याविषयी ठराव देणाऱ्या काँग्रेसने सर्वसाधारण सभेत मात्र कच खाल्ली. या ठरावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हा प्रस्ताव थेट महिनाभर पुढे ढकलण्यास मान्यता देत शहरात ‘राष्ट्रवादी’च्या तालावरच ‘हात’ हलवावा लागतो, हे काँग्रेसच्या नेत्यांनी सिद्ध केले.

‘पीएमपी’चे विभाजन कराच

$
0
0
पीएमटी-पीसीएमटीच्या विलिनीकरणानंतरही कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईलाच आली असल्याचा आरोप करून कंपनी दिवाळखोरीत निघण्यापूर्वी पुन्हा त्याचे विभाजन करण्याच्या मागणीला आता कर्मचाऱ्यांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे.

उघडले राजभवनाचे दार

$
0
0
घटनात्मक पदावर नसतानाही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजभवनातील मुक्कामावरून मंगळवारी काही काळ वादाला फोडणी मिळाली. मात्र, त्यांचा हा मुक्काम सुरक्षेच्या कारणास्ताव आणि नियमानुसारच असल्याचे राज्यपाल कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘कडे’ भेदून गर्दीशी मिळविला ‘हात’

$
0
0
कडेकोट सुरक्षेचे कडे आणि पदाधिकाऱ्यांचा जथा ओलांडून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी थेट कार्यकर्त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि घोषणा देणाऱ्या समर्थकांच्या गर्दीत ते मिसळले.

तुम्हीच साकारा... पुण्याचा पर्यटन नकाशा

$
0
0
कला-क्रीडा-संस्कृती, शिक्षण-विज्ञान, उद्योग-संशोधन, समाजकारण-राजकारण, अशा विविध आघाड्यांवर क्रांतिकारी ठसा उमटविणाऱ्या पुण्याची ओळख पर्यटनाच्या नकाशावर नेमकी कशी निर्माण व्हावी, यासाठी पुणेकर म्हणून तुम्हाला काय वाटते?

स्वागतास भरवली ‘रात्रप्रशाला’

$
0
0
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मंगळवारी लोहगाव विमानतळाबाहेर ‘रात्रप्रशाला’ भरविण्यात आली. टिंगरेनगर येथील विश्वभारती माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांचा हाती झेंडे घेऊन सक्तीचा वर्ग भरविण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images