Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सेना शाखाप्रमुखाचा खून,६ अटकेत

$
0
0
अप्पर इंदिरानगर येथे शिवसेना शाखाप्रमुख देविदास खांडेकर यांचा खून करणाऱ्या सहा संशयितांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. महिलेची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून खांडेकर यांचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

$
0
0
ब्रिटनमधील ब्रिटानिया सचास हॉटेलमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाने बिबवेवाडीतील एका तरुणाची २५ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

PMPच्या धडकेने महिला ठार

$
0
0
रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या पीएमपी बसची धडक बसून सॉफ्टवेअर इंजिनीअर महिला मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास नवी सांगवीजवळ घडली.

'एकेरी पार्किंग' अखेर मागे

$
0
0
फर्ग्युसन रोडवरील उजव्या बाजूचा सरसकट एकेरी पार्किंगचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. एकेरी पार्किंगमध्ये काही बदल केला असून, त्यामुळे गोखले स्मारक ते सुदर्शन मंडळापर्यंत आता तीन ठिकाणी दुचाकी तर, दोन ठिकाणी चारचाकीचे पार्किंग करता येणार आहे.

PMP बसमधून आरोपी पळाला

$
0
0
बारामती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात पकडलेला वीस वर्षांचा आरोपी पीएमपी बसमधून पोलिसांना झटका देत पळून गेला. त्याला येरवडा जेलमध्ये सोडण्यास जात असताना रविवारी दुपारी हा प्रकार घडला.

पुणेः पाणीपुरवठा गुरुवारी बंद

$
0
0
पर्वती जलकेंद्रासह वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे, नवीन होळकर पंपिग स्टेशन येथील विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने येत्या गुरुवारी (२६ सप्टेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘रिंग रोड’ला अखेर मान्यता

$
0
0
गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या ‘रिंग रोड’ (बाह्यवळण मार्ग) प्रकल्पाला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली.

परस्पर वीजजोड करणा-यांवर गुन्हा

$
0
0
जेजुरी परिसरातील एका प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज कापल्यानंतर सरपंचानी पुन्हा वीजजोड केल्यामुळे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात जेजुरी पोलिसांनी तब्बल आठ महिन्यांनी अटकेची कारवाई केली.

आयुर्वेद औषध उद्यानाला मंजुरी

$
0
0
आयुर्वेदासारख्या प्राचीन परंपरा असणा-या औषध वनस्पतीला चालना मिळावी यासाठी आरोग्य विभागामार्फत आयुर्वेद औषध उद्यानाच्या पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या ‘आयुष’ विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.

वानवडीत दुसरे रुबी हॉस्पिटल

$
0
0
नगर रस्त्यावरील रुबी हॉल क्लिनिकमधील उपचारसेवेवर येणारा ताण पाहता पेशंटच्या सोयीसाठी वानवडी येथे १२० बेड्सचे दुसरे रुबी हॉस्पिटल उभारून हॉस्पिटलने त्याचा विस्तार केला आहे.

दोन हजार सापांना जीवदान

$
0
0
मानवी वस्तीत गेल्या वर्षभरात सापडलेल्या तब्बल दोन हजार ५३९ सापांना, तर चारशेहून अधिक पशुपक्षांना जीवदान देण्यात वाइल्ड अॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या सर्पमित्रांना यश आले आहे.

भारतीय बनावटीचे ऊसतोडणी यंत्र विकसित

$
0
0
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) पुढाकाराने भारतीय बनावटीचा हार्वेस्टर (ऊस तोडणीयंत्र) विकसित करण्यात आला आहे. तासाला दहा टन ऊस तोडण्याची त्याची क्षमता असून, गेल्या १४ वर्षांच्या संशोधनानंतर तो तयार करण्यात आला आहे.

कॉर्पोरेट्सही बजावणार मतदानाचा हक्क

$
0
0
सतत कामाच्या गराड्यात बुडून राहणाऱ्या, वीकेंड सुट्टीचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या कॉर्पोरेट नोकरदारांना आता निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.

कवडीमोल भावात साखर कारखान्यांची विक्री

$
0
0
राज्यातील चाळीस सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल भावात विक्री करून सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.

जादूटोणा विधेयकाचा पर्दाफाश

$
0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याचा वटहुकूम काढला.

नाट्य संमेलनाध्यक्षपदाच्या रंगल्या ‘तालमी’

$
0
0
पुणे जिल्ह्याला साहित्य संमेलनाचे वेध लागले असताना आता नाट्यवर्तुळातही नाट्यसंमेलनाच्या निवडणुकीची तालीम सुरू झाली आहे.

१० वी व १२वी ची फेरपरीक्षा आजपासून

$
0
0
दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. पुणे विभागातून दहावीसाठी २८ हजार ८०८, तर बारावीसाठी ३१ हजार १४९ पुनर्परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे.

‘RTI’च्या अंमलबजावणीत पुण्याचे ‘५०/५०’ यश

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या धोरणानुसार २५ टक्के प्रवेश अल्पउत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना देण्यात राज्याची राजधानी मुंबईच नापास ठरली आहे, तर जळगावने तब्बल ९९.९ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पहिले स्थान मिळविले आहे. पुण्याने मात्र ‘फिफ्टी फिफ्टी’ यश मिळविले आहे.

‘MBA’ प्रवेश : ‘सीमॅट’ उद्यापासून

$
0
0
एमबीए प्रवेशासाठी घेण्यात येणारी कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट अर्थात ‘सीमॅट’ गुरुवारपासून (२६ सप्टेंबर) सुरू होत आहे.

'ICT' इंग्रजी, मराठी आणि उर्दूतही

$
0
0
दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ अर्थात आयसीटी विषयाची प्रश्नपत्रिका इंग्रजीबरोबरच मराठी आणि उर्दूतूनही उपलब्ध होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images