Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अर्भकचोरीवर ‘वॉच’ इलेक्ट्रॉनिक नोंदीचा

$
0
0
सरकारी हॉस्पिटलमधून होणा-या नवजात अर्भकांची चोरी, बाळांची अदलाबदल रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलली असून, गर्भवती महिलेसह बाळाच्या हातापायाचे ठसे घेऊन त्याची इलेक्ट्रॉनिक्स नोंदणी केली जाणार आहे.

मखर, लायटिंग आणि ‘मोरया’!

$
0
0
गणपती घराघरांत विराजमान होण्यासाठी आता फक्त दोनच दिवस उरले. कॉलेज आणि ऑफिसच्या धावपळीत आपल्याला गणपतीसाठीची सजावट करायला पुरेसा वेळ मिळाला असेलच असं नाही. याचसाठी केवळ दोनच दिवसांतही उत्तम सजावट व्हावी, म्हणून हे काही पर्याय...

राज्यातील गिधाडांची नोंदच नाही

$
0
0
निसर्गाचे सफाई कामगार असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी वन विभागातर्फे जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असले तरी वनाधिकाऱ्यांच्या फाइलमध्ये आपल्या राज्यात किती गिधाडे आहेत, याची नोंद नाही.

शिवसेना पदाधिका-यांची आज तातडीची बैठक

$
0
0
पुण्याच्या संपर्क प्रमुखपदी नेमणूक झाल्यावर गजानन कीर्तीकर यांनी शनिवारी (सात सप्टेंबर) शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली आहे.

‘अन्न सुरक्षे’चा लाभ ग्रामीण भागात अधिक

$
0
0
अन्न सुरक्षा योजनेचा लाभ शहरी रेशन कार्डाधारकांपेक्षा ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांना अधिक मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात ७६ टक्के, तर शहरातील ४५ टक्के लाभार्थी यासाठी निवडले जाणार आहेत.

चौरंगापासून मखरापर्यंत इको फ्रेंडली गणेश

$
0
0
कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीपासून चौरंगापर्यंत आणि मखरापासून तोरणांपर्यंत असे वैविध्यपूर्ण साहित्य शिवाजीनगरच्या हातकागद संस्थेने उपलब्ध करून दिले आहे.

‘मिक्ता’ची उद्या सांगता

$
0
0
‘म्हैसकर मिक्ता’ पुरस्कार यंदा मकाऊ येथे रंगणार आहे. या पुरस्काराचे पूर्वरंग मांडणारा ‘मिक्ता महोत्सव २०१३’ पुण्यामध्ये साजरा होतो आहे.

बहिःस्थ विद्यार्थी प्रश्नी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी करणारे निवेदन पुणे विद्यापीठाच्या काही सिनेट सदस्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

कामगारांवर अन्याय केल्यास कारवाई

$
0
0
‘राज्य सरकारतर्फे घरेलू कामगारांसाठी वेतन ठरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रिक्षा चालक, ऊस तोड कामगार, शेतावरील मजूर, वर्तमानपत्र वाटप करणारे यांच्यासाठीदेखील मंडळ स्थापन करण्यात येणार आहेत.

पालकही म्हणतात ८ वीपर्यंतही परीक्षा हव्याच

$
0
0
मुलांच्या मूल्यमापनासाठी पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा हव्यातच, असा पालकांचा सूर आहे.

पहिल्या दिवसापासूनच वाहतुकीत बदल

$
0
0
गणेशोत्सवातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

‘कर चुकवून फिरणारी माझी गाडीही ताब्यात घ्या’

$
0
0
‘अगदी अजित पवारांच्या नावावरील इम्पोर्टेड गाडी टॅक्स न भरता रस्त्यावर फिरत असेल, तर तीही ताब्यात घ्या,’ असे स्पष्ट आदेश शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिवहन अधिका-यांना दिले.

‘PMP चे तिकीट किलोमीटरनुसार घ्या’

$
0
0
‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ने (पीएमपी) तिकीट दरांचे सुसूत्रीकरण केले असले, तरी टप्पा आकारणीमुळे प्रवाशांना कमी अंतरासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

उपमहापौरपदासाठी गायकवाड

$
0
0
पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून बंडू उर्फ सुनील गायकवाड, तर भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीकडून माधुरी सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

जादा जमीनविक्री रद्द

$
0
0
सातबारा उता-यावरील जमिनीच्या क्षेत्रापेक्षा अधिक जमीन विकण्याचे प्रकार वारजे, बाणेर, बालेवाडी अशा गावांत आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जादा क्षेत्र विक्रीच्या नोंदी रद्द करण्यात येणार आहेत.

‘CNG’ विक्रेत्यांना दुप्पट कमिशन

$
0
0
शहरातील सीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सीएनजी विक्रेत्यांना दुप्पट कमिशन देण्यात येणार आहे.

कांदा अजून चढाच!

$
0
0
घाऊक बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली असली, तरी नवा कांदा अद्याप बाजारात न आल्यामुळे सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना चढ्या दरानेच कांदा खरेदी करावी लागणार आहे.

बालभारती रस्त्यावर प्रश्नचिन्ह

$
0
0
बालभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्याचा पर्यावरणावर होऊ शकणाऱ्या परिणामांबद्दल संबंधित अहवालात तथ्यांची मोडतोड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गॅस अनुदान १ नोव्हेंबरपासून

$
0
0
घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान दोन ऑक्टोबरऐवजी आता १ नोव्हेंबरपासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आधारकार्ड नसलेल्या ग्राहकांनाही नोव्हेंबरपासून पुढील तीन महिने सिलिंडरचे अनुदान दिले जाणार आहे.

अधिवासाचे होणार मॉनिटरिंग

$
0
0
गिधांडाना वाचविण्यासाठी वन विभागाने राज्यातील ‘सुरक्षित अधिवासा’ची ठिकाणे निश्चित केली आहेत. या परिसरातील गिधाडांना ‘डॉयक्लोफिनॅक’ या औषधाचे सेवन न केलेले मृत प्राणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images