Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुन्हा एकवेळ पाणी?

0
0
‘कारभा-यां’च्या आदेशानुसार पुणेकरांना हक्काचे पाणी देण्याचा निर्णय झाला असला तरी, महापालिका मात्र अजूनही एकवेळ पाणी देण्याचाच विचार करीत आहे.

दाभोलकरांच्या हत्येचे गूढ गहिरे

0
0
सुरेश अलुरकर, दर्शना टोंगारे, हरी ढमढेरे, आशा लगड यांच्या खुनाच्या तपासापाठोपाठ आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाचे पुणे पोलिसांपुढील आव्हान दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. दाभोलकरांच्या हत्येला दोन आठवडे पूर्ण होत असतानाच तपासाची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही.

गतिमंद महिलेवर बलात्कार

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या गतिमंद महिलेस बलात्कार झाल्याचा घृणास्पद प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय आणि सिक्युरिटी गार्ड यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सासासंच्या स्वागताध्यक्षपदी विजय कोलते

0
0
सासवड येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांची निवड करण्यात आली आहे.

वीस प्रभागांमध्ये शून्य कचरा प्रकल्प

0
0
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याद्वारे शून्य कचरा प्रकल्पाची व्याप्ती आणखी २० प्रभागांत वाढविण्यात येणार असल्याचे सूतोवाच पुणे महापालिकेने केले आहे.

मेघडंबरीचे काम अपूर्णच

0
0
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती होऊन एक महिना उलटल्यानंतरही अण्णा भाऊंच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम पुर्ण झालेले नाही. या कामाकडे दुर्लक्ष करून महापालिका अण्णा भाऊंच्या कार्याचा उपमान करत आहे.

'परिवर्तन' अखेर सत्तेवर

0
0
सुमारे दोन वर्षांपूर्वी नवीन सभासदांच्या बळावर सत्ता संपादन केलेल्या भोर एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ निवडणुकीतील व्हिजन पॅनेलचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ

0
0
बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक झाल्याचा आरोप करून सभासदांनी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या ८२ व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत प्रचंड गदारोळ केला.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे तण उपटून काढा

0
0
'महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यूपीए सरकारच्या विरोधात असंतोष आणि आगडोंब उडाला आहे. सरकारने देशाचे वाटोळे केले असून, यापुढेही काँग्रेसच्या हातात देश दिला तर देशात अराजकता माजेल.

शब्दरत्नांचा वेध घेणा-या संस्थेची पंचविशी

0
0
सांस्कृतिक क्षेत्रात दर्जेदार कार्यक्रम सादर करणा-या शब्दवेध या संस्थेने नुकतीच पंचविशी साजरी केली. त्या निमित्त संस्थेच्या वाटचालीचा हा आढावा...

धरणे भरली; टँकरचा ‘फेरा’ कायम

0
0
पुणे विभागातील धरणे शंभर टक्के भरली असली तरी काही दुष्काळी तालुक्यांमध्ये टँकरचा ‘फेरा’ कायम असून या तालुक्यांत ८०७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पोस्टातर्फे 'लखपती योजना' जाहीर

0
0
पोस्टातर्फे ‘लखपती योजना’ जाहीर करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत दर महिन्याला एक हजार ३५० रुपयांची गुंतवणूक केल्यास पाच वर्षांत लखपती बनणे शक्य होणार आहे.

‘अमृता’च्या बँकेला हव्यात देणगीदार!

0
0
प्रतिकारशक्ती आणि सर्वांगीण वाढीसाठी आवश्क असलेले आईचे दूध हे बालकासाठी अमृतच.. पण अनेकदा वैद्यकीय कारणांमुळे काही बाळांना आत्तापर्यंत दुधापासून वंचित राहावे लागत होते.

एफटीआयआय प्रवेशप्रक्रिया रखडली

0
0
चित्रपट आणि टीव्हीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेची (एफटीआयआय) प्रवेशप्रक्रिया रखडली आहे.

खाडाखोड टाळण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी?

0
0
परीक्षा नियंत्रक बदलल्यानंतर त्यांच्या सहीची स्टेशनरी वाया जाण्याचा धोका टाळण्यासाठी परीक्षा नियंत्रकांची डिजिटल स्वाक्षरी वापरण्याचा प्रस्ताव पुणे विद्यापीठाकडे विचाराधीन आहे.

पुणे विद्यापीठात Optic Fibre नेटवर्क

0
0
'पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क'साठी राज्य सरकारच्या आयटी विभागाचा द्वितीय पुरस्कार पटकावणाऱ्या पुणे विद्यापीठाने नेटवर्किंगच्या क्षेत्रातील पुढच्या टप्प्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठामध्ये येत्या सहा महिन्यांमध्ये ऑप्टिक फायबर नेटवर्क तयार करण्यात येणार आहे.

पुणे कॅन्टोन्मेंटच्या जागेत घुसणा-यांवर ‘वचक’

0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीतील अनेक बिल्डरांनी घुसखोरी करत लष्कराच्या जागा काबीज केल्याचे उघडकीस आल्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने हद्द निश्चित करणारे खांब उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सातच्या आत होणार कचरा ‘साफ’

0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कचरा गोळा करण्यासाठी दोन कॉम्पॅक्टर मशिन घेण्यात येणार असल्याने बोर्डाच्या परिसरातील कचरा सकाळी सात वाजण्यापूर्वीच साफ करण्याची किमया साधली जाणार आहे.

नगरसेवक नवे; कित्ता जुन्यांचाच

0
0
जकातीचे उत्पन्न बंद झाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, ठेवी मोडून विकासकामे करण्याचा चंग बांधला आहे.

‘झेडपी’तही भाकरी फिरवा

0
0
पुणे महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेतही अध्यक्षपदाची भाकरी फिरविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केली असून विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांना बदलण्यात यावे, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येणार असल्याचे समजते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images