Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

असदुल्लाहने मारली होती कासारवाडी, नगरमध्ये दडी

$
0
0
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटांपूर्वी ‘इंडियन मुजाहिदीन’चे दहशतवादी असदुल्लाह अख्तर ऊर्फ हड्डी आणि वकास ऊर्फ अहमद यांनी स्फोट घडवून आणण्यासाठी कासारवाडी येथील फ्लॅटवर आसरा घेतला होता.

नर्सिंग होमच्या जाचक अटीविरोधात उद्या बैठक

$
0
0
नर्सिंग होमच्या परवान्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने विविध परवानग्या बंधनकारक केल्या असून शहरातील हॉस्पिटलचालकांनी येत्या शनिवारी (३१ ऑगस्ट) बैठक आयोजित केली आहे.

‘इम्पोर्टेड’ कारचालकांकडून सव्वातीन कोटींचा ‘इम्पोर्ट’

$
0
0
परिवहन अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून तिचा टॅक्स न भरताच इम्पोर्टेड कारमधून मिरविणाऱ्यांविरोधात परिवहन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. गेल्या दोन महिन्यात अशा २० कारमालकांवर कारवाई झाली असून, त्यांच्याकडून सव्वातीन कोटी रुपयांचा टॅक्स वसूल केला आहे.

जल्लोषात दहीहंडी साजरी

$
0
0
कौशल्याने रचले जाणारे मानवी मनोरे.. नागरिकांनी उत्सुकता आणि गोविंदा रे गोपाळाच्या आरोळ्या... ढोलताशांचा ताल, ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम, लुंगी डान्स, ढिंका चिका अशा गाण्यांच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई.. उत्साहाने होणारा पाण्याचा मारा... अशा जल्लोषी वातावरणात शहरात गोपाळकाला साजरा करण्यात आला.

लेझिम खेळणार का? ‘हेरिटेज वॉक’मध्ये मिळणार संधी

$
0
0
महाराष्ट्राची ओळख असलेला आणि हळूहळू हरवत चाललेला लेझिम हा खेळ अनुभवण्याची आणि तो एकदा तरी खेळून पाहाण्याची संधी या रविवारी (दि. १) मिळणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘गार्डियन हॉलिडेज’ आणि ‘एच.व्ही. देसाई महाविद्यालय’ आयोजित हेरिटेज वॉकमध्ये या खेळाची माहिती देण्यात येणार आहे.

जर्मन बेकरीतील फुटेजमध्ये यासीनचे पहिल्यांदा ‘दर्शन’

$
0
0
कर्नाटकातील भटकळ परिसरातील जंगलात बॉम्ब बनविणे, तसेच गोळीबार करण्याचे प्रशिक्षण घेतलेला यासीन भटकळने गुजरात, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली येथे स्फोट घडवून तपास यंत्रणांपुढे आव्हान उभे केले होते.

‘यशवंत’ची जागा ‘म्हाडा’ला देणार राज्य सरकारचा निर्णय

$
0
0
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११० एकर जागा ‘म्हाडा’ला देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतला. दरम्यान, हा कारखानाही त्याच जागेवर पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

यासीन, जुंदालला पुण्यात आणणार

$
0
0
जर्मन बेकरीत बॉम्ब ठेवणारा यासीन भटकळ, तसेच जंगली महाराज रोडवर बॉम्ब तयार करून प्लॅन्ट तयार करणारा असदुल्लाह अख्तर यांच्या अटकेने या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार आहे.

‘एकेरी पार्किंग’वर हरकतींचा भडिमार

$
0
0
फर्ग्युसन रोडवर ‘एकेरी पार्किंग’ करण्याचा निर्णय आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. रहिवासी, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने हरकती आणि सूचना नोंदविल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येही गणेशोत्सवाची धामधूम

$
0
0
स्त्री-भ्रूण हत्या, महिलांवरील अत्याचार, बालकांचे प्रश्न, वाहतुकीची समस्या, अवयवदान आदी सामाजिक विषयांसह पौराणिक देखावे यंदा पुणेकरांचे लक्ष वेधून घेणार आहेत.

नोंदणी नसल्यास ‘प्लॅन’ नामंजूर

$
0
0
तुम्ही पुण्यात बांधकाम व्यवसाय करत आहात अन् पालिकेकडे नोंदणी केली नसेल तर.... येत्या एक सप्टेंबरपासून बांधकाम परवानगीसाठी दाखल केलेले ‘प्लॅन्स’ स्वीकारलेच जाणार नाहीत.

बंगलो, फार्म हाउस प्लॉटचे अनेक पर्याय घ्या जाणून

$
0
0
आयुष्यात एकदा तरी बंगल्यात राहाव, असे स्वप्न प्रत्येकान नक्की पाहिलं असेल. मात्र, शहरातील जागांचे भाव पाहात बंगला बांधण्याचे ते पूर्ण होईल का, असा प्रश्नच अनेकांना आहे. शहरात नाही, तर शहरापासून थोडं लांब असलेल्या ठिकाणी बंगला प्लॉट स्कीम सुरू आहेत.

...तर १५ सप्टेंबरपासून इंधनविक्री बंद

$
0
0
तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप डीलरच्या अकाउंटमधून परस्पर रक्कम कापून घेण्यास केलेली सुरुवात, इंधनाची वाहतूक करणाऱ्या डीलरना दिलेले आश्वासन न पाळल्याने, मुंबईत सीएनजी विक्रीवर देण्यात येणाऱ्या कमिशनच्या तुलनेत अत्यल्प कमिशन देण्यात येत असल्याच्या निषेधार्थ ‘पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन’ने १५ सप्टेंबरपासून तीन दिवस इंधन विक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे.

रुपया घसरल्याने परदेशातील विद्यार्थी चिंतेत

$
0
0
परदेशात शिक्षण घेऊन भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपयातील अनपेक्षित घसरणीने मोठा धक्का बसला आहे. रुपयातील घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जगणे कठीण झाले आहे.

विद्यापीठात बहिःस्थ प्रवेश कायम

$
0
0
पुणे विद्यापीठातील बहिःस्थ विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी अनुकूलता दाखवली. उद्या, शनिवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष बैठकीत त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.

‘मसाप’चे माजी कार्याध्यक्ष म. वि. गोखले यांचे निधन

$
0
0
‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे (मसाप) माजी कार्याध्यक्ष डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी आहे.

त्यामुळेच अण्णा लोंढेला शस्त्र परवाना

$
0
0
घरभाड्याचे पैसे मागितले म्हणून दत्तोबा जामदार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गोळीबार करणा-या अण्णा लोंढेला २०११ मध्ये शस्त्र परवाना नाकारण्यात आला होता.

बहिःस्थ कायम ठेवण्यासाठी आंदोलन

$
0
0
बहिःस्थ विद्यार्थ्यांचा विद्यापीठामधील प्रवेशाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी विविध संघटनांनी गुरुवारी विद्यापीठामध्ये आंदोलन केले. या आंदोलनांसोबतच विद्यापीठ विकास मंचातर्फे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना बहिःस्थांचे प्रवेश लवकरात लवकर सुरू करण्याविषयीचे निवेदनही देण्यात आले.

सनातन कार्यकर्त्याची वन डे चौकशी

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेला सनातन प्रभातचा कार्यकर्ता संदीप शिंदे याला अवघ्या एकाच दिवसाच्या चौकशीनंतर सोडून देण्यात आले.

कात्रज उद्यानात धावणार फुलराणी

$
0
0
लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली पेशवे उद्यानाती‌ल ‘फुलराणी’ आता कात्रज येथे धावणार आहे. कात्रज परिसरातील ‘आजी आजोबा उद्याना’तील पाचशे मीटरच्या ट्रॅकवर ‘फुलराणी’ धावणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images