Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘चंद्रभागे’च्या स्वच्छतेची माहिती द्या

$
0
0
पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेच्या वेळी स्वच्छतेबाबत कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतात.

‘सनातन’चा कार्यकर्ता ताब्यात

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सनातन प्रभात’ संस्थेच्या कार्यकर्त्याला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बुधवारी गोव्यातून ताब्यात घेतले आहे. आठवडाभरानंतरही या प्रकरणी ठोस धागेदोरे हाती न आल्याने राज्य सरकार व पोलिसांवर टीका केली जात असताना अखेर या प्रकरणी प्रथमच कुणा संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

कर चुकवा, अन् ‘समृद्ध’ व्हा!

$
0
0
पुण्यातील एका व्यावसायिकाने टॅक्स चुकवून परदेशी कार पुण्यातून फिरविली. एक दिवस हा व्यवसायिक ‘आरटीओ’च्या जाळ्यात अडकलाच.

गोळीबार मैदान चौकात ३ स्कायवॉक उभारणार

$
0
0
पुणे-सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान चौकाच्या परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तीन स्कायवॉक बांधण्याचा निर्णय ‘पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डा’ने घेतला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची ‘बोलाचीच कढी...’

$
0
0
‘पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डा’च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी वर्षभराचा बोर्डाचा आर्थिक कारभार केंद्र सरकारच्या भरवशाने चालणार आहे. केंद्राने स्थानिक संस्था कर (एलबीटी) लावण्यास परवानगी दिली आणि ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजने’अंतर्गत (जेएनएनयूआरएम) निधी मिळाला, तरच बोर्डाच्या महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहेत.

‘एफटीआयआयमधील नक्षलवादी शोधा’

$
0
0
‘कबीर कला मंचा’च्या नक्षलवादी भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी आणि संचालकांवर कारवाई करण्याची मागणी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने बुधवारी केली.

५ हजार ढोलताशांचा शिवमणींसह एकत्रित गजर

$
0
0
तब्बल पाच हजार ढोलताशा वादकांचा एकत्रित गजर... तालसम्राट शिवमणी यांच्याशी जुगलबंदी... तालवाद्यांच्या एकत्रित वादनाचा विश्वविक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न... पुणेकरांना ३१ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता एसपी कॉलेजच्या मैदानावर तालाच्या जादूचा अपूर्वानुभव घेण्याची विनामूल्य संधी मिळणार आहे.

गणेशमूर्तींना नको रासायनिक रंगकाम

$
0
0
गणेशमूर्तींसाठी विषारी रासायनिक रंगांचा वापर करण्यावर राज्य शासनाने बंदी आणावी, अशी मागणी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे करण्यात आली आहे.

जागांच्या अदलाबदलीची चर्चा बैठकीत शक्य

$
0
0
गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने हार पत्करावी लागलेल्या लोकसभेच्या काही जागांची अदलाबदल करण्याबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वर्तुळात चाचपणी सुरू आहे.

शहरात डेंगीच्या डासांची ३० हजार उत्पत्तीस्थाने

$
0
0
महापालिकेची हॉस्पिटल्स, कार्यालये, नवीन बांधकामांची ठिकाणे, नदी, नाले, ओढे, नाट्यगृहे, पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहती, जलतरण तलाव, उद्याने आणि प्राणी संग्रहालये आदी तीस हजार ठिकाणी डेंगीच्या डासांच्या उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘नटसम्राट’ चालती ‘गिनेस बुका’ची वाट

$
0
0
‘जगावं की मरावं’, ‘कुणी घर देता का घर’ असे सरस संवाद असलेल्या आणि एका नटसम्राटाची उतारवयातील अवस्था दाखविणारे ‘नटसम्राट’ हे नाटक खऱ्या अर्थाने वैश्विक स्तरावर पोहोचले आहे.

छत झुकल्याच्या घटनेची रेल्वेकडून चौकशीही नाही

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशनवरील वर्दळीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील अॅल्युमिनिअमचे छत झुकण्याची घटना रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली आहे, असे दिसत नाही. या प्रकरणाची कोणतीही चौकशी अद्याप न झाल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

गणेशमूर्तींच्या ५० स्टॉलना महापालिकेची नोटीस

$
0
0
गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी रस्त्यावर स्टॉल उभारणाऱ्या शहरातील ५० स्टॉलचालकांना पालिकेने बुधवारी नोटीस बजाविली असून चोवीस तासात हे स्टॉल न हलविल्यास त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

अग्निशमन यंत्रणा त्वरित बसवा

$
0
0
‘महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसेल, तर त्वरित बसविण्यात यावी,’ अशा शब्दांत पालिका आयुक्तांनी सुनावले आहे. त्यामुळे पालिकेचा झोपी गेलेला आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

विचारांची लढाई विचारांनीच लढू

$
0
0
‘हत्येने माणूस संपतो, विचार नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच मानवतावाद, शोधक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आम्ही विचारांची लढाई विचारांच्याच मार्गाने लढू,’ अशी प्रतिज्ञा घेत परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या विचारांची मशाल यापुढेही तेवत ठेवण्याचा निर्धार केला.

बहिःस्थाचे यंदाचे वर्ष वाया जाणार?

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये ‘बहिःस्थ’ म्हणून प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्ष वायाच जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

व्यावसायिकांकडून ६५ कोटींचा दंड वसूल

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सुमारे साडेचार हजार व्यावसायिकांकडून पालिकेने ६५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. एक एप्रिलपासून शहरात एलबीटी लागू झाला; परंतु सुरुवातीच्या काळात व्यापाऱ्यांनी त्याविरोधात बंदचे हत्यार उपसले होते.

दंड करण्याचा अधिकारच नाही

$
0
0
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ‘विशेष आकाराच्या’ नावाखाली दंड करण्याचा कोणताही अधिकार पालिकेला नाही. पुणेकरांवर लावल्या जाणाऱ्या दंडाचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी पुणे बचाव समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली जाणार आहे.

धनकवडीत गोळीबार; ३ जण जखमी

$
0
0
सहकारनगर भागात गृहमंत्र्यांच्या नावाने दहशत निर्माण करणाऱ्या अण्णा लोंढे याने धनकवडीमधील जमादार कुटुंबातील तिघांवर बुधवारी रात्री गोळ्या झाडल्या.

धान्य पुरवठ्याचेही संगणकीकरण

$
0
0
अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत रेशनवर वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचे ‘गोदाम ते दुकानदार’ असे संगणकीकरण करण्यात येणार आहे. या संगणकीकरणामुळे धान्याचा काळाबाजार होण्यासारख्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images