Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एस. टी. स्टँडना अतिक्रमणांचा विळखा

0
0
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शहरातील तिन्ही स्टॅण्डभोवती हातगाडी, स्टॉल आणि फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. तसेच, बेकायदा वाहतूक करणारी वाहनेही दारातच उभी राहात असल्याने प्रवासी आणि बसचालकांना अतिक्रमणाच्या गर्दीतून वाट काढावी लागते.

ढिसाळ कारभारामुळे अपंगांचे हाल

0
0
पीएमपीएमएल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अपंग व्यक्तींना दिले जाणारे पाचशेहून अधिक पास गेल्या तीन चार महिन्यांपासून प्रशासनाकडे धुळखात पडून आहेत.

खड्डेविरहित मांडवांची मंडळांकडून चौकशी

0
0
गणेशोत्सवासाठी बाजारपेठ, कार्यकर्त्यांमध्ये लगबग सुरू झाली असताना महागाई आणि आर्थिक मंदीचा फटका मांडववाल्यांना बसतो आहे. गणेश मंडळांचे आर्थिक बजेट कोलमडले असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मांडववाल्यांकडे अद्याप बुकिंग झालेले नाही.

काँग्रेसमध्ये गट

0
0
‘इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम’च्या (आयटीएस) ठरावाला काँग्रेसने पाठिंबा दिला असताना, त्याचे फेरटेंडर काढावे आणि दंडाची रक्कम कमी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सुरळीत वाहतुकीसाठीच ‘आयटीएस’

0
0
बेफाम वेगाने वाहने चालवून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला होणारा धोका टाळण्यासाठी, तसेच बेशिस्त वाहनचालकांना ताळ्यावर आणण्यासाठीच प्रशासनाने ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्टेशन सिस्टीम’ (आयटीएस) सुरू केली आहे.

आवक सुरू झाल्याने कांदा दर नियंत्रणात

0
0
पावसाने घेतलेल्या उघडीपीमुळे दक्षिणेकडील बाजारपेठेत कांद्याची आवक सुरू झाल्यामुळे पुण्यात कांद्याचे दर नियंत्रणात येऊ लागले आहेत.

विक्रीसाठी आलेला २० किलो गांजा जप्त

0
0
बुलढाणा येथून पुण्यात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ६५ हजार ५५० रुपयांचा वीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

गरज भासल्यास ‘टाइप प्लॅन’ वर फेरविचार

0
0
‘टाइप प्लॅनच्या योजनेतील तरतुदींची गरज भासल्यास फेरविचार करण्यात येईल,’ असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले. या योजनेतील उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची मागणी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

वाचकांचे प्रेम म्हणजे झिम्माच

0
0
‘‘झिम्मा’ प्रकाशित झाल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत प्रतिसादरूपी पत्रांनी वाचकांशी वेगळाच स्नेह जुळला आहे. हा स्नेह नाटकाच्या प्रेक्षकांपेक्षा वेगळा असला, तरी वाचकांच्या पत्रांनी नाटकाच्या झिम्मासारखीच झिंग येते.

‘नटसम्राट’चा विश्वविक्रमी प्रयत्न

0
0
पोटच्या मुलांनीच दुर्लक्ष केल्याने उद्ध्वस्त झालेल्या अप्पासाहेब बेलवलकरांची ‘कुणी घर देता का घर’ अशी असहाय्य विनवणी... टाळ्यांच्या कडकडाटासह समस्त प्रेक्षकांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू... वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाच्या विश्वविक्रमी सलग आठ प्रयोगांना मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिरात धीरगंभीर वातावरणात सुरुवात झाली.

कॅन्टोन्मेंट वॉर्ड राखीव करण्यास विरोध

0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा वॉर्ड क्रमांक चार हा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी राखीव करण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

वाहतूक कोंडी, अतिक्रमण, खड्ड्यांचे राज्य

0
0
दिवाळखोरीत निघालेले पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड गेल्या साडेपाच वर्षांत नागरी समस्या सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. निधीअभावी वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंगची समस्या सोडविणे बोर्डाला शक्य झाले नसल्याने नागरिक समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत.

राज्यात थोरली पाती होण्याची भाजपनीती

0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची उणीव आणि मनसेचे आव्हान, यामुळे शिवसेना बचावात्मक पवित्र्यात गेल्याचा निष्कर्ष काढून आक्रमक भूमिका घेण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाकडून आखण्यात येत आहे.

अनधिकृत बांधकामांना अभय

0
0
पुण्यासह ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील ३१ जानेवारी २०१३ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात यावीत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस स्वाधीन क्षत्रिय समितीने राज्य सरकारला नुकतीच केली आहे.

‘बहिःस्थ विद्यार्थ्यांचे प्रवेश त्वरित सुरू करा’

0
0
पुणे विद्यापीठाच्या बहिःस्थ विद्यार्थ्यांविषयीच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी बहिःस्थ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी बहिःस्थ विद्यार्थी प्रवेश कृती समितीने मंगळवारी केली.

एसपी, फर्ग्युसन, मॉडर्न, गरवारे अंतिम फेरीत

0
0
कॉलेजियन तरुणाईच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला.

‘जिलब्या’, ‘बाबू गेनू’ला रांगेचा कायदा

0
0
‘गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री केवळ भाऊ रंगारी, मंडई आणि दगडूशेठ या मानाच्या मंडळांनाच लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी पोलिस जागा करून देतील,’ असे स्पष्ट करून जिलब्या मारुती आणि बाबू गेनू मंडळाने इतर मंडळांप्रमाणे रांगेतूनच यावे, असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

स्पोर्ट्‍‍स गॅलरीसाठी आणखी ४.७५ कोटी

0
0
खराडीमध्ये शाळेच्या पटांगणातच उभी राहणारी स्पोर्ट्‍‍स गॅलरी आणि कॉम्प्लेक्ससाठी कोट्यवधी रुपये खर्चण्यात आले आहेत. तरी प्रत्यक्षात काम संथ गतीनेच सुरू आहे.

‘सीसीटीव्ही’साठी पालिका ‘खड्ड्यात’

0
0
राज्य सरकारकडून मिळणाऱ्या प्रलंबित निधीसाठी पालिकेला वारंवार पाठपुरावा करावा लागत असताना, सरकारतर्फे शहरात बसविण्यात येणाऱ्या ‘सीसीटीव्ही’ यंत्रणेसाठी खोदाई शुल्क संपूर्ण माफ करण्याचे ‘औदार्य’ पालिकेने दाखविले आहे.

‘सुरक्षे’च्या अन्नासाठी पुण्यातील गोदामे सज्ज

0
0
राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या अंमबजावणीची तयारी राज्यात सुरू झाली आहे. या योजनेतील अन्नधान्यांच्या वितरणासाठी गोदामे सज्ज केली जात आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images