Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दाक्षिणात्य ढंगाच्या मूर्तींना मागणी

0
0
गणेशोत्सव पंधरवड्यावर येऊन ठेपल्याने गणपती मंडळाच्या मूर्तिकारांकडील फेऱ्या वाढू लागल्या आहेत. मंडळांमध्ये मोठ्या गणेशमूर्ती बसविण्याचा ट्रेंड कायम असल्याने मूर्तिकारांची सध्या मंडळांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

कोकणवासीयांनी १८ व्या शतकातच जगायचे का?

0
0
पर्यावरण आणि विकासाचा समन्वय साधणे, ही गुंतागुतींची समस्या झाली असून याचे उदाहरण कोकणात आढळले आहे. काही महिन्यांपूर्वीच कोर्टाने खाणकामांवर निर्बंध आणल्यानंतर आता माधव गाडगीळ समितीच्या अहवालानेही कोकणाचा सगळाच विकास थांबवला आहे.

प्रत्येक खटला ६ महिन्यांत निकाली

0
0
‘प्रलंबित खटल्यांतील तोटे टाळण्यासाठी हरित लवादाकडे येणाऱ्या प्रत्येक खटल्याचा निकाल सहा महिन्यांच्या द्यायचा, अशी भूमिका सुरुवातीपासूनच आम्ही घेतली आहे.

मुंबई घटनेच्या निषेधार्थ भाजयुमोची निदर्शने

0
0
मुंबईतील सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रविवारी निदर्शने करण्यात आली.

समाजात विज्ञानेश्वर निर्माण होण्याची गरज

0
0
एकविसावे शतक हे ज्ञानाचे आणि विज्ञानाचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर आता विज्ञानेश्वर निर्माण होण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

‘कयानी’च्या मालकांना फसवणारा अटकेत

0
0
‘स्पेशल २६’ या चित्रपटाच्या धर्तीवर सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव रचून कॅम्पमधील प्रसिद्ध ‘कयानी’ बेकरीच्या मालकांना गंडा घालणाऱ्या पाच पैकी एका तोतया सीबीआय अधिकाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रातील कांद्याला युरोपातून मागणी

0
0
महाराष्ट्रातील कांद्याची चव विदेशात प्रसिद्ध होऊ लागली असून युरोपीय बाजारपेठेतून या कांद्याची मागणी वाढू लागली आहे. जगातील बऱ्याच भागात महाराष्ट्रातून जुलैअखेरपर्यंत पाच लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे.

अस्थिर सरकार लोकशाहीला मारक

0
0
‘लोकसभेच्या आगामी निवडणुकीनंतर केंद्रात अस्थिर सरकार आले, तर ती बहुभाषक समाजरचना आणि लोकशाहीसाठी चिंताजनक गोष्ट ठरेल. याचा विचार करून देशातील नागरिक निवडणुकीत अधिक मजबूत सरकारलाच मते देतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केला.

डॉ. कल्याणी यांना भावपूर्ण निरोप

0
0
कल्याणी उद्योगसमूहाचे संस्थापक, ज्येष्ठ उद्योगपती डॉ. निळकंठराव कल्याणी यांना रविवारी शोकाकूल वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुंढव्यातील केशवनगर येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्भकांची करणार ‘बायोमेट्रिक’ नोंद

0
0
हॉस्पिटलांमधून नवजात अर्भकांचे अपहरण आणि अदलाबदल होणे आता नित्याचेच झाले आहे. हे प्रकार टळावेत, या साठी अर्भकाच्या जन्मानंतर दोन तासांच्या आतच पायाच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन त्यांची बायोमेट्रिक नोंद करण्याचा उपक्रम ‘पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डा’त राबविण्यात येणार आहे.

उज्ज्वल निकम बाजू मांडणार

0
0
मुंबई येथील महिला फोटोग्राफरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या खटल्याचा निकाल तातडीने लावला जावा यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्टा’त हा खटला चालविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

मेडिकल सीईटी ‘नीट’च्या धर्तीवर

0
0
मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुढील वर्षी होणारी एमएच-सीईटी यंदा घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’च्या (नीट) धर्तीवरच घेण्यात येणार असल्याने परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ असण्याची शक्यता आहे.

दाभोलकर हत्येचे धागेदोरे सापडले?

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी सकाळी नमूद केले; मात्र गुन्हेगारांबाबत पोलिस अजून पोहोचू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्व नेत्रदानाचे

0
0
दर वर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. अंध व्यक्तींना दृष्टीचे वरदान मिळावे यासाठी मरणोत्तर नेत्रदान करण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.

वादग्रस्त जागेचे निम्हणच मालक

0
0
काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले त्यांना बदनाम करण्यासाठी राजकीय आकसाने करण्या‌त आले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना रविवारी ‘क्लीन चिट’ दिली. वादग्रस्त जागेची मालकी निम्हण यांचीच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

0
0
पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी सहाशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
0
अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला कोर्टाने सात वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी हा निकाल दिला.

आठवलेंना आठवले ‘१९९८ - कलमाडी’!

0
0
‘खासदार सुरेश कलमाडी हे ‘महायुती’साठी चांगले उमेदवार असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना, भाजपाशी चर्चा करून त्यांना निमंत्रण देण्याचा विचार सुरू आहे,’ असे धमाकेदार विधान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतेच येथे केले.

भाज्यांची विक्रमी आवक

0
0
पावसाने घेतलेल्या उघडिपीने बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्रमी आवक झाली. एकीकडे फळभाज्या स्वस्त झाल्या असताना, दुसरीकडे पालेभाज्या महाग झाल्या आहेत.

रेशनसाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी

0
0
रेशनवर वितरीत करण्यात येणा-या सवलतीच्या दरातील (लेव्ही) साखरेची खरेदी आता खुल्या बाजारातून करण्यात येणार असून त्यासाठी सहकारी व खासगी साखर कारखान्यांशी करार करण्याची तयारी करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images