Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कॉल सेंटरनंतर बिल भरणाही ‘ऑफ’

$
0
0
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी विविध ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र उघडण्याचा धडाका लावला असताना भारत संचार निगम लिमिटेडची अवस्था (बीएसएनएल) उलट झाली आहे.

‘JEE-अॅडव्हान्स्ड’चे स्वरूप बदलणार?

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी होणाऱ्या ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ या परीक्षेच्या स्वरूपात पुढच्या वर्षी काही बदल होण्याची शक्यता आहे. आयआयटी प्रवेशाची प्रक्रिया ठरविणाऱ्या जॉइंट अॅडमिशन बोर्डाची (जेएबी) येत्या रविवारी बैठक होत असून, त्यामध्ये याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नक्षलवाद-हिंदुत्वावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

$
0
0
नक्षलवाद आणि हिंदुत्वाविषयीचा वादंग टोकाला जाऊन कबीर कला मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली.

खासगी अॅम्ब्युलन्सचे दर निश्चित

$
0
0
पेशंटची ने-आण करणा-या खासगी अॅब्युलन्सच्या प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले असून, नव्या दरानुसार आता पेशंटना प्रति किलोमीटर ९ ते २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

www.भारत लवकरच...

$
0
0
ई-मेल अॅड्रेस आणि वेबसाइट अॅड्रेस (यूआरएल) मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमधून वापरता येणे लवकरच शक्य होणार आहे. त्यामुळे केवळ इंग्रजी भाषेमुळे इंटरनेटपासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या भाषेत ई-मेलमधील मजकुराबरोबरच ई-मेल आयडी देखील स्वतःच्या भाषेतून वापरता येणार आहे.

कम्प्युटर खरेदीची चौकशी होणार

$
0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने टेंडर प्रक्रिया न राबविता बाजारभावापेक्षा चढ्या दराने एक कोटी रुपयांचे कम्प्युटर खरेदी केल्याच्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी महसूल खात्यातील उपायुक्त प्रकाश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंडळांच्या खड्ड्यांचा वाली कोण?

$
0
0
पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी पुणेकर हैराण झाले असतानाच, आता मंडळांच्या मांडवामुळे चौकाचौकात पडणाऱ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दाभोलकरांचा पाठलाग दादरपासूनच?

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-याने मुंबईपासूनच त्यांचा पाठलाग केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. डॉ. दाभोलकर सोमवारी रात्री दादर येथून शिवनेरी बसने पुण्याला परतताना मारेकरी त्याच बसमधून प्रवास करीत असल्याचे बसमधील साक्षीदाराने म्हटले आहे.

‘आरआयएमसी’ प्रवेशासाठी डिसेंबर महिन्यात परीक्षा

$
0
0
डेहराडूनच्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील (आरआयएमसी) प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात एक आणि दोन डिसेंबर, २०१३ ला प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या परीक्षा अर्जांची विक्री सुरू झाली आहे.

गणेशोत्सव मंडळांवर सासवडमध्ये बंदी

$
0
0
गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण, दगडफेक आणि मारामारी करून सार्वजनिक उत्सवास गालबोट लावणाऱ्या छत्रपती शिवाजी व नेताजी सुभाष गणेश मंडळावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

प्रशासकीय इमारतीचे बांधकाम दर्जाहीन

$
0
0
पुरंदर पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरु असून पायाभरणीत मुरूम, खडी वापरण्याऐवजी माती वापरण्यात येत असल्याची तक्रारकरण्यात येत आहे. राष्ट्रीय विकास महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल बनकर, सभापती सुजाता दगडे, उपसभापती माणिक झेंडे-पाटील यांनी यांनी पालकमंत्री अजित पवार यांचेकडे लेखी तक्रार करून कामाची पाहणी केली.

१०५ हॉस्पिटलना पालिकेच्या नोटिसा

$
0
0
अग्निशमन दलासह बांधकाम खात्याच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट कायम केल्याने तांत्रिकतेत अडकलेल्या १०५ हॉस्पिटवर पालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यापैकी ७० हॉस्पिटलचे नर्सिंग होम नसल्याने त्यांच्यावर कोर्टात खटले दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

खाद्यपदार्थांच्या वेष्टनांवर परवाना क्रमांक बंधनकारक

$
0
0
कोणत्याही खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर उत्पादकांनी घेतलेल्या चौदा अंकी परवान्याच्या क्रमांकाचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बोगस उत्पादकांचा पर्दाफाश करणे शक्य होणार आहे.

इतिहास समीक्षा परिषदेचे आयोजन

$
0
0
'भारत इतिहास संशोधक मंडळा'तर्फे येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) ‘केंद्रीय इतिहास अभ्यासक्रम समीक्षा परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे सचिव प्रा. डॉ. श्री. मा. भावे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आदींनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘हॉस्पिटल असोसिएशन’साठी हालचालींना वेग

$
0
0
चार विमा कंपन्या एकत्रित येऊन त्यांच्याकडून विम्याच्या नावाखाली होणारी हॉस्पिटलची फसवणूक, हॉस्पिटलला परवाना अथवा नोंदणी नसल्याने होणारी कारवाई, तसेच हॉस्पिटलवर सातत्याने होणारे हल्ले आदी कारणांमुळे उद्विग्न झालेल्या हॉस्पिटलचालकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक पोलिसांना मिळाला घरचा आहेर

$
0
0
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करणाऱ्या वाहतूक पोलिसांना दंडाची पावती फाडावी लागली आहे. सुमारे ४०० बेशिस्त पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई झाली असून, त्यांना शंभर ते पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या वर्तनाबद्दल पुणेकरांनी केलेल्या तक्रारींची दखलही घेतली आहे.

कोट्यवधी रुपयांची बसस्टॉपसाठी उधळपट्टी

$
0
0
अतिजलद मार्ग अशी ख्याती असलेल्या बीआरटी मार्ग बसस्टॉप उभारण्यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. बीआरटी मार्गातून प्रवास करताना नागरिकांना पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ बसस्टॉप थांबावे लागणार नाही, असा दावा एका बाजूला प्रशासनाच्या वतीने केला जात असताना एका बसस्टॉपसाठी ३२ ते ३५ लाख रुपये प्रशासनाने खर्च केले आहे.

पुणे- मुंबईच्या प्रवासासाठी टॅक्सी बुकिंग कॉल सेंटर

$
0
0
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना चोवीस तास टॅक्सी बुकिंगची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून मुंबई- पुणे-मुंबई टॅक्सी ओनर्स असोसिएशनने टॅक्सी बुकिंग कॉल सेंटर सुरू केले आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे, असोसिएशनचे अध्यक्ष जगदीशसिंह माटा यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले.

वासुदेवानंद सरस्वतींचा जन्मोत्सव सोहळा

$
0
0
वेद वासुदेव प्रतिष्ठानतर्फे गुरुवारपासून (२२ ऑगस्ट) वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा जन्मोत्सव सुरू झाला.राजेवाडी (ता. पुरंदर) आणि पुण्यात यानिमित्त विविध उपक्रम होणार आहेत.

शहरात ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

$
0
0
वीजबिले थकविणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून गेल्या दीड महिन्यांत पुणे परिमंडळात ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मोहिमेत आतापर्यंत दीड लाख थकबाकीदारांनी ५१ कोटी रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images