Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संसर्गजन्य रोगांचे हॉस्पिटल कागदावरच

0
0
स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या आजारांच्या पेशंटवर तत्काळ उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुण्यात संसर्गजन्य रोगांचे हॉस्पिटल उभारण्याची घोषणा अद्यापही कागदावरच आहे.

'त्या' ठिकाणाहून डासांच्या सर्वाधिक तक्रारी

0
0
विश्रामबाग वाडा, नगर रस्त्यावरील ढोले पाटील रस्ता, भवानी पेठ, घोले रस्ता आदी भागांतच सर्वाधिक डेंगीच्या डासांची पैदास होण्याची ठिकाणे असल्याची माहिती समोर आली आहे.

‘रुपी’चे विलिनीकरण ‘सारस्वत’ मध्ये

0
0
आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाने रिझर्व्ह बँकेला सादर केला असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली.

रिक्षा भाडेवाढ तूर्त लांबणीवर

0
0
रिक्षाच्या प्रवास दरातील वाढीची मागणी तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली असून ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतरच त्यावर निर्णय घेण्याची भूमिका जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आली.

पोषण आहारावरील बहिष्कार मागे

0
0
पोषण आहाराबाबत मुख्याध्यापक संघाच्या अडचणी समजावून घेऊन त्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी एक समिती स्थापन करून सरकारकडे शिफारशी केल्या जातील, असे आश्वासन शिक्षण संचालकांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आल्याने शालेय पोषण आहारावर राज्यातील मुख्याध्यापक संघटनांनी घातलेला बहिष्कार बुधवारी मागे घेण्यात आला.

१३ औषध विक्रेत्यांना ‘स्टॉप सेल’चे आदेश

0
0
फार्मसिस्टची नियुक्ती न करणाऱ्या तेरा औषध दुकानांवर कारवाई करताना अन्न औषध प्रशासनाने (एफडीए) त्यांना विक्री बंद करण्याचे (स्टॉप सेल) आदेश दिले आहेत.

टाउन प्लॅनिंगचे पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र

0
0
मुंबई आणि नागपूरपाठोपाठ टाउन प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये स्थापन होणार आहे.

ई- गव्हर्नन्ससाठी पुणे विद्यापीठाला रौप्यपदक

0
0
पुणे विद्यापीठाच्या ‘पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क’ या प्रकल्पाला राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाच्या ‘ई-गव्हर्नन्स स्पर्धे’मध्ये रौप्यपदक जाहीर झाले आहे.

‘एक्स्प्रेस वे’वर एसटी व ट्रकमध्ये अपघात

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर राज्य परिवहन महामंडळाची बस (एसटी) आणि ट्रक यांच्यामध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या अपघातात बस मधील २१ प्रवासी जखमी झाले आहे.

मुलीवर बलात्कार : पित्याला सक्तमजुरी

0
0
स्वतःच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पित्याला आठ वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख न्यायाधीश अनंत बदर यांनी हा निकाल दिला.

रेल्वे कोर्टात सापडला बोगस जामीनदार

0
0
चोरीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर फरारी झालेल्या आरोपीचा जामीनदार दुसऱ्या आरोपीला पुन्हा जामीनदार म्हणून राहण्यासाठी आल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या जाळयात सापडला आहे.

‘खंडपीठ’ मागणीला सकारात्मक प्रतिसाद

0
0
पुण्याला मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे, या मागणीसाठी पुण्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.

क्रीडा संकुलाऐवजी पुन्हा फटाका स्टॉल

0
0
गोळीबार मैदानावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय झाला असला, तरीही पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड या मैदानाच्या वापराबाबत नागरिकांशी ‘खेळ’ करत आहे. हे मैदान रहिवाशी आणि खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याऐवजी बोर्डाने त्यावर दिवाळीपर्यंत फटाका स्टॉल उभारण्याचे ठरविले आहे.

इमारतींमधील पार्किंग वाढणार

0
0
शहरातील इमारतींमधील दोन मजल्यांपर्यंतचे पार्किंग आता इमारतीच्या उंचीच्या बंधनांमधून मुक्त होणार आहे. त्यामुळे इमारतींमध्ये पार्किंगसाठी अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

निषेध सभेतही रंगले आरोप-प्रत्यारोपांचे द्वंद्व

0
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने बुधवारी गोंधळ झाला. या गोंधळात महापौर वैशाली बनकर यांनाही बोलू देण्यात आले नाही.

पुरोगाम्यांची शक्ती एकवटण्याची गरज

0
0
‘कोणीही नथुराम कधीही जिनांवर हत्यार चालवित नाहीत; तर ते महात्मा गांधी यांचीच हत्या करतात. त्यामुळे सर्वच सनातनी प्रवृत्ती एकमेकांना सामील असतात, हे ओळखून त्यांच्याविरोधात पुरोगाम्यांची शक्ती एकवटली पाहिजे.

उभे राहतील अनेक दाभोलकर...

0
0
एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात अंगार...एका बाजूला आधारस्तंभ गमावल्याचे दुःख तर दुसरीकडे त्यांचे कार्य अखंडपणे चालू ठेवण्याचा निर्धार. गोळी झाडून एक दाभोलकर संपले असले, तरीही आमच्यातून अनेक दाभोलकर उभे राहतील, असा निर्धार अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत व्यक्त झाला आणि या सभेचे निर्धार सभेत रूपांतर झाले.

मुंबई पोलिसांचा पुण्यात तपास

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचे दोन अधिकारी आणि तीन कर्मचारी पुण्यात दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांसह ठाणे, नवी मुंबई आणि सातारा पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली असून, आपआपल्या हद्दीतील संशयितांकडे चौकशी सुरू केली आहे.

बंदला संमिश्र प्रतिसाद

0
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा पुण्यातील विविध संस्था-संघटना आणि राजकीय पक्षांनी बुधवारी बंद पाळून निषेध केला.

‘स्वाइन फ्लू’.... डोन्ट वरी!

0
0
जून आणि जुलै महिन्यात जोरदार झालेल्या पावसामुळेच जुलैसह ऑगस्ट महिन्यात ‘स्वाइन फ्लू’ने दगावणाऱ्यांची संख्या वाढली असली तरीही सध्याची परिस्थिती धोक्याची घंटा वाजविण्यासारखी निश्चित नाही, असे राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images