Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चिंचवडला आज तालपरिक्रमा

$
0
0
पंडित आनिंदो चटर्जी म्युझिक फाउंडेशनतर्फे चटर्जी यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी पिंपरी-चिंचवडमधील ५८ तबला वादकांचा सन्मान आणि संतुरची जुगलबंदी हा तालपरिक्रमा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.

मुलाला पुण्यात शिकवायचं स्वप्न राहिले अधुरेच

$
0
0
'आम्ही नवरा-बायको राबराब राबून चार पैसे आणायचो, मग चूल पेटायची, हातावरचे पोट असले तरी सोन्यासारख्या मुलाला पुण्यात शिकवायचे होते. आता सचिन सोडून गेल्याने त्याला शिकवण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले नाही...' मराठवाड्यातील जिंतूर तालुक्यातून मावशीकडे आलेल्या सचिन तारूच्या आईने हुंदके देत आपल्या भावनांना वाट मोकळी दिली.

वाहतूक नियंत्रण यंत्रणेला बेशिस्तीचा 'बायपास'

$
0
0
पुणे शहराबाहेरून जात असल्याने कात्रज-देहूरोड मार्गाला देण्यात आलेले 'बायपास' हे नाव आता इतिहासजमा झाले आहे. महामार्गालगत अनियंत्रितपणे वाढलेल्या वस्तीमुळे येथील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून, सर्व्हिस रोडच्या वापराबाबतही नियमांचे पालन केले जात नाही.

तस्करीसाठी आणलेली बिबट्याची कातडी जप्त

$
0
0
राज्यात वाघांच्या कातडीसाठी सुरू असणा-या वाघांच्या शिकारींचे संदर्भ ताजे असतानाच मंगळवारी (२९ मे) पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तस्करीसाठी आणलेली बिबट्याची कातडी जप्त केली.

रिंग रोडचे एक पाऊल पुढे

$
0
0
शहराभोवतीच्या नियोजित रिंग रोडच्या प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे. या रिंग रोड प्रकल्पाच्या आखणीसाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) ग्लोबल टेंडर मागविण्यात आली आहेत.

प्रशासन बदलता येत नसल्याने भ्रष्टाचारात वाढ

$
0
0
देशातील प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचारानेच जास्त ग्राासलेली आहे. राजकारण निवडणुकीच्या माध्यमातून बदलता येते; परंतु प्रशासन व्यवस्था बदलता येत नाही. ते बदलण्याची सोय नसल्याने भ्रष्टाचार वाढत आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनी केली.

कर्वेनगरमधील वनराखीव भूखंडावर अतिक्रमण

$
0
0
राखीव वनासाठी कर्वेनगरमध्ये आरक्षित असलेल्या सुमारे वीस एकर जागेवर झोपड्या आणि पक्क्या घरांचे अतिक्रमण झाले असून, या भागातील एका स्थानिक नेत्याच्या आशीर्वादामुळे झोपड्या वसवण्याचे काम बिनदिक्कत सुरू आहे.

उन्हाळा यंदा 'कूल'च

$
0
0
उन्हाचा चटका, घामाच्या धारा आणि अंगाची लाही लाही करणा-या उकाड्याने हैराण होणा-या पुणेकरांना यंदा तुलनेने तीव्र उकाड्यापासून दिलासा मिळाला. उन्हाळी हंगामात तब्बल १६ वर्षांनी एकाही महिन्यात पा-याने चाळीस अंशांचा टप्पा ओलांडला नाही.

वितरण अधिका-यांच्या राजीनाम्याची मागणी

$
0
0
रेशनकार्डवर दिल्या जाणा-या सडक्या धान्याच्या विरोधात आरोग्य सेनेच्या वतीने अन्नधान्य वितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. 'निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नधान्याचा पुरवठा करण्यास कारणीभूत असल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

पुण्यातील सहा विद्यार्थी एनडीएच्या गुणवत्ता यादीत

$
0
0
आयआयटीच्या गुणवत्ता यादीत आलेला असूनही, एनडीएमधील निवडीला प्राधान्य देणा-या तेजस आघमसह पुण्याचे सहा विद्यार्थी एनडीएच्या गुणवत्ता यादीत झळकले आहे. तेजसला ३०१ वी रँक मिळाली असून, त्याने 'एअर फोर्स' सेवेचा पर्याय दिला होता.

वाहतूक शाखेचा जनता दरबार

$
0
0
शहरातील वाहतूक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच नागरिकांच्याही सुचना जाणून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून जनता दरबारांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारचे चार जनता दरबार आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.

एनडीच्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १२२ व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा मंगळवारी पार पडला. या वेळी एकूण ३४४ छात्रांना जवारलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) पदवी प्रदान करण्यात आली.

बंदुकीतून गोळी झाडून मजुराचा खून

$
0
0
बंदुकीतून गोळी झाडून मजुराचा खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. त्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नाही.

'व्हाइट कॉलर' लोकांमुळे सातशे कोटींचा भूर्दंड

$
0
0
सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा हात कुणी धरू शकत नाही, मात्र सध्या या क्षेत्रात काही दोष निर्माण झाले आहेत. गेल्या काही वर्षात 'व्हाइट कॉलर' लोकांमुळे राज्य सरकारला तब्बल सातशे कोटींचा भुर्दंड सोसावा लागल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी केली.

हडपसरला वाहतूक कोंडीत उड्डाणपुलामुळे भरच

$
0
0
हडपसरमधील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. येथील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी या भागात अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

हवे नदी आणि पाण्याचे नियोजन

$
0
0
राज्यात पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर त्यामुळे होणारे वाद वाढतील. त्यामुळे नदी आणि पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे सांस्कृतिक आणि पर्यावरणमंत्री संजय देवताळे यांनी व्यक्त केले.

बनावट आदेशाद्वारे फसवणूक; तिघांना अटक

$
0
0
वडगाव बुद्रुक येथील जमिनीचे बनावट कमाल जमीन धारणा (यूएलसी) आदेश तयार करून फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

कथा-कादंब-यांचा मराठीत सुळसुळाट

$
0
0
सध्या मराठी भाषेत कविता आणि कथा-कादंब-यांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

साताऱ्यात चार घरफोड्या

$
0
0
शहरातील चार वेगवेगळ्या घरफोड्यांदरम्यान सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विसावा नाका येथील देवदत्त अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रा. विक्रम मदन माने हे गावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातील ७० हजार लांबवले.

कामात अडथळा आणणा-यास अटक

$
0
0
विनापरवाना जाहिराती व होर्डिंग्ज लावलेले फलक काढताना धक्का देऊन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या शंकर हनुमंत ढावरे (वय ३४, रा. हडपसर) यांना पोलिसांनी अटक केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images