Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टेक्निशियनच्या मृत्यूबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी

$
0
0
धनकवडी येथे उच्चदाब वाहिनीवर विजेचा शॉक बसून महावितरणच्या ज्युनिअर टेक्निशियनचा मृत्यू झाला. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी विविध संस्था-संघटनांकडून करण्यात आली आहे.

निम्हण पिता-पुत्रांना मारहाणप्रकरणी समन्स

$
0
0
बाणेर येथील सर्व्हे नं. ३९ या मिळकतीवर जाऊन विंग कमांडर अरूण देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार विनायक निम्हण आणि त्यांचे पुत्र नगरसेवक सनी निम्हण यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी समन्स बजाविले आहे.

कारखाली सापडून ३ वर्षांचा चिमुरडा ठार

$
0
0
बालेवाडी गावात घराबाहेर खेळत असलेला तीन वर्षांचा चिमुरडा मंगळवारी सायंकाळी कारखाली चिरडून ठार झाला. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

गणेश पेठेत गुन्हेगाराचा खून

$
0
0
गणेश पेठेतील बुरुडीपुलाजवळ बांबूच्या गोडाउनच्या दरात मंगळवारी मध्यरात्री एका गुन्हेगारावर वार करून त्याचा खून करण्यात आला.

एकेरीनंतर आता ‘पे अँड पार्क’ची सक्ती

$
0
0
फर्ग्युसन कॉलेज रोडवर टू-व्हीलरना रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्किंग उपलब्ध करून देण्याचा पर्याय वाहतूक शाखेकडून पुढे करण्यात येण्याची शक्यता आहे.

मानाच्या गणेश मंडळांसमोर २ च पथकांचा ‘आवाज’

$
0
0
विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपती मंडळांसमोर दोन, तर इतर सर्व मंडळांसमोर फक्त एकच पथक ठेवण्याचे बंधन पुणे पोलिसांनी घातले असून, याबाबतच्या नोटिसा पोलिसांनी मंडळांना बजाविल्या आहेत.

भटक्या कुत्र्यांना पकडण्यात पालिका अपयशी

$
0
0
शहरात भटक्या कुत्रांचा त्रास वाढत असून, भटक्या कुत्रांचा बंदोबस्त‌ करणे पालिका प्रशासनाला शक्य होत नसल्याचे समोर आले आहे. महिन्याला सरासरी पाचशे भटकी कुत्री पालिकेच्या वतीने पकडली जात असली तरी बाराशेहून अधिक नागरिकांना महिन्याला कुत्री चावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुण्याच्या विद्यार्थ्यांचा अवकाशी झेंडा

$
0
0
चाकोरीबद्ध शिक्षणातून स्वातंत्र्य मिळवित पुण्याच्या ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या (सीओईपी) विद्यार्थ्यांची कर्तृत्वभरारी थेट अवकाशात झेपावणार आहे!

चरस विक्री : तरुणाला पोलिस कोठडी

$
0
0
विमाननगर येथील सिम्बायोसिस कॉलेज परिसरात चरसची छुपी विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

१ कोटींचे सापांचे विष जप्त

$
0
0
सापांच्या विषाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा आरोपींना फरासखाना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे एक कोटी रुपयांच्या विषाची बाटली जप्त करण्यात आली आहे.

फेरअतिक्रमण केल्यास गुन्हा

$
0
0
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी काढलेले अतिक्रमण पुन्हा केले गेल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कांद्याच्या किमती अजूनही चढ्याच

$
0
0
कांद्याची आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारपेठेत चढलेले कांद्याचे दर कायम आहेत. किरकोळ बाजारपेठेत कांद्याची विक्री ६० रुपये किलो दराने सुरु आहे.

मागासवर्गीय आयोगावरील अधिका-यांचे निलंबन करा

$
0
0
राज्य मागासवर्गीय आयोगावर काम करणारे सदस्य मराठा आरक्षणाबाबत नकारात्मक भूमिका घेत आहेत. या सदस्यांच्या कारभाराची पद्धत पक्षपाती आहे, त्यामुळे राज्य सरकारने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

सुधारित मसुद्यानंतरच चर्चा

$
0
0
‘अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्याला वारकरी संप्रदायाचा विरोध नाही. त्यातील काही तरतुदींना आमचा विरोध आहे. सरकारने या विधेयकाचा सुधारित मसुदा वारकरी संप्रदायाकडे दिलेलाच नाही.

वारकरी साहित्य परिषदेची ‘मागण्यांची’ वारी

$
0
0
कुंभमेळ्याच्या धर्तीवर या विकासकामांसाठी केंद्र शासनाकडून दोन हजार कोटी रुपये मंजूर करावेत तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सचिवाची नेमणूक करण्यात यावी,’ अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेतर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

$
0
0
मावळातील गोळीबारात मृत शेतक-यांच्या वारसांना भाजपनेच नोक-या द्याव्यात अशा प्रकारचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने मावळातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

‘भाषांतरित आणि रेखांतरित’ला उत्साहात सुरुवात

$
0
0
थोर तत्त्वज्ञ, साहित्यिक रविंद्रनाथ टागोरांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडणारा माहितीपट आणि रसज्ञ ऋषींच्या सहवासात’ या पुस्तकावरील रंगतदार अभिवाचनाने ‘भाषांतरित आणि रेखांतरित’ या तीनदिवसीय महोत्सवाला प्रारंभ झाला.

वजने उचलणे बंद, आता योगासने

$
0
0
‘योगासने आणि होमिओपथी या दोन्ही गोष्टींबाबत मी खूप ऐकले आहे. पण, त्याचा अनुभव घेतलेला नाही. ‘देर से आये दुरूस्त आये,’ अशी माझी अवस्था झाली आहे.

वागण्या-बोलण्याचेही सुमारीकरण

$
0
0
‘मराठी माणसाच्या बौद्धिक आळस आणि ढिसाळपणामुळे मराठी भाषेशी नाळ तुटत चालली आहे. भाषेची परंपरा, अभिजातेशी संबंधच तुटल्याने मराठी भाषा कमालीची आटते आहे.

‘आधार’ला आता महा-ई-सेवा केंद्रांचा आधार

$
0
0
राजकीय पक्षांची कार्यालये वा खासगी जागांमध्ये आधारकार्ड देण्यास विरोध झाल्यानंतर ‘आधार यंत्रणे’ची अवस्था निराधार झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images