Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोझॅम्बिकमध्ये जयंतरावांची पाटिलकी

$
0
0
ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची मालकी असलेला राजारामबापू सहकारी साखर कारखाना मोझॅम्बिकमध्ये २७ हजार हेक्टर जमीन लीजवर घेणार आहे. या जमिनीवर मका, सोयाबीन आणि तांदळाची शेती करण्याचा कारखान्याचा विचार आहे.

'आर्थिक आरक्षणाची भूमिका फसवी'

$
0
0
मराठा, ब्राह्मण आणि मुस्लिमांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भूमिकेला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. 'शरद पवार यांची ही भूमिका फसवी आहे,' असा आरोप ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केला.

पुण्यात काँग्रेसचे कांदा विक्री केंद्र

$
0
0
काँग्रेस पक्षातर्फे आज, मंगळवारी पुणे शहरात स्वस्त कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात झाले. पुण्याच्या लालबहादूर शास्त्री चौकात काँग्रेस नगरसेवक मिलिंद काची यांच्या पुढाकाराने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

एक लाखांवरील ठेवींबाबत अस्पष्टता

$
0
0
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने रुपी को-ऑपरेटिव्ह बँक विलीनीकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली असली, तरी एक लाख रुपयांच्या पुढील ठेवीदारांचे काय होणार या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राठोडच्या जमिनीच्या लिलावाला स्टे

$
0
0
बेकायदा उत्खननापोटी ६७ लाख रुपयांचा दंड न भरल्याने किसन राठोड याच्या शिंदेवाडीमधील जमिनीच्या पुकारलेल्या लिलावाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

‘शांतता, कोर्ट बंद आहे...’

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील वकिलांनी मंगळवारी कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. वकिलांनी उत्सफूर्तपणे काम बंद ठेवल्यामुळे बहुतेक कोर्टांतील कामकाज दिवसभर होऊच शकले नाही.

कोर्टाचे आवार होते रिलॅक्स मूडमध्ये

$
0
0
पक्षकारांच्या गर्दीने नेहमीच गजबजलेले शिवाजीनगर कोर्टाचे आवार मंगळवारी रिलॅक्स मूडमध्ये होते. फायली आणि पुस्तके घेऊन कोर्टात धावपळ करणारे वकील हे चित्र मंगळवारी दिसत नव्हते.

‘पीएमपी’च्या तोट्यात चौपट वाढ

$
0
0
सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेकविध उपाय आणि उपक्रम राबवूनही वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) तोटा चौपटीने वाढला आहे.

अतिरिक्त एफएसआय रेडी रेकनरनुसार द्या

$
0
0
म्हाडाच्या वसाहतींना अडीच एफएसआय लागू करण्यासाठी वेगवेगळ्या शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन नियमावली तयार करावी आणि त्यातील एफएसआयचे वाटप रेडी रेकनरशी जोडून घ्यावे, अशी शिफारस पुणे म्हाडाच्यावतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे.

नेताजीनगरची जमीन म्हाडाचीच

$
0
0
वानवडीतील नेताजीनगर येथील जमीन म्हाडाच्याच मालकीची असून त्याचा पुनर्विकास करण्याचे अधिकार म्हाडाला आहेत, असा निकाल मुंबई हायकोर्टाने नुकताच दिला आहे.

मराठा आरक्षण सर्व संमतीने

$
0
0
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राज्य सरकार सर्वांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेईल, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी या विषयावर सावध पवित्रा घेतला.

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव चढेच

$
0
0
घाऊक बाजारात कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली असली तरी किरकोळ बाजारात कांद्याचे दर चढेच राहिलेले आहेत.

गाईच्या दूधाच्या खरेदी दरात वाढ

$
0
0
शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या गाईच्या दूध खरेदीमध्ये येत्या १६ ऑगस्टपासून ५० पैशांची वाढ करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.

सीएनजीचे मार्चपर्यंत आणखी १२ पंप

$
0
0
शहरातील ‘सीएनजी’च्या पुरवठ्याचा प्रश्न आता काही प्रमाणात सुटणार असून, मार्चअखेपर्यंत १२ नवे पंप सुरू होणार आहेत. तसेच, सध्या कार्यन्वित असलेल्या पंपांवर पहाटे पाच ते रात्री बारा या वेळेत ‘सीएनजी’ उपलब्ध होणार आहे.

सांगा... टू-व्हीलर कुठे लावायची?

$
0
0
फर्ग्युसन रोडवरील उजवी बाजू ‘नो पार्किंग’ करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात वाहनचालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आता आम्ही वाहन कुठे लावायचे.

‘बजाज ऑटो’तील आंदोलन मागे

$
0
0
कामगारांच्या मागण्या मान्य झालेल्या नसतानाही चाकण येथील बजाज ऑटोच्या प्रकल्पात गेल्या ५० दिवसांपासून सुरू असणारे काम बंद आंदोलन ‘विश्व कल्याण कामगार संघटने’ने मंगळवारी मागे घेतले.

लष्करी हद्दीत बिल्डरांची घुसखोरी

$
0
0
पुण्याजवळील लष्कराची हद्द निश्चित करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रथमच सॅटेलाइट इमेजद्वारे नकाशे तयार केले असून, त्यावरून पुणे महापालिकेच्या हद्दीतील अनेक बिल्डरांनी घुसखोरी करत लष्कराच्या जागा काबीज केल्याचे उघडकीस आले आहे.

बीएसएनएलची सेवा ‘डिस्कनेक्ट’

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) हेल्पलाइन कंत्राटदारामुळे बंद पडल्या असताना त्या पुन्हा सुरू होण्यास आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दगडूशेठ, छबाड हाउसची सुरक्षाव्यवस्था पुन्हा नापास

$
0
0
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवड्यात घेतलेल्या चाचणीमध्ये दगडूशेठ मंदिर, छबाड हाउसच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे पुन्हा निष्पन्न झाले आहे.

उत्तरपत्रिकेतील पाने गहाळ झाल्याने नापासाची नामुष्की

$
0
0
बोर्डाच्या कस्टडीतील बारावीच्या एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेतील शेवटची दोन पानेच गहाळ झाल्याची बाब आता समोर आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images