Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विनापरवाना हॉस्पिटलच्या ७ डॉक्टरांवर खटले

$
0
0
विनापरवाना हॉस्पिटल चालविल्याप्रकरणी शहरातील चार हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ही हॉस्पिटल चालवणा-या सात डॉक्टरांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने खटले दाखल केले आहेत.

‘सीकेपी’ बँकेवर प्रशासक नियुक्त

$
0
0
आर्थिक गैरशिस्तीमुळे अडचणीत आलेल्या ‘ठाणे सीकेपी बँके’चे संचालक मंडळ बरखास्त करून सहकार खात्याच्या वतीने गुरुवारी बँकेवर प्रशासक नेमण्यात आला.

उरमोडीचे पाणी कण्हेरीच्या गाळात

$
0
0
उरमोडी धरणातून कण्हेर कालव्यात सोडण्यात आलेले पाणी २४ तासांत येरळवाडीत पोहचण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल ठरला असून या कालव्यात गाळ साचल्याने दोन दिवसांपासून अधिजल भुयारातून सोडण्यात आलेले पाणी थांबविण्यात आले आहे.

ऑक्सिजनच्या सुविधेअभावी अॅम्ब्युलन्स निरुपयोगी

$
0
0
‘अपघातानंतर सव्वाएक वाजता अॅम्ब्युलन्स पोहोचल्या. माझा मेहुणा शुभम आणि संजना, सपना गायकवाड या मेव्हण्यांना त्यातून नेण्यात आले. पण त्यात ऑक्सिजनची सुविधाच नसल्याने त्यांचे प्राण वाचले नाहीत.

बेकायदा होर्डिंगः पालिकेला आली जाग

$
0
0
शहराच्या विविध भागांमध्ये बेकायदा होर्डिंग काढण्याची कारवाई महापालिकेने हाती घेतली आहे. पण इतकी महाकाय होर्डिंग इतक्या दिवसांत महापालिका यंत्रणेच्या लक्षात कशी आली नाहीत, असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.

निवृत्त एसटी कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडापासून वंचित

$
0
0
एसटीच्या सेवेतून निवृत्त होणा-या कर्मचा-यांना दरवर्षी अखेरच्या दिवशी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळते. मात्र, यंदा एसटीच्या तिजोरीत निधीची कमतरता असल्याने निवृत्तीच्या दिवशी अनेक कर्मचा-यांना प्रॉव्हिडंट फंडाचे चेक मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

ज्येष्ठ नागरिक शिकणार गोष्टी-गाणी लिहायला

$
0
0
आयुष्याच्या संध्याकाळी केवळ आरोग्य, म्हातारपण आणि कौटुंबिक समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा शिकण्याची उर्मी मनात बागळून वेगळे काम करण्याच्या उद्देशाने प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दागिने हिसकावणा-याला पाठलाग करून पकडले

$
0
0
मॉर्निंक वॉकला चाललेल्या महिलेल्या गळ्यातील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावणा-या चोरट्याला त्याच महिलेच्या पतीने रिक्षाचालकाच्या मदतीने पाठलाग करत पकडले. सूर्या हॉस्पिटलच्या परिसरात बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास हा हा प्रकार घडला.

वाहतूक पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

$
0
0
सिग्नलपाशी घोळक्याने थांबत वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी पावत्या फाडणारे पोलिस, नियम मोडणारे बेदरकार वाहनचालक, यासारख्या अनेक प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी गुरुवारी वाहतूक पोलिसांवर जनता दरबारामध्ये केली.

सांगलीकर डासांनी हैराण

$
0
0
दुष्काळाबरोबरच सांगली जिल्ह्याला सध्या मच्छरांनी ग्रासले आहे. उदंड जाहले डास...अशी जणू स्थिती झाली असून विशेष म्हणजे सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसह १६८ गावे या डासांच्या तावडीत सापडली आहेत. जिल्हा हिवताप निर्मूलन विभागाच्या पाहणीतच ही धक्कादायक माहिती पुढे आली.

'राष्ट्रवादी'च्या शहराध्यक्षपदी बहल

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी योगेश बहल यांची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यांची निवड म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या राजकारणात समतोल साधण्याचा केलेला प्रयत्न आहे, असे मानले जात आहे.

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच 'सोल'

$
0
0
विद्यापीठांमध्ये सिनेटऐवजी 'सोल' ही स्वतंत्र व्यवस्था आणणे आणि फी समितीची निमिर्ती करणे, या निगवेकर समितीच्या शिफारशींवर होत असलेल्या चचेर्बाबत या समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी खुलासा केला आहे.

तंबाखूवर बंदी आणण्याची मागणी

$
0
0
देशात दरवर्षी ७० ते ८० हजार नागरिकांना तोंडाचा कॅन्सर होतो, तर दरवर्षी जगातील ८० लाख रूग्णांचा मृत्यु कॅन्सरमुळे होतो. कॅन्सरला कारणीभूत ठरणा-या गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवर महाराष्ट्र सरकारने बंदी आणावी, अशी आग्रही मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.

पुण्याने थकविला प्रवासी कर

$
0
0
पुण्यासह राज्यातील सहा बड्या शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवासी आणि बालसंगोपन करापोटी एक नवा पैसाही भरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवस्थांकडे सुमारे १७० कोटी रुपयांचा कर थकीत असून, त्यात सर्वाधिक १३० कोटी रुपयांचा कर पुण्यातील 'पीएमपीएल'ने थकविला आहे.

डिफेन्सच्या डिमांडमुळे पालिकेची भंबेरी

$
0
0
'रस्ते विकासासाठी जागा हवी असल्यास अपेक्षित रक्कम द्या, नाहीतर रस्ते वाहतुकीसाठी बंद करू,' या डिफेन्सच्या डिमांडमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची भंबेरी उडाली. अखेरीस या भूसंपादनासाठी सुमारे साठ कोटी रुपये देण्याची तयारी पालिकेने दर्शविली आहे.

अनियंत्रित ‘एक्स्प्रेस वे’वर ‘लेन कटिंग’ भरधाव

$
0
0
भरधाव ‘एक्स्प्रेस वे’वरील वाहतुकीला नियंत्रित न केल्याने निष्पाप जिवांचे बळी जात असताना महामार्ग पोलिस, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी अशा कोणत्याही एजन्सीच्या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

बांधकामावरून पडून मजुराचा मृत्यू

$
0
0
बांधकाम सुरू असताना सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडीतील माळवाडीत नुकतीच घडली. या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देहू मंदिर परिसरात रस्ता रुंदीकरण

$
0
0
देहू-आळंदी विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून, संबंधितांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी दिली.

बंदोबस्तात तोडफोड

$
0
0
पेट्रोल दरवाढीमुळे होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा कैवार घेतल्याच्या आवेशात 'बंद'ची हाक दिलेल्या राजकीय पक्षांच्या हिंसक आंदोलनामुळे गुरुवारी पुन्हा नागरिकांनाच वेठीस धरण्यास आले. 'बंद' पाळण्यातील पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या 'पीएमपी'च्या ३१ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.

भाजप व शिवसेनेतर्फे गुरुवारी बंदचे आवाहन

$
0
0
केंद सरकारने नुकतीच केलेली पेट्रोलची दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, या मागणीसाठी गुरुवार (३१ मे) राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पुकारलेल्या भारत बंदचे आवाहन खासदार गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images