Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खासगी शाळांबाबत पालकांच्या तक्रारी

$
0
0
‘शिक्षण हक्क कायद्यानुसार काही खासगी शाळा प्रवेश देतात. मात्र, पालकांकडून फी तसेच युनिफॉर्म, शालेय साहित्य आणि सहलीसाठीही शुल्क मागण्यात येते,’ अशा तक्रारी काही पालकांनी बुधवारी झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात केल्या.

‘आरटीई’च्या मुलांना दुजाभाव

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांवर प्रवेश दिल्यानंतर एका डे-बोर्डिंग स्कूलकडून या विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. सकाळच्या वेळेत शाळा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात येते.

ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या सुधारित आदेशातही त्रुटी

$
0
0
ध्वनिप्रदूषणासंदर्भातील शासन निर्णयात राज्य सरकारने सुधारणा केल्या असल्या, तरी या सुधारित आदेशातही त्रुटी राहिल्याचे समोर आले आहे.

फक्त १० दिवसांत; पासपोर्ट हातात!

$
0
0
पासपोर्ट अर्जासाठी घ्याव्या लागणा-या अपॉइंटमेंटपासून ते ‘टिपिकल’ सरकारी प्रवासातील पासपोर्टचे अडथळे अखेर आता कमी झाले आहेत.

नागरिकाला लुटणारे तासाभरात गजाआड

$
0
0
चांदणी चौकाजवळ सोमवारी मध्यरात्री दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्याकडील १५०० रुपये आणि अॅपल कंपनीचा मोबाईल हँडसेट घेऊन पळ काढणाऱ्या कारमधील तिघा आरोपींना फरासखाना पोलिसांनी रेडलाइट परिसरातून तासाभरात अटक केली.

स्वारगेट पोलिसांकडून दोघा ठगांना अटक

$
0
0
रमजान महिन्यात आदमबाग मशिदीत उपास करणाऱ्यांना जेवण देण्यासाठी; तसेच गरीब मुलांना कपडे शिवण्यासाठी पावणेसहा हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोघा ठगांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.

बिगरनोंदणी हॉस्पिटलवर खटले

$
0
0
‘बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट’नुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी न करणाऱ्या १९ हॉस्पिटलविरोधात कोर्टात खटले दाखल करण्यात आले आहेत.

डासउत्पत्ती : आणखी दोघांवर खटले

$
0
0
डेंगीच्या डासांची उत्पत्ती करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, पाषाण आणि वडगाव शेरी येथील दोघांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

रस्तेखोदाईमुळेच खड्‍‍डे

$
0
0
रस्तेखोदाईच्या परवानगीबाबत महापालिकेचे बेबंद धोरण हेच शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेला सर्वाधिक जबाबदार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ऑलिम्पियाडकडे प्रज्ञावंतांची पाठ

$
0
0
ज्ञान विज्ञानाच्या ऑलिम्पियाडमध्ये का होईना, पण भारताला पदकांची लयलूट करून देत असल्याबद्दल कौतुकाचा विषय बनलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची संख्या आता रोडावू लागली आहे.

रस्त्यांची हमीही खड्ड्यात

$
0
0
पुणेकरांच्या खिशातून कोट्यवधी रूपयांचा निधी खर्ची पाडून तयार केलेल्या ११ रस्त्यांवर ठेकेदाराने दिलेल्या हमीपूर्वीच खड्डे पडले आहेत.

जयमाला शिलेदार यांचं निधन

$
0
0
ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचं आज पहाटे निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. ब-याच दिवसांपासून किडनीच्या विकारानं आजारी असलेल्या जयमालाबाईंवर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दहशतवादी बलसाडमध्ये घुसले

$
0
0
१२ ते १३ दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे चार बोटींतून गुजरातमधील बलसाडमध्येप्रवेश केला असल्याचा इशारा संरक्षण दलाच्या गुप्तचर यंत्रणांनी पुणेपोलिसांना दिला आहे.

संग्रह सहा हजार एलपींचा!

$
0
0
सुहास गणपुले यांच्याकडे तब्बल सहा हजार एलपींचा (लाँग प्ले रेकॉर्ड्स) संग्रह आहे. यामध्ये ४० वर्षानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह इन बॉम्बे’ या सिनेमातील गाण्यांचाही समावेश आहे.

राज्यात बालगुन्हेगारी घटली

$
0
0
राज्यातील बालगुन्हेगारी आणि बालगुन्हेगारांची घटती संख्या दिलासा देणारी ठरली आहे. गंभीर गुन्ह्यांतील प्रमाण कमी झाले असले, तरी वाहन चोरी आणि हाणामारीच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाली आहे. पुणे शहरात खुनाच्या गुन्ह्यांत राज्यात सर्वाधिक २७ बालगुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जमीनधारणा मर्यादा घटवण्यास विरोध

$
0
0
भूमिहीन कुटुंबांना भूदान करण्यासाठी कमाल जमीनधारणेची मर्यादा कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या मसुद्याच्या विरोधातील सूर राज्यातील विभागीय आयुक्तांनी काढला आहे. हा मसुदा मान्य केल्यास विमानतळ, सेझ, टाउनशिप, गिरिस्थान विकास प्रकल्प, आयटी पार्क अशा अनेक प्रकल्पांना बाधा निर्माण होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

‘कलावंत बाळासाहेब’ दुर्लक्षितच

$
0
0
‘कलेकडे पाहणारे थोर कलावंत म्हणजे बाळासाहेब. परंतु, त्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. कलाकार म्हणून बाळासाहेब प्रख्यात व्यंगचित्रकार डेव्ह‌िड लो यांच्यापेक्षाही सरस आहेत; पण त्यांना मोठेपणा देण्याऐवजी एका राजकीय पक्षाचे म्हणून आपण त्यांना बाजूला सारले. माणसांचा चुराडा करणेच तुम्हा-आम्हांला जमते’, अशा भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरुवारी व्यक्त केल्या. तसेच, त्यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘एसइझेड’च्या जागेवर डोमेस्टिक इंडस्ट्रियल एरिया

$
0
0
पुण्याजवळील खेड येथे प्रस्तावित असलेल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनचा प्रस्ताव भारत फोर्जने मागे घेतल्यानंतर या जमिनीचे काय होणार हा प्रश्न निकाली निघाला आहे. सुमारे पाच हजार एकरांच्या या जमिनीवर ‘डोमेस्टिक इंडस्ट्र‌ियल एरिया’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी दिली.

सरकारी आश्वासनांचा बार दोन वर्षांनंतरही फुसकाच

$
0
0
मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील हिंसक आंदोलनाला शुक्रवारी (आज ) दोन वर्षे होत आहेत. या आंदोलनादरम्यान, झालेल्या गोळीबारात बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना महापालिकेने व सरकारने आश्वासनांची खैरात दिली होती. आज दोन वर्षानंतरही हा आश्वासनांचा बार फुसकाच निघाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

‘आरटीओ’ची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0
तब्बल २६ लाख वाहनांची नोंद आणि रोज कोट्यवधींचा महसूल जमविणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) सुरक्षा वाऱ्यावर असून, या ऑफिसकडे एकही सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे ‘आरटीओ’ने ताब्यात घेतलेली वाहने आणि कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images