Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोनसाखळी चो-या उदंड जाहल्या

$
0
0
सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे सोनसाखळी चोरांनी राज्यभर उच्छाद मांडला आहे. राज्यात गेल्या वर्षी जबरी चोरीच्या गुन्ह्यांत ६२ टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे सोनसाखळी चोरीचे आहेत.

आरोपी योगेशला वकिलाचा पळून जाण्याचा सल्ला

$
0
0
नयना पूजारी खूनप्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतने त्याचे अॅड. बी. ए. आलूर यांनी फाशीच्या शिक्षेपासून वाचायचे असेल तर जेलमधून पळून जा, असा सल्ला दिल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावली

$
0
0
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील आरोपींनी महिलेच्या गळ्याचील सोन्याची साखळी हिसकावल्याचा प्रकार सहकारनगर येथील क्रांती बंगल्यासमोर घडला.

गुंड मारणेच्या नावावर खंडणी मागणारे दोघे अटकेत

$
0
0
गुंड गणेश मारणेच्या नावाने व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा भावांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यातील एक आरोपी व्यावसायिकाकडे नोकरीस आहे.

मार्केट यार्डातील इमारतीचे ऑडिट होणार

$
0
0
मार्केट यार्ड बाजारपेठेतील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून याठिकाणी नवीन इमारती बांधण्याची योजना असल्याचे राज्याचे कृषी-पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

स्वस्तात भाजी, तीही ताजी ताजी

$
0
0
कांदा बाजारात ४० ते ४५ रुपये किलो, शेतकरी-ग्राहक विक्री केंद्रात ३० रुपये, बटाटे बाजारात ३० रुपये, केंद्रात २० रुपये... ...मध्यस्थांच्या कमिशनला फाटा देत थेट ग्राहकांपर्यंत शेतामधील ताजी भाजी पोचविण्याच्या राज्य सरकारच्या रास्त दर विक्री केंद्राला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

सॉफ्टवेअर सांगणार सत्यनारायणाची पूजा

$
0
0
श्रावणात सत्यनारायणाची पूजा करायची आहे; पण गुरुजींची आणि यजमानांची वेळच जुळत नाही, अशी परिस्थिती बऱ्याचदा उद‍्भवते. आता मात्र तशा परिस्थितीत चिंता करण्याची गरज नाही.

आम्ही अवयवदान करणार!

$
0
0
एका ब्रेन डेड पेशंटचे अवयव मृत्युशय्येवरील एका व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात; मात्र त्यासाठी हवी इच्छाशक्ती अवयवदान करण्याची.

पथनाट्यातूनही संदेश

$
0
0
‘अरे मानवा, विचार कर, अवयवदान कर’ अशा कवितेतून आणि ‘माणूस ब्रेन डेड झाल्यावर त्याचे अवयव गरजू माणसाचा जीव वाचवू शकतात,’ असा संदेश देणाऱ्या पथनाट्याच्या माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्त्व समजाविण्यात आले.

‘बाजारात औषधांचा तुटवडा नाही’

$
0
0
केंद्र सरकारने ३४८ औषधे नियंत्रणाखाली (डीपीसी) आणली असली, तरी कमी किमतीची ५० टक्के औषधे पुन्हा लेबल लावून (रीलेबलिंग) बाजारात येत आहेत.

मुंबईतील ‘एफडीए’कडून तपासणी

$
0
0
फार्मासिस्टची अनुपस्थिती, ‘ड्रग प्राइस कंट्रोल’च्या (डीपीसी) नव्या किमतींमुळे औषधांची होणारी अनुपलब्धता या कारणास्तव पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) डावलून मुंबईतील अधिकाऱ्यांनी थेट पुण्यात येऊन औषध विक्रेत्यांची तपासणी केली.

बोगस डॉक्टरविरोधी समितीची स्थापना

$
0
0
राज्यातील विविध भागांत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असताना पुण्यासारख्या शहरात बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी समिती नसल्याचे पितळ उघडे पडले.

वगळलेले २.५ लाख मतदार पुन्हा मतदारयादीत

$
0
0
मतदारयादीतून वगळलेल्या मतदारांपैकी अडीच लाख मतदारांचा संपर्क झाल्यामुळे त्यांचा पुन्हा मतदारयादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या आता पावणेसात लाख झाली आहे.

२ वर्षांच्या लढाईनंतर विद्यार्थ्याला फी परत

$
0
0
फी परताव्यासाठी दोन वर्षे खेपा घालणाऱ्या इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याला अखेर फीचा परतावा मिळाला.

पानवाले उठवणार आंदोलनाचे रान

$
0
0
राज्य सरकारने सुगंधित सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखूवर बंदी घातल्यामुळे राज्यभरातील पानविक्रेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सरकारच्या बंदीविरोधात पानविक्रेत्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

रिक्षाचा उद्याचा संप स्थगित

$
0
0
‘सीएनजी’ आणि ‘एलपी‌जी’ किटच्या हायड्रो टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘आरटीओ’च्या आश्वासनानंतर राज्य ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीचा उद्याचा (८ ऑगस्ट) संप स्थागित झाला. त्यामुळे रिक्षा वाहतूक सुरू राहणार आहे.

फर्निचर खरेदी पारदर्शीच

$
0
0
शिक्षण मंडळाने केलेली पावणेदोन कोटी रुपयांची फर्निचर खरेदी पारदर्शी पद्धतीने केली असल्याचा सूर शिक्षणमंडळाने अाळविला आहे. फर्निचरसाठी वापरले गेलेले लाकूड आणि त्याची लांबी यामुळे रकमेत तफावत असल्याचे मंडळातील सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘वाजवा रे वाजवा’ला २ दिवसांत मान्यता

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात शेवटच्या पाच दिवशी लाऊडस्पीकरना मध्यरात्रीपर्यंत परवानगी देण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला असून, दोन दिवसांतच त्याला मान्यता मिळणार आहे.

परदेशी विद्यार्थी ‘स्कॅनर’खाली

$
0
0
दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि स्थानिक पोलिसांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनालाच धारेवर धरले

$
0
0
पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याबाबत ‘कारभारी’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिकेतील ‘माननीयां’चे कान टोचल्याचे पडसाद पालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत उमटले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images