Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. कोतवाल यांनी शोधले 'बोसॉन'चे अचूक वस्तुमान

0
0
बोसॉन या मूलकणाच्या वस्तुमानाचे अचूक गणन करण्यात भारतीय वैज्ञानिक प्रा. डॉ. आशुतोष कोतवाल यांनी यश मिळविले आहे. अमेरिकेतील शिकागोजवळच्या बटाव्हिया येथील फर्मी राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळेतून अधिकृतरीत्या हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.

यशवंत कारखाना गणपती संघाकडेच

0
0
खानापूर लातुक्यातील नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाविरोधात माजी आमदार अनिल बाबर यांनी डीआरटी कोर्टाकडे दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळल्याने हा कारखाना गणपती सहकारी जिल्हा संघाकडेच राहणार यावर शिक्कामोर्तब झाले.

माझी आठवण एक सैनिक म्हणूनच राहावी

0
0
लष्करप्रमुखपदाची २६ महिन्यांची वादग्रस्त कारकीर्द संपवून पायउतार होत असताना जनरल व्ही. के. सिंह यांनी ‘लष्कराच्या मूल्यांची पाठराखण करणारा एक सैनिक’ म्हणून आपल्याला लक्षात ठेवले जावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बारावीनंतरच्या कोर्सची माहिती एकाच छताखाली

0
0
एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित 'एज्युकेशन अँड करिअर काउन्सेलिंग वीक'चे गुरुवारी उद्घाटन झाले. बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध कोसेर्सची माहिती विद्यार्थी आणि पालकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, या हेतूने हा उपक्रम आयोजिण्यात आला असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

पालिकेची नारळ खरेदी वादात

0
0
गेल्या वर्षीप्रमाणेच संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मानक-यांना पालिकेतर्फे देण्यात येणारी मानाच्या नारळाची खरेदी वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. पालख्यांच्या शहरातील आगमनापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

बीईजीतील नाल्याबाबत गुरुवारी होणार बैठक

0
0
बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपमधील (बीईजी) नाला बुजविल्याप्रकरणी येत्या गुरुवारी (३१ मे) महापालिकेच्या आयुक्तांकडे बैठक बोलावण्यात आली आहे. महापालिका, खडकी कँटोन्मेंट बोर्ड आणि बीईजीचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कासच्या पठारावर यंत्रांचा धडधडाट

0
0
पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून कास पठाराला कुंपण घालण्याचे काम वन विभागाने सुरू केले आहे.

घुलेंच्या गळ्यात दुस-यांदा जिल्हाध्यक्षपदाची माळ

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुरेश घुले यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगले काम केल्याची पावती घुले यांना या माध्यमातून देण्यात आल्याचे मानले जात आहे.

शुक्र करणार सूर्यबिंबावरून प्रवास!

0
0
या शतकातील दुसरे आणि शेवटचे शुक्र अधिक्रमण (ट्रान्झिट) पाहण्याची संधी येत्या सहा जून रोजी असून, त्यासाठी आकाशप्रेमींची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पुण्यातील 'आयुका', तसेच विविध हौशी आकाश निरीक्षकांच्या संस्थांतर्फे ही दुमिर्ळ खगोलीय घटना सर्वसामान्यांना पाहता यावी यासाठी दुबिर्णी, तसेच फिल्टर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आघातातून सावरण्याचा नवदाम्पत्याचा प्रयत्न

0
0
ती काळरात्र अजूनही डोळ्यासमोरून जात नसली तरी बहुले कुटुंबीय स्वत:बरोबरच नातेवाईकांना सावरण्यासाठी आता धीर एकवटत आहेत. एकनाथ-मनीषा हे नवदाम्पत्यदेखील घरातील छोटी-मोठी कामे उरकून आयुष्य पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुण्यातील ७२ संघटनांचा उपोषणाला पाठिंबा

0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व योगगुरू रामदेव बाबा यांच्या आंदोलनाला पुण्यातील ७२ संस्था संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली येथे ३ जूनला होणा-या लाक्षणिक उपोषणास समर्थन देण्यासाठी या संघटनांनी जिल्हा आंदोलन समितीची स्थापना केली आहे.

प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची 'बारामती'ची मागणी

0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकासकामांतर्गत सुरू असलेले घोटाळे, अनधिकृत बांधकामे, वाहनतळांच्या जागेवरील अतिक्रमणे आदी विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी बारामती तालुका विकास मंडळाने केली आहे.

सहप्रायोजकत्वासाठी लागेल राज्य सरकारची परवानगी

0
0
महापालिकेच्या बजेटमधील सहप्रायोजकत्वाचे प्रस्ताव बदलून घ्यावे लागतील, अन्यथा त्याला मदत करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी मंगळवारी स्पष्ट केले. करियर महोत्सवावरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने याबाबत ठाम भूमिका घेतली आहे.

सोलापूरला मिळणारे पाणी रोखले

0
0
सोलापूरकरांना उस्मानाबादच्या सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रद्द केला आहे. फक्त पिण्यासाठी दिलेल्या पाण्याचा शेतीसाठी जास्त वापर होत असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला आहे.

वाहनाविना प्रवाशांची, हॉटेलविना भुकेल्यांची तारांबळ

0
0
पेट्रोल दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये पुणेकरांचे गुरुवारी हाल झाले. बस-रिक्षा न मिळाल्याने अनेक प्रवासी ताटकळले, तर हातावर पोट असणा-या व्यावसायिकांनाही बंदचा फटका बसला.

दूध विक्रीची नोंद : गवळ्यांनाही आता सक्ती

0
0
खाद्यपदार्थ विक्रेत्यांनंतर राज्यातील दूध संकलन, प्रक्रिया केंद्रांसह घरोघरी जाऊन दुधाची विक्री करणा-या गवळ्यांनाही आता दूध विक्री परवान्यासह नोंदणी करण्याची सक्ती अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केली आहे.

पीएच.डी स्नातकांना चार वर्षे स्टायपेंड

0
0
पुणे विद्यापीठात पीएच.डी संशोधन सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना आता चार वर्षांसाठी तर एम.फिलच्या विद्यार्थ्यांना दीड वर्ष विद्यावेतन (स्टायपेंड) मिळणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंगळवारी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

किरकोळ वादातून लुटला रू ३३ हजारांचा ऐवज

0
0
किरकोळ वाद वाढल्यामुळे झालेल्या मारामारीमध्ये एका व्यक्तीची सोन्याची साखळी आणि मोबाईल असा ३३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेण्याचा प्रकार सोमवारी गुलटेकडीमध्ये घडला.

'निवडणुकांसाठी कार्यर्कत्यांची फळी उभारणार'

0
0
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, तरुण कार्यर्त्यांची फळी तयार करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलातर्फे 'एमटीडीसी' कार्ला येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय पुनरावर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आता वीज दरवाढीचा 'शॉक' नको

0
0
गोरगरीब-सर्वसामान्य ग्राहक आणि उद्योग क्षेत्रासाठी नियोजित वीज दरवाढ अन्यायकारक असल्याची टीका विविध क्षेत्रांमधून करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने या दरवाढीला मान्यता देऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images