Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी महिनाभर वर्गाबाहेर

$
0
0
शाळेची परवानगी न घेता एका शिक्षकाला ‘सेंड-ऑफ’ दिला, म्हणून ‘एनडीए’च्या केंद्रीय विद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी महिन्याभरासाठी वर्गाबाहेर काढले. संबंधित विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असल्याने शाळेत येत नसल्याचे प्राचार्यांकडून सांगण्यात येत असले, तरी प्राचार्यच वर्गात बसू देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी बुधवारी केली.

सावरकर स्मारकाची अवस्था दयनीय

$
0
0
कर्वे रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे काम १२ वर्षांनंतरही अपूर्णच राहिले असून, त्यासाठी करण्यात आलेल्या काही कामांचे अस्तित्वही येथे राहिलेले नाही.

गरजू पेशंटची सामूहिक प्रतीक्षा यादी हवी

$
0
0
पेशंटला ‘ब्रेन डेड’ घोषित केल्यानंतरही त्यांचे नातेवाइक अवयवदान करण्यासाठी लवकर तयार होत नाहीत. त्यामुळेच देश पातळीवर अशा ब्रेन डेड पेशंटसह गरजू पेशंटची ‘सामूहिक प्रतीक्षा यादी’ आणि नेटवर्किंग करण्याची गरज आहे.

सुधारित दर द्या; अन्यथा ‘कॅशलेस मेडिक्लेम’ बंद

$
0
0
‘पीपीएन’ (प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) ही योजना राबवायची असेल, तर शहरातील हॉस्पिटलना देण्यात आलेल्या उपचारदरांत नवी मुंबईच्या धर्तीवर दर द्यावेत, अन्यथा ही योजना लागू होईल, तेव्हापासून सर्व हॉस्पिटलमधून ‘कॅशलेस मेडिक्लेम’ बंद करण्यात येईल, असा इशाराच हॉस्पिटलचालकांनी शनिवारी दिला.

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही दोनदा पाणी हे ‘मृगजळ’च

$
0
0
पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठा करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही पालिका आणि पाटबंधारे खात्यातील समन्वयाअभावी पुणेकरांना अजूनही दोन वेळच्या पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागते आहे.

प्रसाद सुर्वे यांचे आरोप बिनबुडाचे

$
0
0
‘चित्रपट महामंडळाचे मावळते अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.

सुगंधित तंबाखूवर बंदी समाजहितासाठीच

$
0
0
‘सार्वजनिक हित पाहणे ही शासनाची जबाबदारी असून पानातील सुगंधित तंबाखू आणि सुपारी मानवी आरोग्यास घातक असल्याने त्यावर राज्य सरकारने लागू केलेली बंदी ही कायमच राहणार आहे,’ असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवात ५दिवस बारापर्यंत आवाज

$
0
0
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर लावण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

‘शहरात औषधांचे शॉर्टेज नाही’

$
0
0
औषध नियंत्रणाखाली आलेल्या स्वस्त औषधांचा पुरवठा बाजारात झाला नसला, तरी अद्यापही बाजारात औषधांचे शॉर्टेज नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

जात, उत्पन्न दाखले आता ऑनलाइन

$
0
0
जात, उत्पन्न, रहिवास आणि नॉन-क्रिमिलेअर दाखल्यांसाठी करावा लागणारा द्राविडी प्राणायाम आता थांबणार असून हे दाखले येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाइन देण्यात येणार आहे.

दोन वेळा पाणी हा पुणेकरांचा हक्कच

$
0
0
‘शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे नव्वद टक्क्यांहून अधिक भरलेली असताना दोन वेळा पाणी मिळणे, हा पुणेकरांचा हक्कच आहे,’ असे खासदार सुरेश कलमाडी यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे.

दोन वेळा पाणी पावसाळ्यापुरते

$
0
0
गेली दीड वर्षे पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना पावसाळ्यापुरता का होईना दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात पुण्याला दोन वेळा पाणी देण्याची तयारी जलसंपदा विभागाने दाखविली आहे.

माझ्या काळापेक्षा अधिक खड्डे

$
0
0
‘सध्या शहरात खूप खड्डे आहेत. परंतु, माझ्या काळात एवढे खड्डे नव्हते’, असा टोला हाणून खासदार सुरेश कलमाडी यांनी शनिवारी पुण्याच्या ‘कारभाऱ्यां’वर पलटवार केला.

राज्यातील धरणांत ६७ टक्के पाणीसाठा

$
0
0
राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे प्रमुख धरणांचा पाणीसाठा ६७ टक्क्यांवर (८८३ अब्ज घनफूट) पोहोचला आहे. गतवर्षी याचा काळात राज्यातील धरणांत केवळ ३६ टक्के जलसाठा झाला होता.

टॅब आणि स्मार्टफोनच्या ‘केस’ला वकिलांची पसंती

$
0
0
वकिलांना त्यांच्या केसेस चालविण्यासाठी कायद्याच्या अनेक पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. त्यातून हवे ते दाखले शोधून कोर्टात सादर करावे लागते.

सासवडच्या नगरपालिकेस दंड

$
0
0
सासवड शहरातील सांडपाणी, मैला थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याच्या लेखी तक्रारी करूनही सार्वजनिक आरोग्याचा विचार न करणाऱ्या सासवड नगरपालिकेस अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कायद्याचा बडगा दाखवला.

पावसामुळे डेंगीच्या पेशंटमध्ये वाढ

$
0
0
रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे शहरात पाण्याचे डबके साचल्याने डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे डेंगीच्या पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याचे वैद्यकतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

स्वाइन फ्लूच्या उपचाराच्या जनजागृतीसाठी आराखडा

$
0
0
पुण्यासह राज्यात स्वाइन फ्लूच्या पेशंटच्या मृत्युमुखींची संख्या वाढत असल्याने गर्भवती, बीपी, हार्ट, अस्थमा, डायबेटिस, पाच वर्षांखालील मुलांसह ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसारख्या अतिजोखमीच्या (हायरिस्क) पेशंटवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

मटण, चिकनसाठी हाउसफुल्ल गर्दी

$
0
0
मासांहारी खवय्यांनी आखाड करण्यासाठी आषाढ महिन्यातला अखेरच्या रविवारी मटण, चिकन आणि मासळीवर ताव मारला. शहरातील मटण, चिकन आणि मासळी विक्री केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

‘भाजयुमो’चा एल्गार

$
0
0
केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘एल्गार’ पुकारण्यात आला आहे. प्रदेश भाजयुमोच्या वतीने आयोजित या राज्यव्यापी कार्यक्रमास येत्या शुक्रवारी (ता.९) पुण्यातून सुरुवात होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images