Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खालापूर येथील वऱ्हाडाला झालेल्या अपघातप्रकरणी ट्रकचालक सोमनाथ ज्ञानदेव फडतरे (वय २५, रा. सुलतानवाडी, कोरेगाव, जि. सातारा) याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या अंगणात रंगल्या सोलापूरच्या आठवणी

0
0
सोलापूरची लोकसभा आणि सोलापूरचा क्लब... सोलापूरमधली पत्रकारिता आणि तिथल्याच गिरण्या... संगमेश्वर कॉलेज आणि कॉलेजच्याच मोठ्या वर्गामध्ये भरणारे पुंडे सरांचे राज्यशास्त्राचे वर्ग... अशा काही आठवणींनी अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक असणाऱ्या सोलापूरकरांची रविवारची सायंकाळ रंगली.

ऑक्सिजनच्या सुविधेअभावी अॅम्ब्युलन्स निरुपयोगी

0
0
अपघातानंतर माझा मेहुणा शुभम आणि संजना, सपना गायकवाड या मेव्हण्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स आल्या. पण त्यात ऑक्सिजनची सुविधाच नसल्याने त्यांचे प्राण वाचले नाहीत.

एकरकमी परतफेड योजनेला मुदतवाढ

0
0
अनुत्पादक कर्जांमुळे (एनपीए) हैराण झालेल्या नागरी सहकारी बँकांच्या प्रभावी कर्जवसुलीसाठी आखलेल्या एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे. ही योजना ३१ मार्च २०१३ पर्यंत सुरू राहणार आहे.

मसापच्या घटक संस्थाचे अनुदान वाढवण्याची मागणी

0
0
महाराष्ट्र परिषदेशी संलग्न असलेल्या राज्याबाहेरील संस्थांप्रमाणेच राज्यातील घटक संस्थांच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जात असून, निधी मिळवण्यासाठी पुढील महिन्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे.

कास पठारावर कुंपणाचा प्रस्ताव

0
0
महाराष्ट्राचे 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावरील रंगीबेरंगी दुमिर्ळ आकर्षक नाजूक फुले सध्या हौशी पर्यटकांमुळे धोक्यात आली आहेत. या अतिउत्साही पर्यटकांवर वचक ठेवण्यासाठी वन विभागाने कास पठाराला काटेरी कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.

वाघांच्या शिकारीबाबत रंगणार विशेष मुलाखत

0
0
जंगली प्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, कार्यशाळा, वाघांच्या शिकारीबाबत थेट मुलाखत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन पर्यावरण दिनानिमित्त वाइल्ड संस्था आणि महापालिकेने केले आहे.

ग्रामीण मुलांना गरज संधीची

0
0
'क्रिकेटमध्ये ग्रामीण भागातील मुले चांगली खेळून पुढे येतात, शहरी भागातील मुले खेळत असली तरी पुढे येत नाहीत. ग्रामीण भागातील मुलांमध्ये उत्तम गुणवत्ता आहे, परंतु त्यांना योग्य संधी मिळायला हवी,' अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महंमद अझहरुद्दीन यांनी व्यक्त केली.

संत नामदेवांवर माहितीपट

0
0
'पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाच्या वतीने देशभरातील संत नामदेवांच्या देशभरातील स्मृतिमंदिरांविषयी माहितीपट तयार करण्यात येणार आहे. या स्मृतिमंदिराविषयीचे सर्व संशोधनकार्य आणि माहिती एकत्रितपणे समाजासमोर आणण्यात येणार आहे,' अशी माहिती अध्यासनाच्या प्रमुख डॉ. वीणा मनचंदा यांनी 'मटा'ला दिली.

केरळमधील मान्सूनचे आगमन लांबणार....

0
0
दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरासह अरबी समुदाच्या दक्षिण भागापर्यंत वेगाने धडक मारलेल्या मान्सूनचे केरळमधील आगमन लांबण्याची शक्यता आहे. अरबी समुदात निर्माण झालेल्या 'अँटी-सायक्लोन' स्थितीमुळे मान्सूनच्या वा-यांचा प्रभाव कमी झाला असून, केरळमधील आगमन चार दिवस पुढे जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर शनिवारी छत्रारोहण

0
0
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येत्या शनिवारी, २ जुलै रोजी रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पंचधातूंच्या छत्रचामराचे आरोहण करण्यात येणार आहे.

अनियंत्रित 'एक्स्प्रेस वे'वर 'लेन कटिंग' भरधाव

0
0
भरधाव 'एक्स्प्रेस वे'वरील वाहतुकीला नियंत्रित न केल्याने निष्पाप जिवांचे बळी जात असताना महामार्ग पोलिस, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी अशा कोणत्याही एजन्सीच्या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या

0
0
दहावीत नापास होण्याच्या भीतीने कराड तालुक्यातील टेंभू येथील हृषिकेश संजिवन गावडे (१६) या विद्यार्थ्यांने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

कसबा पेठेत महिलेचा खून

0
0
लग्नाला नकार दिल्याचा राग धरून तरुणाने विवाहितेच्या नव-याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवारी कसबा पेठेत उघडकीस आली. शनिवारवाड्यासमोरील बुटांच्या दुकानाजवळ पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एकाला पोलिसांनी एकाला अटक केली.

ज्येष्ठ नागरिक शिकणार गोष्टी-गाणी लिहायला

0
0
आयुष्याच्या संध्याकाळी केवळ आरोग्य, म्हातारपण आणि कौटुंबिक समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा शिकण्याची उर्मी मनात बागळून वेगळे काम करण्याच्या उद्देशाने प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बडतर्फ पोलीस निरीक्षकाला खून केल्याप्रकरणी जन्मठेप

0
0
कुंपणाच्या भिंतीच्या वादातून एका वकिलाचा खून करणा-या ८५ वर्षांच्या बडतर्फ पोलीस निरीक्षकाला जन्मठेपेसह दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. महाजन यांनी सुनावली.

मान्सून लांबणीवर?

0
0
दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राच्या दक्षिण भागापर्यंत वेगाने धडक मारलेल्या मान्सूनचे केरळमधील आगमन लांबण्याची शक्यता आहे.

पिपंरी पालिकेकडून एव्हरेस्टवीरांना मदत

0
0
जगातील सवोर्च्च एव्हरेस्ट शिखर सर करून पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी भोसरी येथील सागरमाथा संस्थेला पाच लाख रुपये आणि मृत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

शिवसेना नगरसेवकांवर कारवाईचा बडगा

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ सदस्यपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सारंग कामतेकर यांच्या पराभवाचा ठपका ठेवून पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी तीन नगरसेवकांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. त्यानुसार गैरप्रकार मान्य करून खुलासा करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

लोहगावात सापडले फुरसे, सहा पिले

0
0
ऐन वस्तीत एका घराच्या अंगणामध्ये आश्रयासाठी आलेल्या मादी फुरसे (सॉ स्केल्ड वायपर) आणि तिच्या सहा पिलांना सर्पमित्र सुरेश लोहिरे यांनी बुधवारी ताब्यात घेतले. लोहगाव येथील संतनगरमध्ये हा प्रकार घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images