Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ग्रामपंचायत निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार

$
0
0
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २००१ च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता २०११ मधील जनगणना ग्राह्य धरून नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

‘नूमवि’च्या तपासणी दरम्यान गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप

$
0
0
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूतन मराठी विद्यालय प्राथमिक शाळेत शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान गुरुवारी गोंधळ झाला. ही गोंधळाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

बँका फोडून दरोडे घालणारी आंतरराज्य टाळी गजाआड

$
0
0
पुणे-नगरसह राज्यातील बँका तसेच पतसंस्था फोडून कोट्यवधी रुपयांचा दरोडा घालणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला ग्रामीण पोलिसांनी अखेर नागपूर येथून अटक केली.

सिग्नलची देखभाल व दुरुस्ती आता नव्या ठेकेदाराकडून

$
0
0
शहरातील बंद पडलेल्या सिग्नलव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले गेल्यानंतर अखेर देखभाल आणि दुरुस्तीसाठी महापालिकेतर्फे नव्याने ठेकेदार नेमण्यात येणार आहे.

कोल्हापूरच्या सी​रिअल किलरची माहिती द्या

$
0
0
कोल्हापूर येथील ‘सीरिअल किलर’ने पुण्यातही खून केल्याच्या शक्यतेवर गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरसारखेच खुनाचे सहा गुन्हे २००९ ते २०१२ या काळात पुण्यात घडले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेने या ‘सीरिअल किलर’चा पुण्यातील ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे आणि पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी दिली.

दुष्काळी तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टीच

$
0
0
जिल्ह्याच्या एका भागात पावसाची कृपादृष्टी झाली असताना बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड या तालुक्यांकडे मात्र पावसाची वक्रदृष्टी पडली आहे. पावसाअभावी या तालुक्यांतील ७४ गावे व ५७१ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

कोल्हापूरच्या सी​रिअल किलरची माहिती द्या

$
0
0
कोल्हापूर येथील ‘सीरिअल किलर’ने पुण्यातही खून केल्याच्या शक्यतेवर गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरसारखेच खुनाचे सहा गुन्हे २००९ ते २०१२ या काळात पुण्यात घडले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेने या ‘सीरिअल किलर’चा पुण्यातील ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे आणि पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी दिली.

खड्ड्यामुळे अपघातात युवती जखमी

$
0
0
खड्ड्यामधून गाडी गेल्यानंतर तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने मेंदूला मार लागून बुधवारी सायंकाळी एका युवतीला गंभीर दुखापत झाली. आश्वासनांच्या ट्रॅकवर मश्गूल माननीय आणि सुस्तावलेले प्रशासन पुणेकरांच्या जिवावर उठले आहे, अशा शब्दांत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पीएमपीच्या सेवेचा बोजवारा

$
0
0
पावसाळ्यामध्ये वाहतूक कोंडीमुळे वेळापत्रक कोलमडल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सेवेचा आता स्पेअरपार्टच्या कमतरतेमुळे बोजवारा उडत आहे. ऐन पावसात जुन्या ‘पीएमपी’ बसेस बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ब्रेक डाऊन, पंक्चर आणि अन्य कारणांमुळे गुरुवारी दिवसभरात ५१ बसेस पडल्या.

शहरात पावसाचा जोर ओसरला

$
0
0
गेले काही दिवस शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाचा जोर सलग दुसऱ्या दिवशीही कमी झाला होता. शहरात गुरुवारी सायंकाळपर्यंत २.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुण्याबरोबर राज्यातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.

मोबाइल टॉवरवर कारवाई नाही

$
0
0
शहरातील इमारतींवर उभारण्यात आलेल्या बेकायदा मोबाइल टॉवरवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या पालिका प्रशासनाने एका महिन्यात कोणतीही कारवाई न केल्याने त्याचे जोरदार पडसाद मंगळवारी सर्वसाधारण सभेत उमटले. त्यातच मोबाईल कंपनीच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असा खुलासा आयुक्त महेश पाठक यांनी केल्याने सभासदांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.

मनसे सदस्यांचे निलंबन?

$
0
0
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांना अपमानास्पद वागणूक देऊन गोंधळ घालणाऱ्या ‘मनसे’च्या सदस्यांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. प्रशासकीय पातळीवर त्याबाबतचा विचार सुरू असून, सत्ताधाऱ्यांचा त्याला पाठिंबा असल्याची चर्चा गुरुवारी पालिकेत होती.

पानशेत धरणाचे दरवाजे उघडले

$
0
0
पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पानशेत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून दीड हजार क्युसेकने ​पाणी सोडण्यात येत आहे. पानशेतमधून सोडलेल्या पाण्यामुळे खडकवासला धरणाचा विसर्ग वाढवून ६ हजार ३२० क्युसेक करण्यात आला आहे.

समस्यांच्या कात्रीत ढोलपथके

$
0
0
ढोलपथकांवर अंकुश ठेवण्याची भूमिका पुणे पोलिसांनी घेतल्याने बऱ्याच पथकांना सरावासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, ढोलपथकांच्या सरावाच्या आवाजामुळे त्रास होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घातलेल्या चाळीस डेसिबलच्या मर्यादेमुळे ढोलपथके कात्रीत सापडली आहेत.

पुणेकरांना १५० कोटींचा खड्डा!

$
0
0
शहरातील रस्तेबांधणी, दुरूस्ती आणि खड्डे बुजविण्यासाठी पुणे महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये २७० कोटी रुपयांची ‘भरीव’ तरतूद करून त्यापैकी १५० कोटी रुपये प्रशासनाने खर्चीही पाडले. मात्र, पावसाळ्याच्या मध्यावर पुणे खड्ड्यात गेल्याने पुणेकरांचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहेत! या दर्जाहीन कामासाठी जबाबदार ठरणारे ‘माननीय’ आणि अधिकारी गेले कुठे, असा सवाल आता पुणेकर करीत आहेत.

पोस्टमनना मिळणार एका महिन्यात नवे गणवेश

$
0
0
नवीन गणवेश देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पोस्टाच्या पुणे विभागातील पोस्टमननी बनियन आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, येत्या एक महिन्यात गणवेश देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

माळशेजच्या दरडीखाली तिघांचा मृत्यू

$
0
0
माळशेज घाटात कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याखाली एक टेम्पो गाडला गेला असल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली. दरड बाजूला करत असताना टेम्पोचे अवशेष दिसून आल्याने शोध घेतला असता, या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘आंबेगाव लेआउट विकासकासाठी हलविला’

$
0
0
आंबेगाव येथील सर्व्हे क्र ३६/११ या जमिनीवरील ले-आउटमध्ये विकासकाचा फायदा होण्यासाठी विकास आराखड्यातील १२ मीटरचा रस्ता हलविण्यात आला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

‘एक्स्प्रेस वे’वरील वाहतूक ठप्प

$
0
0
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर खंडाळा घाटात दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दीड तास ठप्प झाली. त्यानंतर सुमारे तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

इंद्रायणीतील ‘तवेरा’ सापडली

$
0
0
आळंदीच्या नव्या पुलावरून इंद्रायणी नदीमध्ये कोसळलेली तवेरा गाडी शुक्रवारी (२६ जुलै) सकाळी अखेर सापडली. मात्र, त्यातील प्रवासी वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images