Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चित्रपट महामंडळाला मिळाली जागा

$
0
0
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि आंदोलन यानंतर आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला पुण्यात कार्यालय सुरू करण्यासाठी जागा मिळाली आहे. टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलसमोरील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये महामंडळाचे नवे कार्यालय थाटण्यात येत असून, ३१ जुलैपासून नव्या जागेत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.

धोरणनिर्मितीत नर्सेसचा सहभाग आवश्यक

$
0
0
‘देशाच्या आरोग्यसेवेत प्रगती साधण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पेशंटची शुशृषा करणाऱ्या नर्सेसचाही सरकारच्या धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभाग हवा,’ अशी अपेक्षा पश्चिम बंगाल राज्याच्या नर्सिंग विभागाच्या उपसंचालिका डॉ. सांत्वना कुंडू यांनी व्यक्त केली.

अल्पसंख्याकांच्या व्यथेची कथा

$
0
0
जैन समाजाला राष्ट्रीय अल्पसंख्याक समाज म्हणून मान्यता मिळावी, यासाठी गेली दोन दशके प्रयत्न सुरू आहेत. मान्यतेचे हे आंदोलन या पुढे आणखी व्यापक करण्यासाठी येत्या रविवारी (२८ जुलै) शहरात ‘राष्ट्रीय जैन अल्पसंख्यान हक्क परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

मार्केट यार्ड वाहतूक कोंडी फुटणार?

$
0
0
मार्केट यार्डच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी, यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र देणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संजीव खडके यांनी सांगितले.

सरकारच्या उदासीनतेमुळे शहराचा डीपी लांबणार

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत संपून एक महिना उलटला आहे. मात्र, राज्य सरकारने डीपीच्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समितीची स्थापनाच केली नसल्याने, शहराचा डीपी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

कँटोन्मेंटच्या निवडणुका डिसेंबरमध्ये

$
0
0
देशातील ६२ कँटोन्मेंटच्या निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत. त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे.

भामा-आसखेडचे पाणी पिंपरी-चिंचवडलाही

$
0
0
भामा-आसखेड धरणातून पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेला देखील पाणी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी तत्त्वतः मंजुरी दिली. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वाढीव पाणी कोट्याला सरकारतर्फे मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तंबाखूच्या शेतीवर बंदीची मागणी

$
0
0
केंद्रीय कृषी खात्याने तंबाखूच्या शेतीवर टप्याटप्याने बंदी घालावी, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे. तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मद्य, जर्दा यावरही कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारकडे निवेदन पाठवणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

नदीपात्रातील रस्त्याबाबत पालिकेकडून दिशाभूल

$
0
0
नदीपात्रातील रस्ता पूररेषेच्या आत असल्याने त्याची पुनर्आखणी करून आत्तापर्यंत टाकलेला भराव तातडीने काढून टाका, असा आदेश ‘हरित लवादा’ने दिला असतानाही पालिका चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करते आहे.

‘सीडी फोर’ पाचशेपर्यंत येताच एचआयव्हीबाधितांना ‘एआरटी’

$
0
0
‘एचआयव्ही’बाधितांच्या रक्तातील ‘लिम्फोसाइट’ रक्तपेशींचे (सीडी फोर) प्रमाण हे ३५० पर्यंत खाली येण्याऐवजी आता पाचशेपर्यंत प्रमाण येताच बाधितांना तत्काळ विषाणू प्रतिबंधक उपचार (एआरटी) सुरू करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत.

अनधिकृत बांधकामांची नोंद केल्याने सहा ग्रामपंचायतींवर कारवाई

$
0
0
अनधिकृत बांधकामांच्या नोंदी करणाऱ्या सहा ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या ग्रामपंचायतींचे दप्तर ताब्यात घेऊन संबंधित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

पुणे-नसरापूर-महाड मार्गासाठी निविदा

$
0
0
पुण्याहून महाडला जाण्यासाठी आणखी एक जवळचा रस्ता तयार करण्यात येत असून, त्यासाठी तीन कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ताम्हिणी, वरंधा घाट मार्गाला पर्याय ठरणारा पुणे-नसरापूर-मढीघाट ते महाड असा हा रस्ता प्रस्तावित आहे.

कोर्टाच्या जागेच्या शोधाला ‘स्वल्पविराम’

$
0
0
जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी जागा पाहणीचा शोध तूर्त थांबला असून, चार नव्या न्यायालयांसाठी येरवडा व औंधमधील जागा महसूल विभागाने सूचविली आहे. शिवाजीनगर येथील न्यायालयाची जागा अपुरी पडत आहे. वाढत्या केसेस, त्यासाठी येणारे नागरिक, त्यांची वाहने यामुळे न्यायालयाच्या आवारात नेहमी गर्दी दिसते.

महिला डॉक्टरला अश्लील ‘एसएमएस’ पाठविणारा गजाआड

$
0
0
महिला डॉक्टरला अश्लील ‘एमएमएस’ पाठवून त्रास देणाऱ्या औरंगाबाद येथील एका व्यक्तीला विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणी ३० वर्षीय महिला डॉक्टराने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी दिलीप रूपचंद अहीर (रा, महेबूबखेडा, गंगापूर, औरंगाबाद) याला गंगापूर परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अर्जुन सकुंडे यांनी दिली.

पुण्याच्या वेधशाळेत प्रादेशिक केंद्र

$
0
0
देशभरासह शेजारील देशांतील हवामानाची संपूर्ण माहिती गोळा करून ही माहिती जागतिक हवामान संघटनेला पाठविणारे ‘रिजनल टेलिकॉम हब’ (आरटीएच) भारतीय हवामान शास्त्रविभागाच्या (आयएमडी) पुण्यातील कार्यालयात उभारण्यात आले आहे. सध्या या यंत्रणेची चाचणी सुरू असून, लवकरच ही यंत्रणा कार्यन्वित होणार आहे.

‘भारंभार पुस्तके लिहून लेखक मोठा होत नाही’

$
0
0
‘द. भि. कुलकर्णी यांच्या समीक्षेचे साम्राज्य अचंबित करणारे असून सर्व साहित्यप्रकारांतून त्यांनी मुक्त वावर केला आहे. भारंभार पुस्तके लिहून माणून मोठा होत नाही, हेच त्यांच्या लेखनकार्यातून सिद्ध होते,’ असा गौरव ज्येष्ठ साहित्यिक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी गुरुवारी केला.

अतिरिक्त आयुक्त पालिकेचे जावई नाहीत

$
0
0
पालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीत बुधवारच्या सर्वसाधारण सभेला हजर राहण्याची नैतिक जबाबदारी टाळणारे अतिरिक्त आयुक्त पालिकेचे जावई नाहीत, अशा शब्दांत पुणे जनहित आघाडीचे उज्ज्वल केसकर यांनी राजेंद्र जगताप यांच्यावर गुरुवारी ताशेरे ओढले.

सांडपाणी प्रकियेबाबत केंद्राकडे ७९८ कोटीचा प्रस्ताव

$
0
0
मुठा नदीतून होणाऱ्या मिथेन वायूच्या उत्सर्जनाला प्रतिबंध घालण्यासाठी ७९८ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविल्याची माहिती पर्यावरण मंत्री संजय देवताळे यांनी विधान परिषदेत दिली.

घरटे प्रकल्पाचे ‘संतुलन’ तपासण्यासाठी समिती

$
0
0
महानगरपालिकेच्या गांधीनगर येथील ‘घरटे’ प्रकल्पाची नेमकी स्थिती काय, याबाबतचा अहवाल देण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांसह पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमण्याचे निर्देश गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिले. दोन आठवड्यांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

घरटे प्रकल्पाचे ‘संतुलन’ तपासण्यासाठी समिती

$
0
0
महानगरपालिकेच्या गांधीनगर येथील ‘घरटे’ प्रकल्पाची नेमकी स्थिती काय, याबाबतचा अहवाल देण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांसह पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमण्याचे निर्देश गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिले. दोन आठवड्यांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images