Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ओबीसी’ आरक्षणात मराठा समाज नको

0
0
मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असला तरी इतर मागासवर्गींयांच्या (ओबीसी) कोट्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करू नये.

पीएमपीचे ‘ई- तिकीट’ बासनात

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) ई-तिकीट सुविधा ‘आऊट ऑफ ऑर्डर’ झाली असून, ही सुविधा पुरविणाऱ्या ४० टक्के मशीन नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे.

१.२५ कोटी पळविणारे पोहोचले औरंगाबादेत

0
0
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘एटीएम’ मशिनमध्ये भरण्यासाठी आणलेली एक कोटी १६ लाख रुपयांची रोकड पळविण्यात दोघांचा हात असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा औरंगाबादपर्यंत माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळकत हडप करण्यासाठी बनावट मृत्युपत्र

0
0
एका महिलेच्या पतीचे बनावट मृत्यूपत्र तयार करून त्यांचा बंगला आणि जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पुणे कॅन्टोन्मेंटवर खडकीची आघाडी

0
0
पुणे जिल्ह्यातील तीनही कॅन्टोन्मेंटची जणगणना नुकतीच जाहीर करण्यात आली असून, खडकी कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे ७८ हजार ६८४ आहे.

दूध दरवाढीची शेतक-यांची मागणी

0
0
राज्य सरकारने शेतकऱ्यांना गाईच्या प्रतिलिटर दुधामागे दोन रुपये आणि म्हशीच्या दुधामागे तीन रुपये वाढवून द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीने केली आहे.

दुष्काळी गावांमध्ये नऊ टीएमसी पाणी

0
0
दुष्काळ ही इष्टापत्ती मानून राबविलेल्या जलयुक्त अभियानामुळे पाच जिल्ह्यांतील दुष्काळी गावांत पाणीच पाणी पाहायला मिळणार आहे.

रविवार ठरला ‘सरी’वार

0
0
पुणे आणि परिसरात रविवारी पावसाची संततधार सुरू होती. रविवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात ४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारीही अधूनमधून आषाढसरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.

ज्ञानकोशकारांच्या कादंबऱ्या नव्याने वाचकभेटीला...

0
0
ज्ञानकोशाची निर्मिती करून मराठी भाषेसाठी अनमोल योगदान दिलेले श्रीधर व्यंकटेश तथा ज्ञानकोशकार केतकर यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या सात कादंबऱ्या पद्मगंधा प्रकाशनाने वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत. ‘केतकऱ्यांच्या कादंबऱ्या’ या नावाने हा संग्रह प्रकाशित झाला आहे.

मराठी शब्दाला शोधा रशियन, जर्मन प्रतिशब्द!

0
0
मराठी-रशियन-जर्मन असा त्रैभाषिक शब्दकोश कलासक्त संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. सुमारे सहा हजार शब्दांबरोबरच वाक्प्रचार व म्हणींचाही यात समावेश आहे. इंग्रजीची मदत न घेता मराठी शब्दाला रशियन किंवा जर्मन प्रतिशब्द शोधणे यामुळे शक्य होईल.

पेट्रोलवर सेस लावण्यास भाजपचा पाठिंबा

0
0
शहरात विकासकामे करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध व्हावा यासाठी पेट्रोलवर सेस लावण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचे भाजपने समर्थन केले आहे. विकासकामांसाठी पेट्रोलवर सेस लावण्यास आमचा पाठिंबा असेल, असे पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी सांगितले.

विरोधी आमदारांशी निधीबाबत दुजाभाव

0
0
विकासकामांना निधी देताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना एक न्याय तर विरोधी पक्षाच्या आमदारांना दुसरा न्याय असा निकष राज्यकर्ते लावत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी केला.

‘गरीब रथा’ला पावसाचा अडथळा

0
0
विदर्भातील जोरदार पावसाचा रेल्वे वाहतूक सेवेला फटका बसला असून, प्रवाशांची वर्दळ असलेली गरीब रथ (नागपूर-पुणे) शनिवारी सकाळी पुण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले.

अलर्टनंतर पुण्यात दक्षता

0
0
गुप्तचर यंत्रणांनी पुण्यावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवल्याने रविवारी पोलिसांनी शहरभर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.

पुण्यातील शाळा यंदाही नापास

0
0
हक्काच्या जागांवर वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या नियमाला हरताळ फासला जात असतानाच, शिक्षणहक्क कायद्यानुसार मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याच्या परीक्षेतही शाळा नापास ठरत आहेत.

पोस्टाचे पहिले ATM जीपीओमध्ये

0
0
काळानुसार पोस्ट खाते बदलत असून, पोस्टाचे पुण्यातील पहिले ऑटोमेटिक टेलर मशिन (एटीएम) सेंटर मुख्य पोस्ट कार्यालयात (जीपीओ) सुरू करण्यात येणार आहे.

प्रिन्सेसला सुखरूप काढले

0
0
शिरुर तालुक्यातील निमोणे-न्हावरे या रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये रविवारी सकाळी तीन वर्षांची ‘प्रिन्सेस’ पडली. जवळपास वीस फुट खोल असलेल्या या बोअरवेलमधून तिला सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळाले.

पुणे चालले खड्ड्यांत...!

0
0
शहर व परिसरातील रस्तोरस्ती खड्ड्यांचेच साम्राज्य पसरले असून ‘कारभाऱ्यां’च्या प्रशासनाचा सुमार दर्जा त्यामुळे चव्हाट्यावर आला आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच रस्तेदुरुस्तीच्या आघाडीवरही ‘कारभारी’ आणि पालिकेची यंत्रणा अपयशी ठरत आहे.

‘फॅशन स्ट्रीट’ हलविणार

0
0
खरेदीसाठी आकर्षण केंद्र असलेले कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीट हलवण्यात येणार असून, धोबी घाट आणि तालेरा बंगला या दोन ठिकाणी हॉकर्सचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

व्हिडिओ शॉपिंग पोर्टल सुरू

0
0
सध्या भारतात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढत असताना पुण्यात व्हिडिओ शॉपिंगची कल्पना प्रत्यक्षात आली आहे. ‘जांभूळ डॉट कॉम’ या शॉपिंग पोर्टलवर व्हिडिओ शॉपिंगची सुविधा उपलब्ध झाली असून, थेट विक्रेत्याशी संवाद साधून आता घरबसल्या खरेदी करता येईल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images