Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘लाडक्या लेकी’च्या नावे ३० हजारांची ठेव

$
0
0
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली.

निधीसाठी भांडणारे खर्चामध्ये पाठीमागे

$
0
0
पालिकेतील माननीयांनी विकासनिधीतील बहुसंख्य रक्कम केवळ बाकडी बसविण्यासाठीच खर्च केली असल्याचे समोर आले असताना, सर्वपक्षीय माननीयांनी वार्षिक निधीपैकी सरासरी केवळ ६५ टक्के रक्कमच खर्च केली आहे.

कर्तृत्ववान विद्यार्थ्यांवर दातृत्वाचा वर्षाव

$
0
0
कुणी दहा बाय दहाच्या खोलीत राहून केलेली ज्ञानसाधना, तर कुणी पितृछत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलून जागविलेला शिक्षणनिर्धार, कुणी आयुष्याच्या खडतर परीक्षेचा मुकाबला करीत बाळगलेली दुर्दम्य इच्छाशक्ती, तर वाडी-वस्तीमधील गोंगाटातही कुणी ढळू न दिलेली एकाग्रता...

शहर आणि परिसरात पावसाच्या मध्यम सरी

$
0
0
शहर आणि परिसरात सकाळी झालेल्या हलक्या पावसानंतर दुपारी मात्र, बहुतांश भागात पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. मंगळवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

शालेय पोषण आहाराबाबत बचत गटांना तंबी

$
0
0
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या बचतगटांनी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) आठ दिवसांत परवाना न घेतल्यास बचतगटांचे कंत्राट रद्द करण्यात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

रात्रीच्या वेळी लूटमारीच्या ३ घटना

$
0
0
नळस्पॉट चौक, दांडेकर पूल आणि मुकुंदनगर परिसरात तिघा आरोपींनी रात्रीच्या वेळी रस्त्याने चाललेल्या नागरिकांना लुटल्याच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत.

खोट्या सह्यांनी जातीचे बोगस दाखले

$
0
0
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा तसेच पिंपरी पेंढार येथे महा ई-सेवा केंद्रे चालविणाऱ्या केंद्रचालकाने नायब तहसीलदारांच्या खोट्या सह्या करुन बोगस दाखले देण्याचा प्रकार केला आहे.

लष्कर भागात उद्या पाणी नाही

$
0
0
लष्कर पाणीपुरवठा केंद्रांतर्गत हाय सर्व्हिस टाकीच्या पाण्याच्या नलिकेची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (१८ जुलै) या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘बीएसएनएल’ने जोडली चौदाशे गावे

$
0
0
पुणे जिल्ह्यातील तब्बल एक हजार ४०० गावे दूरध्वनीद्वारे जोडण्याचे काम भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) केले आहे. केंद्र सरकारच्या भारत निर्माण प्रकल्पाअंतर्गत बीएसएनएलच्या पुणे विभागाला हे यश आले आहे.

सेशन कोर्टासाठी कोथरूडमध्ये जागा?

$
0
0
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचा विस्तार व न्यायाधीशांच्या निवासांसाठी शिवाजीनगरच्या शासकीय गोदामासह कोथरूड, हडपसर, खराडीमधील जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

राठोडच्या जमिनींवर सरकारची नोंद

$
0
0
शिंदेवाडी येथे बेकायदा डोंगरफोड करणाऱ्या किसन राठोड व त्याच्या कुटुंबीयांनी लँड सिलिंग अॅक्टचा भंग करून शंभर एकरपेक्षा जादा जमीन खरेदी केल्याने त्याच्या सातबारा उताऱ्यावर सरकारची नोंद चढविण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप

$
0
0
बॉम्ब शोधक आणि नाशक पथक...श्वान पथक...बंदुकधारी रेल्वे पोलिस दलाचे ३६ जवान...संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणारे पोलिस...आणि साध्या वेशातील पोलिसांची टीम...

पुण्याच्या रस्त्यांवर आठवडा बाजार

$
0
0
स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन गावागावांत, तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा भरणारा बाजार यापुढे पुण्यातील नागरिकांसाठी प्रमुख रस्त्यांवर भरला तर...? आश्चर्याने विस्फारलेल्या तुमच्या डोळ्यांसमोर कदाचित पुढील काही दिवसांत हा बाजार भरलेला दिसेल!

मोदींच्या नावाने बोगस रेशनकार्ड

$
0
0
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेश व छत्तीसगडचे मुख्यमंत्री, भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी यांच्या नावाची बोगस रेशनकार्ड महाराष्ट्रात आढळल्याने रेशनकार्ड देण्याच्या पद्धतीच बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शिक्षण-संशोधनाचे बाजारीकरण हानीकारक

$
0
0
खर्ची पाडलेली रक्कम वसूल करण्यासाठी विद्यार्थी गलेलठ्ठ पॅकेजच्या मागे धावतो आणि या शर्यतीत ज्ञान पराभूत होते. ज्ञानऊर्जेवर आधारित विज्ञानवादी समाज घडविण्याचे ध्येय बाळगताना शिक्षण-संशोधनाचे असे बाजारीकरण हानिकारक ठरते आहे...

शहामृग नव्हे, हा तर इमू!

$
0
0
पुण्याबाहेर पावसाळी पर्यटनाला गेल्यावर रस्त्याच्याकडेला एखादा ‘शहामृग’ दिसला म्हणून हुरळून जाऊ नका आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचेही प्रयत्न करू नका.

रताळ्याचे दर चढेच

$
0
0
आषाढी एकादशीच्या दिवशी रताळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदा यंदा रताळ्याची आवक २० ते २५ टक्यांनी घटल्यामुळे दर तेजीत राहणार आहेत.

छोट्या दवाखान्यांची संख्या वाढणार

$
0
0
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) पुण्याच्या ३२ लाख लोकसंख्येनुसार ६२ आरोग्य केंद्रे आणि अतिरिक्त हॉस्पिटल उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गरीब तसेच मध्यमवर्गीयांना त्या त्या भागात मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत.

पालखी तळांसाठी मिळणार जागा

$
0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी तळाच्या खासगी जागा संपादित करण्यात येणार असून, त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यानंतर दोन महिन्यांत सरकार या जागा ताब्यात घेणार आहे.

देहू-आळंदी, पंढरपूरसाठी ६२३ कोटींचा आराखडा

$
0
0
श्री क्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर व पंढरपूरच्या विकासासाठी ६२३ कोटी रुपयांचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून, मंजुरीसाठी तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या नव्या आराखड्यात पंढरपूरला २८ कोटी, तर देहूला ३० कोटी रुपये जादा मिळणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images